ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 14, 2021, 6:37 AM IST

Updated : May 14, 2021, 10:42 AM IST

10:41 May 14

कोल्हापूरात कोरोनावर उपचार घेत असलेल्या दोन कैद्यांचे पलायन

कोल्हापूर : कोरोनाबाधित दोन कैद्यांनी कोव्हिड सेंटरमधून खिडक्यांचे लोखंडी रॉड कापून पलायन केले आहे. कोल्हापूरातील कळंबा आयटीआय कोव्हिड सेंटरमधून कैद्यांनी पलायन केले असून गोदाजी नंदीवाले आणि प्रतीक सरनाईक अशी दोन्ही पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांच्यावर खून आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. सद्या ते कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होते. काल रात्री याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

10:40 May 14

दुसऱ्या लाटेत वाहनांची चाके थांबली... टॅक्सी व्यवसायाला 40 कोटीचा फटका

नागपूर - कोरोनाच्या काळात टॅक्सी चालकांचा व्यवस्यावर मोठा परिणाम झालेला आहे. यात पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांना इकडून तिकडे जात असताना टॅक्सी चालकांना व्यवसाय सुरू राहिला. पण दुसऱ्या लाटेत हा व्यवसाला मोठा फटका बसला आहे. उपराजधानी नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने मोठा प्रमाणात पर्यटक असल्याने टॅक्सी चालकांना काम मिळत होते. पण यंदाच्या लॉकडाऊनमध्ये टॅक्सी व्यवसाय ठप्प झाला आहे. 

10:40 May 14

बारामतीत म्युकरमायकोसिसचे सतरा रुग्ण....

बारामती- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोविड नंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या (काळ्या बुरशी) आजाराचा संसर्गगाचे नवे संकट निर्माण झाले आहे. वर्षभरात या आजाराचे सतरा रुग्ण आढळून आले आहेत.

10:40 May 14

लॉकडाऊन च्या कडक निर्बंधात मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत..

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या नियम व अटींसह लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा राज्य सरकारने शासन निर्णय काढून जनसामान्यांना याची माहिती दिलेली आहे. देशात कोरोना बाधितांची आणि कोरोना बळींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असली तरी निर्बंध लागू केल्यानंतर बाधितांची संख्या उल्लेखनीय प्रमाणात खाली आली आहे. 

08:54 May 14

पोलिओच्या डोस प्रमाणे कोरोनाची लस घरा घरात जाऊन द्या -आमदार रवी राणा यांची मागणी

अमरावती : कोरोना लसीकरणसाठी अमरावती जिल्हात लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे,त्यामुळे लसीकरण केंद्रावरूनच कोरोनाचा प्रसार होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला असून गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने पोलिओचा डोस प्रमाणे कोरोनाची लस सुद्धा घरा घरात जाऊन द्यावी अशी मागणी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे.

08:52 May 14

नाशिक - मालेगाव शहरात 20 हजार नागरिक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत.

मालेगाव शहरात 16 जानेवारी पासून आज पर्यंत 27,865 लोकांना कोरोनाचा प्रथम डोस देण्यात अला होता,यापैकी आतापर्यंत फक्त 9 हज़ार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे असून अद्याप 20 हजार नागरिक बाकी असल्याने आरोग्य खत्याच्या वतीने या लोकांना बुधावर 12 मे पासून कोरोनाचा दुसऱ्या डोस साठी बोलविले जात आहे. या नागरिकांचे दुसरे डोस पूर्ण करण्याचे आदेश शासन स्तरावररून असल्याने 18 वर्षावरील नवीन लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली आहे.

06:19 May 14

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची नवीन लागण झालेल्या रुग्णांच्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज एकाच दिवशी 54 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 46 लाख 54 हजार 731 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे 42 हजार 582 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52 लाख 69 हजार 292 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरी या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसून येते. राज्यात एकाच दिवसात 850 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 24 तासांत 850 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 33 हजार 294 इतके आहेत.

Last Updated : May 14, 2021, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.