ETV Bharat / city

चिंताजनक.. महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर

author img

By

Published : Nov 21, 2020, 9:22 PM IST

महाराष्ट्रात करोना संसर्ग झालेले एकूण १६ लाख ४७ हजार ००४ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आहा ९२.८२ टक्के इतका झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ७६० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ६२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्रात करोना संसर्ग

मुंबई - राज्यात आज दिवसभरात ५,७६० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,७४,४५५ वर पोहचला आहे. राज्यात आज ६२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,५७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ७८,२७२ अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

७९,८७३ अ‌ॅक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज ४,०८८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६,४७,००४ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे आठवड्यातील तर १७ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०१,२०,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,७४,४५५ नमुने म्हणजेच १७.५३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,२२,८१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर ४,५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ७९,८७३ अ‌ॅक्टीव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५,४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७,०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५ तर १७ नोव्हेंबरला २,८४० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.