ETV Bharat / city

Corona Updates LIVE : 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी बातमी; तत्काळ नोंदणी करा आणि लस मिळवा - महाराष्ट्र कोरोना

Maharashtra Corona LIVE Updates
Corona Updates LIVE : राज्यातील कोरोनासंबंधी घडामोडीचे ताजे अपडेट्स..
author img

By

Published : Mar 31, 2021, 6:47 AM IST

Updated : Mar 31, 2021, 8:03 PM IST

19:51 March 31

45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी बातमी; तत्काळ नोंदणी करा आणि लस मिळवा

मुंबई - कोरोनाचे संक्रमण वाढत असताना 1 एप्रिल हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी लसीकरणाचा विस्तार केला जाणार आहे. यामध्ये 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लस दिली जाणार आहे. यासाठी सरकारने घालून दिलेल्या संबधित यंत्रणेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.  

लसीकरणाच्या या टप्प्यावर आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट माहिती दिली आहे की, यासाठी 'कट ऑफ डेट' जारी करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2021 पासून 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी https://cowin.gov.in या संकेतस्थळावर किंवा आरोग्य सेतूवर नोंदणी करता येणार आहे.

19:46 March 31

खासगी दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा : जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनी तत्काळ खाटांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले तसेच खासगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.  

19:46 March 31

गृह विलगीकरणाचे नियम न पाळल्यास तुमची संस्थात्मक विलगीकरणात होईल रवानगी..!

वाशिम - गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात करण्याचे तसेच कोविड विषाणू तपासणीस नकार दिल्यास अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.

17:46 March 31

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण

ठाणे - महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. विपीन शर्मा यांना ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त शर्मा अनेक बैठकांना उपस्थित होते, तसेच मागील आठवड्यात मंत्रालयात देखील कोरोना संदर्भात बैठकीला शर्मा यांनी हजेरी लावली होती.

17:40 March 31

जास्तीत जास्त लोकांचे नागपुरात उद्यापासून लसीकरण - पालकमंत्री

नागपूरमध्ये कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले -

  • सगळी परिस्थिती लक्षात घेऊन कोणाची रोजी रोटी जाईल असा निर्णय आम्ही घेणार नाही
  • खाटांसंदर्भात तक्रारी आहेत, त्याची माहिती मी रुग्णालयामध्ये जाऊन घेणार आहे.
  • खाटांचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी अधिकारी नेमण्यात आले
  • ग्रामीण भागात खाट नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत.
  • नागपुरात 250 च्या आसपास लसीकरण केंद्रे आहेत, त्यात लसीकरण होत आहे.
  • लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कोरोनावर एकमात्र औषध लसीकरण आहे.
  • जास्तीत जास्त लोकांचे उद्यापासून लसीकरण केले जाणार आहे.
  • नियमांचे पालन करणे आवश्यक

17:05 March 31

पुण्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाट वाढवण्याची गरज

पुणे - शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना खासगी आणि महापालिकेच्या तसेच सरकारी रुग्णालयात खाटांची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. शहरात सध्या 725 अत्यवस्थ रुग्ण आहेत. तर 3016 रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर आहेत. पुणे शहरात आजपर्यंत 5 हजार 270 मृत्यू झालेले आहेत. शहरातील रुग्णालयात सध्या 15 हजार 381 खाट कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहेत. यातील 3 हजार 779 बेड सध्या उपलब्ध आहेत.

16:17 March 31

नाशिकमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात खाटांची संख्या वाढवली

नाशिक - शहर परिसरात दिवसा 2 हजारापर्यंत नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नाशिक महानगरपालिकेने चार दिवसात 1019 नवीन खाट वाढवले आहेत. त्यामुळे आता 115 रुग्णालयात एकूण 4,565 खाट उपलब्ध झाले आहेत. 

नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. नाशिक जिल्ह्यात रोज 4 हजार नवीन रुग्णांची भर पडत असून ह्यात नाशिक शहरात रोज सर्वाधिक 2 हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. सध्य स्थितीत शहरात 15 हजार 908 रुग्ण उपचार घेत असून 1277 प्रतिबंधित क्षत्रे आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला असून बंद करण्यात आलेले कोविड केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. तसेच मागील चार दिवसात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता देण्यात आली असून 1 हजार 19 नवीन खाट वाढविण्यासाठी आले आहेत. 

14:54 March 31

मुंबईतील उपलब्ध कोविड खाटांची स्थिती पाहण्यासाठी 'या' नंबरवर कॉल करा

उपलब्ध कोविड खाट
उपलब्ध कोविड खाट

14:44 March 31

...तर आपल्याला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल - राजेश टोपे

मुंबई - राज्यात चाचण्या वाढवणे, बाधित रुग्ण शोधणे, प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करणे यावर सध्या भर आहे. आम्ही लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवणार आहोत. आज रुग्णालयात खाट, औषधे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतच राहिली तर आपल्याला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

13:33 March 31

लॉकडाऊनबाबत सध्या तरी निर्णय नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशातच लॉकडाऊन झाल्यास रोजगार जाऊन उपासमारीची वेळ येईल, अशी सर्वसामान्यांमध्ये भिती आहे. परंतु, सध्या तरी लॉकडाऊनबाबत निर्णय नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गर्दीच्या ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

10:09 March 31

मराठवाड्यात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात 84 मृत्यू

औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून मृतांची विक्रमी नोंद झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मागील चोवीस तासांमध्ये 84 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू औरंगाबादेत आणि नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

07:33 March 31

सोलापुरातील रुग्णालयात बेडची कमतरता नाही; सिव्हील सर्जन ढेले यांची माहिती

सोलापूर - जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात बेडची कमतरता नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन साठा असल्याची माहिती दिली. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्री कार्यक्रमावर अधिक भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

06:48 March 31

निर्णयाचे स्वागत, सरकारलाही जनभावना कळाली आहे - खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद - जिल्ह्यात लॉकडाऊन उद्यापासून सुरु होणार होते. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यासमोर दहा दिवस कसे पोट भरायचे? हा प्रश्न होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड घाबरलेले होते. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच आहे. या निर्णयाचे मी खासदार म्हणून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

06:19 March 31

औरंगाबादमधील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

औरंगाबाद - जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मंगळवारी उशिरा रात्री (दि.30) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ही माहिती दिली.

06:18 March 31

रश्मी ठाकरे मुंबईमधील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना मंगळवारी रात्री एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना 23 मार्चला कोरोनाची चाचणी लागण झाल्याचे अहवालातून समोर आले होते.

06:14 March 31

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून काही ठिकाणी प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले आहे तर, राज्यभर नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. 

दरम्यान राज्यात मागील 24 तासांत 27 हजार 918 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचला आहे.

Last Updated : Mar 31, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.