ETV Bharat / city

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, पाहा नवीन नियमावली - lockdown extended in maharashtra

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 30, 2020, 2:17 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी अनलॉक-३ सोबतच कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचे काही नियम देखील शिथील करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे मोटारसायकलवर डबलसीट जाणाऱ्यांना मागच्या काळात परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले होते. आता नव्या नियमावली नुसार दुजचाकीवर दोन जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

हेही वाचा - अनलॉक-३ ची नियमावली जाहीर; पाहा काय सुरू आणि काय बंद..

पाहा नविन नियमावली....

1. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने स्थानिक महानगरपालिकेच्या नियमानुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु राहतील.

2. दारूच्या दुकानांना होम डिलीव्हरीचा पर्याय खुला राहील.

3. मॉल्स आणि मार्केट कॉम्पलेक्स ५ ऑगस्ट पासून सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत खुले ठेवण्यात येतील. मात्र त्यात थिएटर, फूड कोर्ट, रेस्टॉरंट सुरु करता येणार नाहीत. रेस्टॉरंटचे किचन होम डिलिव्हरीसाठी सुरु करता येऊ शकते.

4. आऊटडोअर खेळ जसे की गोल्फ, टेनिस, फायरिंग, बॅडमिंटन, मल्लखांब अशा खेळांना सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सुरु करण्यात आले आहे. मात्र स्विमिंग पूलसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

5. टॅक्सी, चार चाकी गाडी, कॅबमध्ये चालकासहीत तीन प्रवासी, रिक्षामध्ये चालकासहीत दोन प्रवासी आणि मोटारसायकलवर दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.