ETV Bharat / city

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : May 5, 2021, 6:40 AM IST

Updated : May 5, 2021, 9:46 PM IST

21:44 May 05

राज्यात 57 हजार 640 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 920 मृत्यू

मुंबई - आज (दि. 5 मे) दिवसभरात 57 हजार 6 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 41 लाख 64 हजार 98 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. असे असले तरी राज्यात नव्या 57 हजार 640 रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवशी 920 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

21:05 May 05

मुंबईत 3 हजार 879 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 77 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - आज (दि. 5 मे) मुंबईत 3 हजार 879 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (बुधवारी) 3 हजार 686 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

21:01 May 05

मुंबईत चारकोप प्रसतीगृह येथील लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई - मुंबईत सध्या लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यासाठी विभागवार लसीकरण केंद्रे उभारली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चारकोप सेक्टर 3मधील प्रसुतीगृह येथे लसीकरण केंद्र उभारण्यात आले. त्या केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते बुधवारी (5 मे) करण्यात आले. तसेच महापौरांनी क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांच्या समस्या, पुनर्विकास कामाची पाहणीही केली.

20:57 May 05

जळगाव जिल्ह्यासाठी मिळाला 20 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन

बोलताना आमदार महाजन

जळगाव - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्यासाठी 20 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध झाला. हा टँकर बुधवारी (दि. 5 मे) दुपारी गुजरात राज्यातून जळगावात दाखल झाला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आगामी 24 तासांची गरज भासली आहे. लिक्विड ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

20:29 May 05

आता कोरोना रुग्णांना व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बोलताना जिल्हाधिकारी

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयातील कोरोना रूग्णांना आता नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

20:21 May 05

जीएमसीतील आंतरवासिता डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; कोविड वार्डातील रुग्णसेवेवर परिणाम

आंदोलक डॉक्टर माहिती देताना...

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वार्डमध्ये कार्यरत असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत अधिष्ठाता यांच्या कक्षात समोर ठिय्या देऊन नारेबाजी केली. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी या आंतरवासिता डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

20:19 May 05

देशाबाहेरील दानशुरांकडून मदतीचा ओघ, वाटपासाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’

मुंबई - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील देशातून मदतीचा ओघ वाढला आहे. या मदतीच्या वाटपासाठी महाराष्ट्रात उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केल्याची माहिती राज्य शासनाने दिली. राज्य शासन, अधिकृत व वैधानिक संस्थाकडूनही मदत देण्यात असल्याचे शासनाने म्हटले आहे.

20:14 May 05

पंढरपुरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी, चार जण कोरोना बाधित

पंढरपूर (सोलापूर) - तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीमध्ये जे नागरिक बाधित आले त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

19:51 May 05

यवतमाळ : नागरिकांकडून निर्बंधाची पायमल्ली, विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी

बोलताना नागरिक

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून सकाळी 11 वाजल्याच्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक बाहेर पडू शकतात. मात्र, अनेकजण दुपारी विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्यामुळे प्रशासनाकडून जागेवरच कोरोना चाचणी केली जात आहे.

18:47 May 05

कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकच्या हजारो किटचे पॅकिंग घरातच, व्हिडिओ व्हायरल

कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकच्या हजारो किटचे पॅकिंग घरातच

ठाणे - एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच कोरोनाच्या स्वॅबसाठी वापरले जाणाऱ्या स्टिकची कोणतीही सुरक्षा न बाळगता घराघरात हजारो किटचे पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे.

18:46 May 05

'नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर'

मुंबई - महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

18:16 May 05

वर्ध्यात गळती रोखल्याने 5 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाचवतोय इतरांचा जीव

वर्धा - नाशिक जिल्ह्यात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर उपाययोजना सुरू करून तब्बल 5 मेट्रिक टन ऑक्सिजन बचत केली जात आहे. यासाठी कोविड रुग्णालयात अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संपूर्ण तपासणी नंतर ऑक्सिजन खपत जवळपास 5 मेट्रिक टनाने घटली. यामुळे एकीकडे तुटवडा असतांना गळती थांबल्याने इतर रुगांना त्याचा फायदा होताना दिसून येत आहे.

16:53 May 05

मुंबईत विनामास्क २६ लाख ८७ हजार नागरिकांवर कारवाई, ५४ कोटीचा दंड वसूल

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २६ लाख ८७ हजार ३३९ नागरिकांवर कारवाई करत ५४ कोटी १३ लाख ५९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

15:53 May 05

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

मुंबई - कोरनाची सध्याची परिस्थिती, लसीरकरण, रेमडेसिवीर यांसारख्या मुद्द्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह, अजित पवार, जयंत पाटील, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, धनंजय मुंढे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अमित देशमुख, विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित  आहेत. बैठकीदरम्यान मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

12:22 May 05

अमरावती-वर्धा जिल्हा सीमेवरील नाकेबंदी केवळ कागदावरच; वाहनांची रहदारी सुरुच..

अमरावती : राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 मे पर्यंत संचारबंदी वाढवली, यात मुख्य म्हणजे जिल्हाबंदीचे आदेश देत ई-पास शिवाय कोणालाही इतर जिल्हात ये-जा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर अमरावती ग्रामीण पोलीस तिवसा पोलीस ठाण्याची वरखेड फाट्या जवळ बॅरिकेट्स लावण्यात आले. तेथे पोलीस चौकी लावत नाकाही लावला. मात्र या ठिकाणी ही पोलीस चौकी शोभेची वस्तू झाली असून, जिल्हाबंदी केवळ कागदावरच दिसून येते आहे. या ठिकाणी सर्रासपणे कोणतीही तपासणी न करता वाहनांना जाण्यास मुभा आहे.

12:21 May 05

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती भयावह, वृद्ध महिलेचा उपचाराअभावी रिक्षात तडफडून मृत्यू..

पंढरपूर - राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पंढरपूर, मंगळवेढा परिस्थिती गेले काही दिवस अतिशय बिकट होती. तसंच, बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदींच्या उपलब्धतेबाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. पंढरपूर शहरात ऑक्सिजन आभावी वृद्ध महिलेचा रिक्षा तडफडून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोविड विषाणूबाबत भयावह चित्र समोर येत आहे.

11:23 May 05

नाशिक - कोरोनाने आईचा मृत्यू,सॅनिटायझर पिऊन मुलीची आत्महत्या

नाशिक - कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याचा धक्का वीस वर्षीय मुलीला असह्य झाल्याने, तिने रविवार दिनांक 2 रोजी नाशिकरोड येथील कोविड सेंटरच्या आवारात सॅनिटाझर पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

10:36 May 05

आजपासून बारामती सात दिवस कडकडीत बंद; बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात

बारामती - वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीत काल मध्य रात्रीपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना कडकडीत बंद असून, सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

09:50 May 05

पुणे - जिल्ह्यात ऑक्सिजनची तूट लवकरच भरून निघणार

पुणे : जिल्ह्याची ऑक्सिजची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी असलेली ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढून ती ५०० च्या जवळपास पोहचली आहे. मात्र, ही तूट कायम असल्याने ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ही धावपळ थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १० तर खासगी कंपन्यांमार्फत १७ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात येणार आहे. यामुळे ऑक्सिजनची तूट लवकरच भरून निघणार आहे.

09:50 May 05

बांधावरून वाद: राग आल्याने कोरोना रुग्ण चुलत भावाच्या अंगावर थुंकला; केज पोलिसांत गुन्हा दाखल

बीड - शेत नांगरणीवरून होम आयसोलेशनमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तोंडाचे मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचा प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला.

09:49 May 05

परभणीत मध्यरात्री सुमारे 100 ग्राहकांसह व्यवहार करणाऱ्या दुकानदारावर पोलिसांची कारवाई

परभणी - कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून परभणीत गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेक व्यापारी बंद शटरच्या आतून व्यवहार करताना आढळून येत आहेत. गेल्या 2 दिवसांत अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचे सत्र पोलिस आणि मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. या दरम्यान काल मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास अशाच एका दुकानदारावर नानलपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक भागात असलेल्या या दुकानात सुमारे 100 ग्राहक आढळून आले.

08:21 May 05

अमरावती जिल्हाची परिस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे -आमदार रवी राणा यांची मागणी

अमरावती - जिल्हात मंगळवारी 1,123 नवीन कोरोना रुग्ण आढळले, मात्र या परिस्थितीला जिल्हा प्रशासन व पालकमंत्री जबाबदार असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करत, अमरावतीची परिस्थिती गंभीर होत असल्याने आता अमरावतीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे. मागील वेळी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही लॉकडाऊनचे पालन होत नसल्याचे सांगितले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले गे.ले त्यामुळे जिल्ह्यातील परिस्तिती नियंत्रणामध्ये राहिली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हाकडे आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे असे रवी राणा म्हणाले.

08:20 May 05

प्रशासनाची परवानगी न घेता लग्न सोहळ्याचे आयोजन; वधू-वरांचे सह आयोजकांवर गुन्हा दाखल

नंदुरबार - राज्यासह जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला प्रशासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आदेशित करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करीत नंदुरबार शहर व तालुक्यात विनापरवानगी लग्न सोहळा आयोजन करून 25 पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आलेल्या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात व व तालुक्यातील निंभेल येथे वधू वरासह आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

08:20 May 05

कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई पोलिसांना..

मुंबई : जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुंबई पोलीस दलातील २३० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत ही सर्वाधिक संख्या असून, यामध्ये कोरोनापेक्षा इतर आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या अधिक आहे.

08:18 May 05

उरणमध्ये पाच दिवस लसीकरण बंद; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

रायगड : कोरोना विषाणूशी सुरक्षीर राहण्यासाठी शासनाकडून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड अशा दोन लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसींचा तुटवडा निर्माण झाला असल्याने, उरण तालुक्यातील लसीकरण मागील पाच दिवसांपासून बंद आहे. तर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना एकही डोस न मिळाल्याने नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

06:18 May 05

मुंबईकरांना त्यांच्या राहत्या घरीच लसीकरण करा - खासदार मनोज कोटक

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना त्यांच्या राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासन लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

06:17 May 05

लसीचा साठा आला, मुंबईत लसीकरण सुरु, नोंदणी करुन लसीकरणाला जा!

मुंबई - शहरातील कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिकेला काल मंगळवारी १ लाख लसींचा साठा प्राप्त  झाला आहे. हा साठा आज बुधवारी सकाळी लसीकरण केंद्रांवर वितरित केल्यावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईतील ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे. महापालिका आणि सरकारी केंद्रांवर हे लसीकरण केला जाणार आहे. तसेच ५ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. 

06:16 May 05

लस न घेताच मिळाले प्रमाणपत्र, मुंबईतील दुसरी घटना

मुंबई - कोरोना पासून बचाव करण्यासाठी मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात येत आहे. मात्र एका लसीकरण केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी महेश मेजारी भांडुप येथील लसीकरण केंद्रात गेले होते, तेव्हा नोंदणी करायला गेले आणि लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्रच हातात आलं. अशा प्रकारची घटना ही दुसऱ्यांना घडली आहे. राजावाडी येथे देखील नाईक दाम्पत्यासोबत अशी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

06:15 May 05

मुंबईत ड्राइव्‍ह इन लसीकरणाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ३६५ नागरिकांचे लसीकरण

मुंबई - ज्‍येष्‍ठ नागरिक आणि दिव्‍यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस घेण्‍यासाठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने ड्राइव्‍ह इन लसीकरण सुविधा कालपासून सुरू केली आहे. कोहिनूर वाहनतळ येथे ही सुविधा उलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाला पहिल्‍याच दिवशी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, सायंकाळी उशिरापर्यंत संकलित माहितीनुसार एकूण २२७ वाहनांतून आलेल्‍या ३६५ नागरिकांना या केंद्रावर लस देण्‍यात आली.

06:12 May 05

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. मंगळवारी 65 हजार 934 रुग्ण कोरना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 41 लाख 7 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के एवढे झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकीकडे रुग्ण जरी बरे होत असले, तरी 24 तासांत 891 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 891 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 48 लाख 22 हजार 902 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 41 हजार 910 इतके आहेत.

Last Updated : May 5, 2021, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.