पुणे - राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी पुण्यात शिकणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
वाढता कोविड प्रकोप : राज्यातील कोरोनाची ताजी स्थिती, वाचा... - राज्य कोरोना अपडेट
19:06 April 08
राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी
19:05 April 08
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक सांगलीत दाखल, कोरोना नियोजनाचा आढावा
सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक सांगलीमध्ये दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाकडून शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रणय कुमार वर्मा यांनी दिली.
19:04 April 08
बारामतीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन
बारामती - बारामतीत मागील वर्षभरापासून रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सध्या कोरोनाच्या भीतीपोटी रक्तदाते रक्तदानाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरण सुरू असल्यानेही रक्तदात्यांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाची भीती न बाळगता लसीकरण करण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. सिसोदिया यांनी केले आहे.
19:00 April 08
लसीकरणाबद्दल केंद्राचा महाराष्ट्रासोबत दुजाभाव, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला लसीकरणाचा पुरवठा कमी - जयंत पाटील
मुंबई - सध्या राज्यात जवळपास नऊ हजार लस शिल्लक आहेत. हा पुरवठा केवळ दीड ते दोन दिवस राज्यासाठी पुरणार आहे. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र बंद करावी लागतील. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्र राज्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राची दुजाभाव का वागत आहे? इतर राज्यात रुग्णसंख्या कमी असताना महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांना लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून अधिक केला जात असल्याचा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
18:11 April 08
सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई - माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २७ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. २७ मार्चपासून तो क्वारंटाइन होता.
17:18 April 08
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची निर्मिती
नागपूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनासंसर्ग वाढत आहे. तेथील नागरिकांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर) निर्मिती करण्यात आली आहे. हा कॉलसेंटर २४ तास सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरमध्ये ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
17:07 April 08
हॉटेल, बार व्यावसायिकांचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
मीरा भाईंदर - राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांविरोधात मीरा भाईंदर हॉटेल, बारचालकांनी आंदोलन केले आहे. कोरोनाबाबतीत नियमांमध्ये शिथिलता आणा अन्यथा आत्महत्या करू, असा इशारा मीरा भाईंदर हॉस्पिटिलिटी अँड एंटरटेन्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पुत्रण यांनी दिला आहे.
16:45 April 08
कोरोनाची आपत्ती ही केंद्र सरकारची जबाबदारी - नाना पटोले
मुंबई - कोरोना लसीचा तुटवड्यावरून आता महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये वाद रंगला आहे. राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याचे काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
16:44 April 08
परभणीत 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी
परभणी - 'कोरोना'च्या संसर्ग काळात महत्त्वपूर्ण अशा 'रेमडेसिव्हीर' या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या परभणीतील हाके मेडिकलच्या मालक आणि नोकर अशा दोघांना न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल (बुधवारी) रात्री 10 वाजता उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी सापळा रचून सदर दुकानदारावर कारवाई केली होती. त्यानंतर आज (गुरुवारी) या व्यापारी आणि त्याच्या नोकरास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
16:42 April 08
वर्षभरापासून शाळा बंद असल्याने स्कूलबस चालक संकटात, राज्यपालांची घेतली भेट
मुंबई - गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्याने मार्च २०२०पासून स्कूलबस उभ्या आहेत. यामुळे स्कूलबस चालक कर्जबाजारी झाले असून उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. परिणामी शासनाने संकटकाळात मार्च २०२०पासून स्कूलबस चालकांचे थकलेले सर्व प्रकारचे कर, शुल्क आणि दंड माफ करण्याची मागणी स्कूल आणि कंपनी बस ओनर्स असोसिएशने केली आहे.
16:14 April 08
लॉकडाऊन विरोधात भाजपा रस्त्यावर; शासनाचा केला निषेध
अमरावती - ब्रेक दि चेनच्या नावाखाली राज्यभरातील बाजारपेठा बंद आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात असतानाही विनाकारण शहर आणि जिल्हा बंद करून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जातो आहे. राज्यशासनाने लॉकडाऊन त्वरित मागे घेऊन अमरावती शहरातील संपूर्ण बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी करत भाजपाच्यावतीने आज राजकमल चौकात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
16:13 April 08
कोरोनाच्या चाचणीनंतरच रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रवेश
रत्नागिरी - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांना कोरोनाच्या चाचणीनंतरच प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.
16:12 April 08
धुळे जिल्ह्यातील कोरोनाचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट व्हावी तसेच याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी केंद्राचे पथक आज धुळे शहरात दाखल झाले. या पथकाने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शहरातील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
16:10 April 08
एस्ट्राझेनकाची सीरमला नोटीस
पुणे - कोरोना आजारावरील लसीचे उत्पादन करत भारतातच नाही तर जगातल्या काही देशांना लस पुरवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला युकेमधील एस्ट्राझेनका या औषध कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे
एस्ट्राझेनका आणि सिरम इन्स्टिट्यूटया कंपन्या लस निर्मितीत पार्टनर आहेत. कोविड19 लस पुरवठा करण्यात उशीर होत असल्याने एस्ट्राझेनकाने ही कायदेशीर नोटीस सीरम ला पाठवली आहे.
15:17 April 08
केंद्रीय पथकाकडून बीडच्या आरोग्य विभागाचा आढावा
बीड - जिल्ह्यातील वाढता कोरोना व चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल झाले होते, दिल्ली येथील आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉ. रक्षा कुंडल यांनी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधील परिस्थितीची पाहणी करत बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेली उपचारपद्धती बरोबर आहे का, याची पाहणी करत उपचारासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना सूचना दिल्या.
15:16 April 08
गोंदियात कोविड लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला ब्रेक
गोंदिया - कोरोनापासून बचाव होण्याच्या उद्येशाने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी विकसीत करण्यात आल्या. जिल्ह्यात काल, बुधवारपर्यंत १ लाख ८ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य संचालनालयाकडे लसींची मागणी करण्यात आली. मात्र अद्याप साठा जिल्ह्यात पोहोचला नाही. परिणामी काल, बुधवारी जिल्ह्यातील दोन्ही लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे.
15:14 April 08
लॉकडाऊनमधील सलून, पार्लर बंदचे आदेश मागे घेण्याची सलून व्यावसायिकांची मागणी
येवला - लॉकडाऊनमधील सलून, पार्लर बंदचे आदेश मागे घ्यावे, अशी मागणी करत येवल्यातील सलून व्यासायिकांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेध फलक हातात घेऊन दुकाने उघडण्याची मागणी केली आहे.
15:12 April 08
दोन दिवसात लॉकडाऊन हटवा अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा राणांचा इशारा
अमरावती - लॉकडाऊन दोन दिवसात न हटवल्यास रस्त्यावर उतरणार, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावले. त्याला राणा यांनी विरोध केला आहे.
13:04 April 08
केंद्रीय पथक अमरावतीत दाखल; कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार
अमरावती जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय पथक अमरावतीत पोचले आहे. डॉ. अमित गुप्ता आणि डॉ., संदीप राय असे केंद्रीय पथकातील दोन तज्ज्ञांची नाव आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात हे पथक जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी करून जिल्ह्यातील वास्तविक परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत.
12:51 April 08
अन्यथा उद्यापासून दुकाने सुरू करू; पुण्यातील 50 हुन अधिक व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा
पुणे : राज्य सरकारच्यावतीने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय या नियमावलीत घेण्यात आल्या आहेत. निर्बंध लावल्यापासूनच व्यापाऱ्यांच्यावतीने याला विरोध होत आहे. आज पुण्यातील 50हून अधिक व्यापारी संघटनांच्या वतीने लक्ष्मी रोड येथे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने जर कडक निर्बंध मागे नाही घेतले, तर उद्या आम्ही सर्वच व्यापारी मिळून दुकाने सुरू करू असा इशारा देखील या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
12:30 April 08
मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस..
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस.
- राज्याचे सचिव सिताराम कुंटे यांनीही घेतली कोरोना लस.
- मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी घेतला लशीचा दुसरा डोस.
- जे जे रुग्णालयात पार पडलं लसीकरण.
11:35 April 08
लातुरात 2 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा, अन्यथा केंद्र बंद करण्याची नामुष्की
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आता गावस्तरावर सुरवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असून जिल्ह्यात 1 लाख 30 हजार जणांना लस देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लस घेण्यासाठीही गर्दी होत आहे. असे असतानाच आता लसीचा तुटवडा भासतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
11:34 April 08
आज सायंकाळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात होणार चर्चा
महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रदूर्भावावर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंग व्दारे ही चर्चा केली जाणार आहे.
11:30 April 08
कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकत्र येणे गरजेचे - शरद पवार
कोरोना महामारी काळात केंद्र सरकार राज्य सरकारला सहकार्य करत आहे. आपण सर्वांनी एकत्र येत या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन या महामारीला तोंड देणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
09:31 April 08
मुंबईतील कोरोनाचा चढता आलेख..
09:30 April 08
राज्यात बुधवारी ५९ हजार ९०७ रुग्णांची नोंद; ३२२ मृत्यू..
06:39 April 08
मुंबई : राज्यात बुधवारी तब्बल ५९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणू हा पहिल्यापासून अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात लसींचीही कमतरता आहे, आणि नागरिकांचाही लॉकडाऊनला विरोध आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. पाहूयात, राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स..