सातारा : जिल्ह्यात गेल्या 48 तासांत कोरोना बाधितांचा आकडा कमालीचा वाढला असून, काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 16 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना
12:44 April 12
सातारा : जिह्यात 1 हजार 16 लोक कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू
12:04 April 12
कोल्हापूर - परवानगी नसताना कोल्हापूरातील दुकाने उघडली, जिल्हा प्रशासनाची तारांबळ.
कोल्हापूर - जिल्हा प्रशासनाची परवानगी नसताना कोल्हापुरातील सर्व दुकाने आज उघण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करत जिल्हा प्रशासनाला प्रतिआव्हान दिले आहे.
12:03 April 12
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचा निर्णय घेऊ - पुणे व्यापारी महासंघाची भूमिका
लॉकडाऊनला विरोध दर्शवत पुणे व्यापारी महासंघाने आजपासून आपली दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु आता मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यापाऱ्यांचा मागण्यांचा विचार करू असे आश्वासन दिले होते. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे देखील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या दोघांची बैठक झाल्यानंतर दुकाने उघडण्याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाने घेतली.
12:02 April 12
कोरोनामुळे मुंबई पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रविवारी मुंबई शहरात डबल 9989 नव्या कोरोणा संक्रमित रुग्णांची नोंद झालेली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोरोणा संक्रमण थांबविण्यासाठी फ्रंट वारीयर म्हणून काम करणाऱ्या मुंबई पोलीस खात्यातील आणखीन एक पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचे कोरोणामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.
12:01 April 12
अमरावतीत थांबलेले लसीकरण तूर्त पुन्हा सुरू होण्याबाबत अनिश्चितता..
अमरावती : गेल्या दोन दिवसांच्या लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील बहुतेक नागरिक घराबाहेर पडले नाहीत. परिणामी दररोज आठ हजारांच्या आसपास होणारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अगदी अडीच हजार पर्यंत खाली आले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील तुरळक केंद्रावर अजूनही अडीच हजार नागरिकांना पुरेल एवढा लस साठा शिल्लक आहे. तो संपेपर्यंत लसीकरण सुरू ठेवली जाईल दरम्यान इतर केंद्रांवर थांबलेले लसीकरण मात्र केव्हा सुरू होईल याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
11:58 April 12
कोल्हापूर : लसीकरण सुसाट.. बंद पडलेली 200 हुन अधिक केंद्र पुन्हा सुरू
कोल्हापूर : राज्यभरासह कोल्हापुरात देखील कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा होता त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम जवळपास बंदच पडली होती. जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रांपैकी 200 लसीकरण केंद्र बंद होती. अनेक केंद्रांवर लसीकरण बंद झाले असल्याबाबत बोर्ड सुद्धा लावण्यात आले होते. मात्र शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याला 1 लाख डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल दिवसभरात सुद्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन असूनही लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील 41 हजार 130 लाभार्थ्यांना रविवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
09:53 April 12
कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी 4, 5 स्टार हॉटेलमधील बेड द्या; पालिका आयुक्तांची विनंती
मुंबई - शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेड कमी पडत आहेत. ऑक्सिजन, आयुसीयू, व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याची तक्रार रोजच येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 4 आणि 5 स्टार हॉटेलने आपले बेड उपलब्ध करून द्यावेत, आणि त्याठिकाणी प्रशिक्षित डॉक्टरांसह कोरोना केअर सेंटर सुरू करावीत अशी विनंती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केली आहे. रात्री बेड उपलब्ध होण्यासाठी वॉर्ड वॉर रूममध्ये नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढवले जात असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
09:47 April 12
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी, कोरोना नियमांचा फज्जा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यामध्ये दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊनही जाहीर केला होता. मात्र हा विकेंड लॉकडाऊन संपताच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (मार्केटयार्ड) सकाळपासूनच तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेल्याचे चित्र बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले.
09:46 April 12
नाशिक : रेमडिसिव्हरचा काळा बाजार करणारा संशयित डॉक्टर पंचवटी पोलिसांच्या ताब्यात..
नाशिक : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना एकीकडे आंदोलन करावे लागत असताना, दुसरीकडे मात्र डॉक्टरनेच तीन इंजेक्शनसाठी चक्क २५ हजार रुपये मागितल्याचा संतापजनक प्रकार पंचवटी परिसरात उजेडात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे हा प्रकार समोर आला.
09:45 April 12
मुंबई - लसीचा साठा आला, ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात आजपासून लसीकरण सुरू
मुंबई - शहरात लसीचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयात लसीकरण १० ते १२ एप्रिल बंद ठेवण्यात आले होते. पालिकेकडे लसीचा साठा आला असल्याने आजपासून पुन्हा ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आली आहेत. पालिका, सरकारीसह आजपासून पुन्हा खासगी रुग्णालयातही लसीकरण करून घेता येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
08:47 April 12
विनाकारण रस्त्यावर फिराल, तर सरळ कोव्हिड सेंटर मध्ये रवानगी..
मनमाड : मनमाड पोलीस, आरोग्य विभाग व पालिकेने लोकांच्या फिरण्यावर आळा घालण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. रात्री 8 नंतर संचारबंदी सुरू असताना देखील कोणी रस्त्यावर फिरताना आढळल्यास, जागेवरच त्याची टेस्ट करून ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्याला थेट कोव्हिड सेंटरमध्ये नेऊन टाकण्यात येत आहे.
07:59 April 12
वाशिम : कोरोनाबाधित रुग्ण डबा घेण्यासाठी बाहेर
राज्यातील कोरोनास्थिती एकीकडे चिंताजनक होत असताना, दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण कोविड रूग्णालयातून बाहेर येवून, आपला जेवणाचा डबा घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
07:59 April 12
यवतमाळ - रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाची नजर
यवतमाळ : कोरोनाबाधित रुग्णांना आवश्कतेनुसार देण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून वाटपावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.
06:04 April 12
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई : राज्यात मागील 24 तासात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 349 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात.
राज्यातील कोरोनाची स्थिती..
राज्यात 34 हजार 8 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 27 लाख 82 हजार 161रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 34 लाख 7 हजार 245 रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.