मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज रविवारी 832 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 841 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
8,193 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 832 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 34 हजार 444 वर पोहचला आहे. तर आज 33 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 941 वर पोहचला आहे. आज 841 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 81 हजार 640 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 53 लाख 57 हजार 358 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.17 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 85 हजार 874 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 8 हजार 193 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
..या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 210
अहमदनगर - 59
पुणे - 56
पुणे पालिका - 99
पिंपरी चिंचवड पालिका - 60
या दिवशी दिवशी कमी रुग्णांची नोंद -
25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852 , 28 नोव्हेंबरला 832 नवे रुग्ण आढळून आले आहेत.