ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : May 23, 2021, 6:49 AM IST

Updated : May 23, 2021, 12:40 PM IST

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

12:38 May 23

बीकेसी कोविड सेंटर प्रकरणी मनसेचे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

मुंबई - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आरोग्य यंत्रणा यांना देखील कोलमडलेली चित्र काही ठिकाणी आहे. त्यातच मुंबईतील सर्वात मोठं असलेलं बीकेसी जम्बो कोविड सेंटरवरती मनसे नेते अखिल चित्रे यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिलं होतं. मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा कारवाई आणि उत्तर देखील न आल्यामुळे चित्रे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.

12:38 May 23

कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी सहजसेवा फाऊंडेशनचे सहज वाचनालय - रुग्णांसाठी महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम वापर व्हावा याच विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणाऱ्या सहज सेवा फाउंडेशन मार्फत कोरोना रुग्ण ताण तणावापासून मुक्त रहावा व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा रहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आले असून या वाचनालयाचे उघ्दाटन 23 मे रोजी खोपोलीतून करण्यात आल्याने सर्व स्तरावरून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

12:37 May 23

अमरावतीत 14 दिवसांनी जीवनावश्यक वस्तू दुकाने खुली

अमरावती- जिल्हा प्रशासनाने शनिवारी जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आज सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळेत ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करू शकतील. मात्र, सोशल डिस्टन्स, मास्क आदी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. दुकानदारांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. जिल्ह्यात तब्बल 14 दिवसांपासून भाजीपाला, किराणा फळ व इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकाने बंद होती,त्यामुळे पुन्हा 14 दिवसांनी बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली.

12:36 May 23

भारतात कोरोनंतर म्युकरमायकोसिस चे संकट; ब्लॅक आणि व्हाईट फंगसबद्दल नागरिकांमध्ये गैरसमज

ठाणे: भारतात कोरोना महामारी चे संकट अद्यापही सुरू असतानाच 'म्युकरमायकोसिस'चे (Mucormycosis) या काळ्या बुरशीजन्य रोगाचे संकट समोर आले आहे. देशभरात या रोगाचे रुग्ण वाढत आहे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेने या रोगाचा साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. करोना संकटादरम्यान देशात 'काळी बुरशी' अर्थात 'म्युकरमायकोसिस'चे आत्तापर्यंत तब्बल ८८४८ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण गुजरात राज्यात आढळल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. यापैंकी २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत.

12:35 May 23

कोविड सेंटर मधून पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन व श्वान, सहा तासात आरोपी जेरबंद

पुणे - शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २०२० मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला कोविड सेंटर मध्ये दाखल केले होते. तेथून तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. या आरोपीला पकडण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला श्वान पथकाच्या मदतीने यश आले आहे. सौरभ उर्फ सौऱ्या ड्रायवऱ्या भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

11:30 May 23

कामरगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी लागल्या चक्क चपलाच्या रांगा..

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस मिळावा यासाठी आज सकाळी चार वाजल्यापासून चपलाच्या लाईन लावल्या आहेत. तर काही नागरिकांकडून पाणी बॉटल ठेऊन आपली उपस्थिती रांगीमध्ये असल्याचे दर्शवना करता पाणी बॉटल पण रंगीत लावले आहेत. मात्र आजही यांना लस मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे..

11:30 May 23

प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामरक्षक समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करा - बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ग्रामरक्षक समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करून कोरोनामुक्त गाव अभियान राबवा असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

09:05 May 23

मेळघाटातील अनेक गावांत गावबंदी; कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाची सतर्कता..

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कायम आहे. शहरांपेक्षा आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर वाढतं आहे. मेळघाटातील अनेक गावांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये भीती पसरली आहे. मेळघाटातील ज्या गावात सर्वाधिक रुग्ण आहे त्या गावात प्रशासनाकडून गावबंदी करण्यात आली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण 1561 गावांपैकी 1284 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. तर 277 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.

09:04 May 23

ऐतवडे खुर्द ठरतय कोरोना हॉटस्पॉट; 52 रुग्ण घरीच, दोन दिवसात तिघांचा मृत्यू.

सांगली : कोरोना संसर्गजन्य रोगाला आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे विविध उपाययोजना राबविल्या तरी येथील रूग्ण संख्या वाढतच आहे त्यामुळे येथे तीन दिवस गाव कडकडीत बंद ठेवणार असल्याचे सरपंच डॉ.जोस्ना पाटील.

09:02 May 23

नाशिक : दोन रुग्णालयांवर गुन्हा दाखल करत मान्यता रद्द

नाशिक : अवाजवी आकारलेल्या बिल भरले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवल्याप्रकरणी नाशिकच्या रमालयं आणि मेडिसिटी या दोन रुग्णालयांवर गुन्हा दाखल करत त्यांची मान्यता रद्द करण्याचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

09:00 May 23

नागपुरात म्युकरमायकोसिसच्या बळींमध्ये वाढ; ४६ रुग्णांचा मृत्यू

नागपूर - जिल्ह्यासह पूर्व विदर्भात म्युकर मायकोसिस आजाराने थैमान घातले आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण समोर येत आहे. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार शासकीय रुग्णालयात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, पूर्व विदर्भात ७२९ रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे.

06:46 May 23

नाशिक - हॉस्पिटलचे बिल न भरल्याने मृतदेह देत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बिलाच्या वादातून एका कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटलने तब्बल 12 तासांहून अधिक काळ डांबून ठेवल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला. अखेर या प्रकरणी पोलिसांना मध्यस्ती केल्यानंतर 15 तासानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला.

06:45 May 23

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील नर्सेसचं काम बंद आंदोलन

सिंधुदुर्ग - जिल्हा रुग्णालयातील नर्सेसनी शनिवारी काम बंद आंदोलन पुकारल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत एकच खळबळ माजली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ गावकर यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, या नर्सनी सायंकाळी उशिरापर्यंत काम बंद ठेवल्याने कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल झाले.

06:44 May 23

काँग्रेस आमदार निधीतून १११ रुग्णवाहिका देणार व ६१ लाख मास्क वाटप करणार - नाना पटोले

मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ केला. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्ष आपल्या आमदार निधीतून १११ रुग्णवाहिका देणार असून; या संदर्भातील पत्रे आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

06:43 May 23

नवी मुंबई शहरात म्युकरमायकोसिसचे १४ नवे रुग्ण

नवी मुंबई शहरात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव वाढला आहे. नवी मुंबईत या आजाराचे तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या 29 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे नवी मुंबई मनपा क्षेत्रातील आहेत. तर इतर 15 रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

05:59 May 23

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये राज्यात 40 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 51 लाख 11 हजार 09 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले, तरी‌ उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासांत 682 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 24 तासात 26 हजार 133 रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : May 23, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.