ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 9, 2021, 6:35 AM IST

Updated : May 9, 2021, 11:48 AM IST

11:46 May 09

नांदेडात अंत्यविधीसाठी लाकडांची मागणी वाढली; लाकडांऐवजी इतर पर्याय शोधण्याची प्रशासनाकडे मागणी..

नांदेड- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढला आहे. त्यासोबतच अंत्यविधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत आहेत. नांदेडात सध्या अंत्यविधीसाठी लाकडांच्या मागणीत सहा पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे लाकडा ऐवजी इतर पर्याय शोधण्याची मागणी मनपा प्रशासनांकडे केली जात आहे.Body:नांदेड- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढला आहे. त्यासोबतच अंत्यविधीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर लाकडं लागत आहेत. नांदेडात सध्या अंत्यविधीसाठी लाकडांच्या मागणीत सहा पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे लाकडा ऐवजी इतर पर्याय शोधण्याची मागणी मनपा प्रशासनांकडे केली जात आहे.

11:46 May 09

नाशिक : काळ्या बाजारात रेमडिसिव्हर इंजेक्शन विकताना अंबड पोलिसांनी केली दोघांना अटक...

नाशिक - जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असताना,दुसरीकडे मात्र काही महाभाग सर्रासपणे या रेमडिसिवरचा काळाबाजार करताना दिसून येत आहेत.अंबड पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून दोघांना अटक केली आहे. इंजेक्शन घेऊन राणेनगर बोगदा येथे येत असताना,पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करत रंगेहात अटक केली.

10:53 May 09

अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी..

अमरावती : जिल्ह्यात मागील सात दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दररोज एक हजारांहून जास्त वाढत असल्याने, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 15 मे पर्यत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये आता जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने ज्या किराणा, फळ विक्रेते, भाजीपाला, दूध,डेअरी सह आदी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आज दुपारी बारा वाजता पासून हा कडक लॉकडाऊन लावला जाणार आहे. त्यामुळे याची धास्ती घेत अमरावती करांनी आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या इतवारा बाजारपेठेत किराणा, भाजीपाला दूध,फळे आदी जीवनावश्यक वस्तूची खरेदी केल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळाले.

10:53 May 09

खासगी डॉक्टर उरणकरांसाठी ठरताहेत देवदूत

रायगड : तालुका कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमध्ये अपुरी कर्मचारी व्यवस्था असल्याने, उरणच्या खाजगी डॉक्टरांनी या केंद्रामध्ये मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. आता हेच डॉक्टर आणखी पुढे येऊन येथील रुग्णांसाठी स्वखर्चातून आवश्यक सोयीसुविधा उपलब्द करून देत आहे. यामुळे रुग्णांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळत असल्याने, हे डॉक्टर आता उरणकरांसाठी देवदूत ठरत आहेत.

10:09 May 09

पाचोरा तालुक्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील विसंवाद कोरोनाच्या पथ्यावर; उपाययोजनांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा

जळगाव - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे. आता तर कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याने चिंता वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील विसंवाद कोरोनाच्या पथ्थ्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोरोना संसर्गाचा वेग कायम असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उपाययोजनांच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला आहे.

10:09 May 09

कोरोना संसर्गची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - पालकमंत्री शंभूराज देसाई

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ९ मे ते १५ मे या कालावधीत जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

10:08 May 09

उरणमध्ये आयसीयू बेडची मागणी

रायगड - उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन सेवा आहे. परंतु ऑक्सिजन आयसीयू बेडची सोय नाही. यामुळे रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असते. तरी पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी उरणकरांच्या सेवेसाठी आयसीयू बेड लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी केली आहे.

10:08 May 09

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोरोना रूग्णांसाठी 110 बेडची सोय

सातारा - माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कराड तालुक्यातील रूग्णांसाठी 110 बेड उपलब्ध झाले आहेत. कराडमधील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50, वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केूंद्र आणि उंडाळे ग्रामीण रूग्णालयात प्रत्येकी 30, अशा एकूण 110 बेडची सोय झाली आहे. 

10:07 May 09

कोरोना काळात लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद - गाव पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना काळात गावातील कुशल व अकुशल कामगारांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले.

10:06 May 09

अहमदनगर- जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे प्रशासन वैतागले..

अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण सध्या दाखल असून या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या वावरा मुळे रुग्णालय डॉक्टर, नर्सेस यांना नियमित काम करणे अवघड बनले आहे. चिंतेची बाब म्हणजे नातेवाईक थेट आयसीयू मध्ये येत आमच्या रुग्णाला रेमेडिसीवर द्या, हे औषध का नाही दिले, रुग्ण दगावला तर तुमची तक्रार करू असा दबाव आणतात. त्यामुळे रुग्णालय स्टाफ सध्या वैतागला आहे.

06:33 May 09

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक मोठया प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

06:33 May 09

धक्कादायक.. करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे काढले एक्स-रे, लॅब सील

वाशिम - जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. स्वतः करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे एक्स रे काढल्याचे समोर आल्याने हे सर्वजण हादरले आहेत. नाथ डिजिटल एक्स रे लॅबचा टेक्निशियन असलेला राहुल शिरसाट याने हा प्रताप केला असून महसूल प्रशासन, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनने संयुक्तरित्या कारवाई करत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही लॅबही सील करण्यात आली आहे.

06:33 May 09

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधी लढाईचे पंतप्रधानांकडून कौतुक, तर फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई - सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान कौतुक आणि राज्यातील भाजप नेते टीका करत असल्यामुळे भाजपच्या दुहेरी प्रतिक्रिया समोर येत आहेत.

06:30 May 09

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात आज 53 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 लाख 53 हजार 336 एवढी झाली आहे. तसेच आज 82 हजार 266 रुग्ण कोरणामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Last Updated : May 9, 2021, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.