मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले त्याच प्रमाणात येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंधांसह लॉकडाऊन राज्यात आजपासून लावण्यात येत आहे. याच भीतीने दुसर्या राज्यातून आलेले स्थलांतरित मजुरांनी पुन्हा एकदा आपल्या घराची वाट धरली आहे लॉकडाऊन ची घोषणा होऊन पुन्हा एकदा वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल या भीतीने मजूर पुन्हा गावी परतत आहेत आज कुर्ला एलटीटी स्थानकाबाहेर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर दिसून आले.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना लाईव्ह
13:23 April 14
राज्यातील लॉकडाऊन च्या परिस्थितीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली..
12:52 April 14
जळगावात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची उसळली गर्दी; जिल्ह्यातील 133 केंद्रांवर लसीकरण पूर्ववत सुरू
जळगाव - जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून कोरोना लसीचे 40 हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 133 केंद्रांवर बुधवारपासून लसीकरण पूर्ववत सुरू झाले. दरम्यान, जळगाव शहरातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. म्हणून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
12:49 April 14
कडक निर्बंधांच्या भीतीने स्वारगेटवर प्रवाशांची गर्दी..
पुणे : राज्यात आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून कोणालाही बाहेर पडता येणार नाही. या कडक संचारबंदीत सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे. मात्र यात फक्त अत्यावश्यक काम करणाऱ्या नागरिकांनाच ये-जा करता येणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू होणार असल्याने पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानक येथे नागरिकांनी आपापल्या गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. स्वारगेट बस स्थानक येथून दरोरोज 100हून अधिक बसेस विविध ठिकाणी ये-जा करत असतात.दरोरोजच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.
12:28 April 14
परभणीत एकापाठोपाठ 2 कोरोनायोद्धा पोलिसांचे निधन
परभणी - शहरातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे आज (बुधवारी) पहाटे कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले. या पाठोपाठ आजच (बुधवारी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे देखील उपचारादरम्यान निधन झाले. काही तासांच्या अंतराने दोन कोरोनायोद्धा पोलिसांचे निधना झाल्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
12:21 April 14
कोल्हापुरातील नाभिक समाज आक्रमक; सरकारने दोन दिवसात मदत जाहीर करण्याची मागणी
- कोल्हापूरातील नाभिक समाज आक्रमक.
- मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप.
- लॉकडाऊन काळात आम्हाला देखील मदत करा.
- दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरणार.
- महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांचा इशारा.
10:02 April 14
कोल्हापूरात 299 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांपैकी पंधराशे घेतायत घरातूनच उपचार
कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली. गेल्या 24 तासांत 299 नवे रुग्ण तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 181 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2521 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 2 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकूण ऍक्टिव्ह 2 हजार 521 रुग्णांपैकी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रात 911 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 505 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत.
10:00 April 14
दहिसर जम्बो कोविड सेंटरच्या समस्यांबाबत शिवसेनेचा पाहणी दौरा व बैठक
मुंबई- दहिसर जंम्बो कोविड सेंटरच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि समस्यांबाबत लवकर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन केले गेले होते. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे सुरेश काकाणी व परिमंडळ 7 चे प्रभारी उपायुक्त पराग मसुरकर यांच्या बरोबर संयुक्त पाहणी दौरा आणि मग समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
09:26 April 14
गोंदियामध्ये ऑक्सिजन आणि बेड्सचाही तुटवडा..
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात ७४२ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १२ जणांचा मृत्यू झाला. तसेच, जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, सध्या केवळ एक दिवस चालेल एवढाच साठा शिल्लक आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.
07:44 April 14
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - राज्यात कोरोनाची लाट झपाट्याने वाढत आहे. सोमवारी तब्बल 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 281 जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या राज्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे मंगळावारी स्पष्ट केले होते. आज रात्री आठ वाजेपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.