ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोनाची ताजी स्थिती, एका क्लिकवर... - महाराष्ट्र कोरोना परिस्थिती

Maharashtra corona status LIVE Updates
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : Apr 9, 2021, 6:47 AM IST

Updated : Apr 9, 2021, 7:18 PM IST

19:15 April 09

शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेत कोल्हापुरात लॉकडाऊन

कोल्हापूर - कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. दररोज 200च्या आसपास रुग्ण आढळत असून 4 ते 5 रुग्णांचा मृत्यू होत आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 540 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1 हजार 800 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या वेळेत लॉकडाऊन असणार आहे.

19:10 April 09

चंद्रपुरात 784 पॉझिटिव्हसह 9 जणांचा मृत्यू

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 784 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याची चिंता वाढविणारी आहे. तर 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

19:07 April 09

मुंबईत ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीरची कमतरता नाही

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र गर्दीवर नियंत्रण नसल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने ३० एप्रिलपर्यंत सकाळी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लावण्यात आला आहे. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमावरी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईत रुग्णांना ऑक्सिजनची आणि रेमडेसिवीरची कमतरता नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

17:36 April 09

लसीच्या तुटवड्यामुळे प्रशासन हतबल

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यातील लसीकरण केंद्रात लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रातून परत फिरावे लागत आहे. 45 वर्षांपुढील नागरिकांची गर्दी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लसीच्या तुटवड्यामुळे प्रशासनदेखील हतबल झाले आहे.

17:34 April 09

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय, तज्ज्ञांचे मत

नाशिक - कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय असल्याचे मत डॉ. शाम पाटील यांनी व्यक्त केले.

16:47 April 09

विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी कायद्यान्वये दाखल होणार गुन्हा

सोलापूर - शुक्रवारच्या रात्री आठपासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसाकरिता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारी सर्व दुकाने चालू राहतील. मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जातील, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.

15:35 April 09

गर्दीचे खोटे व्हिडिओ व्हायरल केल्यास होणार कारवाी

मुंबई - गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकावरून हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर गावाकडे स्थलांतर करू लागले होते. यावेळी राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर काही प्रमाणात कामगार स्थलांतर करू लागले आहेत. मात्र गेल्यावर्षीचे खोटे व्हिडिओ टाकून काही समाजकंटक अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. अशा समाजकंटकाना धडा शिकवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानिक पोलीस आणि सायबर सेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीचे किंवा खोटे व्हिडिओ वायरल करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

14:50 April 09

MPSCची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई - MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील बैठकीला उपस्थित होते. 

14:48 April 09

केंद्राकडून महाराष्ट्राला लसीचा साठा इतर राज्यांपेक्षा कमी - अस्लम शेख

मुंबई - मुंबईतही लसीचा तुटवडा असल्याने बीकेसी, भाईंदर, मुलुंड येथील लसीकरण केंद्र बंद करण्याची अवस्था आली आहे, अशी खंत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी व्यक्त केली. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 62 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असतानादेखील केंद्राकडून महाराष्ट्राला लसीचा साठा हा इतर राज्यांपेक्षा कमी मिळत आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

14:46 April 09

रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राहुल कुल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दौंड - पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

11:53 April 09

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात केवळ तीन दिवसांचा लसीचा साठा

वाशिम : विदर्भातील पाच जिल्ह्यात कोव्हीड लसीचा तुटवडा निर्माण झाला असून; केवळ तीन दिवस पुरतील एवढ्याच लसीचा साठा उपलब्ध आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना लसींचा साठा केवळ तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.

11:47 April 09

कोल्हापूर - पंचगंगा नदीत पोहायला तोबा गर्दी, शहरातील अनेक मैदानांवरही दररोज गर्दी

कोल्हापूर : राज्यभरात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना सुद्धा राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कडक असे निर्बंध सुद्धा घालण्यात आले असून दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत शासनाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. असे असताना कोल्हापूरात त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

10:53 April 09

यवतमाळ - 95 केंद्रावरील लसीकरण पडले बंद; केवळ 15 हजार कोव्हिड लसी शिल्लक

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस दिले जात असून जिल्ह्यात आता कोव्हीड लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढ्याच लस जिल्ह्यात शिल्लक आहे. आज किंवा उद्या जिल्ह्यातील कोविड-19 प्रतिबंधक लसींचा साठा संपेल. जिल्ह्यातील 117 केंद्रावरून लसीकरण करण्यात येत असून 22 केंद्रावर लसींचा पुरवठा आहे.

10:41 April 09

इतर राज्यात वाया गेलेल्या लस महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जातायत, आरोग्यमंत्री संतापाले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करत, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे जवळपास पाच लाख लसी वाया गेल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र इतर राज्यात वाया गेलेल्या लसी ह्या महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जात आहेत. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्याहून कमी असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आरोपाला उत्तर दिले.

10:40 April 09

मुंबई : बीकेसी जम्बो कोविड सेंटरमधील लसीकरण बंद.

कोरोना लसींच्या अभावी मुंबई मधील बीकेसी जम्बो कोविड सेंटर मधील लसीकरण बंद करण्यात आले आहे.

10:39 April 09

पश्चिम वऱ्हाडात कोरोना लसीचा अत्यल्प साठा; एकच दिवस पुरेल एवढीच लस उपलब्ध

अकोला - राज्यभरात कोविड लसीचा तुटवडा भासत असताना पश्चिम वऱ्हाडलाही याची झळ पोहोचत आहे. आरोग्य मंडळाच्या अकोला विभागासाठी व्यक्तींचे केवळ 16 हजार 160 लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. दररोज पश्चिम वऱ्हाडात 20 हजार नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे मिळालेला साठा हा एकच दिवस पुरेल एवढा असून, विभागातील केवळ चार जिल्ह्यांसाठी हा साठा आहे.

09:44 April 09

अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा; 25 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद

अमरावती : मागील दोन महिन्यापासून देशभरात मोठया प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू होते. परंतु आता राज्यात मोठया संख्येने कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अमरावती जिल्ह्यातील 25 पेक्षा जास्त ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र आता बंद करण्यात आले आहे. एक-दोन दिवसांत जर जिल्ह्यातील कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले नाही तर संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

09:43 April 09

पंढरपूर - बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, लॅब सील

बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लैबोरेटरीवर कारवाई करत सील करण्यात आली आहे. बनावट अहवाल तयार करणाऱ्या प्रकरणात आकाश गोरख आदमिले, उमेश शिंगटे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाला. गेल्या तीन महिन्यापासून बनावट अहवाल तयार करण्याचा काळा धंदा सुरु होता.

09:12 April 09

वाशिममध्ये एक सदस्यीय केंद्रीय पथक दाखल; कारंजा शहरात केली पाहणी

वाशिम जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक सदस्यीय केंद्रीय पथक वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहे. पुढील तीन दिवस हे पथक वाशिम जिल्ह्यातील ठिकठिकाणी भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.

09:11 April 09

लसीचा तुटवडा, 30 केंद्र बंद, आजही काही केंद्रे बंद पडणार !

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र केंद्र सरकारकडे मागणी करूनही लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने, तसेच पुढील साठा 15 एप्रिलला येणार असल्याने मुंबईत 120 पैकी खासगी 25 आणि पालिकेच्या 5 अशा एकूण 30 केंद्रांवर काल गुरुवारी लसीकरण बंद झाले आहे. पालिकेची 33 पैकी 5 केंद्रं बंद झाली आहेत. आज बहुसंख्य केंद्रं बंद होणार आहेत. यामुळे मुंबईतील लसीकरण ठप्प होईल.

07:38 April 09

पोहरादेवी येथे राम नवमीला होणारी यात्रा रद्द..

वाशिम : देशातील कोट्यवधी बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. याकरिता देशभरातून बंजारा समाज बांधवांसह विविध समाजातील लाखो भाविक येतात. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, २१ एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या आज, ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले.

07:37 April 09

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फत्तेचंद राकासह 33 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. परंतु असे असतानाही पुण्यात व्यापारी महासंघाने दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी लक्ष्मी रस्त्यावर गुरुवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली असून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह 33 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

06:19 April 09

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Maharashtra corona status LIVE Updates
राज्यात गुरुवारी 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गुरुवारी 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावरून राज्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 376 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Last Updated : Apr 9, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.