ETV Bharat / city

#Coronavirus : ICU विभागातील खाटांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारचे रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्टला साकडे - Corona Isolation Ward

केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू विभागात अधिक बेड्स कसे उपलब्ध होतील, यासाठी नियोजन केले आहे.

Corona Isolation Ward
कोरोना आयसोलेशन वॉर्ड
author img

By

Published : May 6, 2020, 5:24 PM IST

मुंबई - दीड महिन्यांपासून राज्य शासनाचा कोरोनाशी सुरु असलेला मुकाबला अजूनही थांबलेला नाही. किंबहुना अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना भविष्यातील तयारी म्हणून सरकारकडून अनेक उपाय योजले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी आता राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये, संस्था यांना राज्यभरातील त्यांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.

हेही वाचा... ...शेवटी माझी भूमिका योग्य सिद्ध झालीच !

कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे. त्यातूनच या विषाणूला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढवला असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. मात्र, केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर कसे उपलब्ध होतील, याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल आदी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे. तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर सुविधा उपलब्ध होत आहे.

लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातील नागरिक परत यायला सुरुवात झाली आहे. तसेच परदेशांतून देखील नागरिक परत यायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल. तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील. हे गृहीत धरून राज्य शासनाने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नेव्ही यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा, तसेच त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती, जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.