ETV Bharat / city

Maha Corona Update : राज्यात ४ हजार ५७५ नवे कोरोना रुग्ण, १४५ जणांचा मृत्यू - महाराष्ट्रातील कोरोना अपडेट

राज्यात ५ हजार ९१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख २७ हजार २१९ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ५७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
Maha Corona Update: राज्यात ४ हजार ५७५ नवे रुग्ण, १४५ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 21, 2021, 10:04 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आज (शनिवार दि. २१ ऑगस्ट) ४ हजार ५७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १४५ मृत्यूंची नोंद झाली असून ५ हजार ९१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५३ हजार ९६७ सक्रिय रुग्ण -

राज्यात ५ हजार ९१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख २७ हजार २१९ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ५७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ८१७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २१ लाख २४ हजार २५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २० हजार ५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २० हजार ९०५ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. राज्यात ५३ हजार ९६७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

कुठे किती आहेत सक्रिय रुग्ण?

  • मुंबई - २६२
  • रायगड - ९१
  • पनवेल पालिका - ५६
  • अहमदनगर - ५७२
  • पुणे (ग्रामीण) - ५३८
  • पुणे पालिका - २४५
  • पिंपरी चिंचवड पालिका - १५८
  • सोलापूर - ६३८
  • सातारा - ५९१
  • कोल्हापूर - १४२
  • सांगली - ३६९
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ६४
  • सिंधुदुर्ग - ४४
  • रत्नागिरी - ११२
  • उस्मानाबाद - ७५
  • बीड - ११८

हेही वाचा - लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम; आज एकाच दिवसात अकरा लाख नागरिकांचे लसीकरण!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.