ETV Bharat / city

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर.. - महा कोरोना

Maharashtra Corona LIVE Updates on ETV Bharat
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : Jul 8, 2021, 6:26 AM IST

Updated : Jul 8, 2021, 2:26 PM IST

06:20 July 08

अमेरिकेचे जे. लुईस कोरीया यांनी घेतली मुंबईच्या कोविड प्रतिबंधात्मक कामगिरीची दखल

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटांदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. याची दखल न्यायालय, विविध राज्यांनी घेतली आहे. परदेशातील अनेक संस्थांनीही या कामाची दखल घेतली आहे. मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यात केलेल्या कामाची दखल संयुक्त अमेरिकेच्या (United States of America) सभागृहचे प्रतिनिधी सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे. लुईस कोरीया यांनी घेतली आहे. कोरीया यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आवर्जून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आयुक्तांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे.

06:20 July 08

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू राहतील असे नियोजन करा - मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई - संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे, कामगारांचे निवास, प्रवास यासाठी उद्योगांच्या मदतीने तयारी करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

06:13 July 08

दुदनकर रुग्णालयात उपचारादरम्यान 80 कोरोना रुग्णांच्या मृत्यू; डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सांगली - शहरातील डॉ. महेश दुदनकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे. कोरोना उपचाराखाली दुदनकार हॉस्पिटलमध्ये झालेल्या 80 रुग्णांचा मृत्यूला डॉक्टर दुदनकर कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. दुदनकर हॉस्पिटल व डॉक्टरांच्यावर कारवाई झाली नाही. तर, 12 जुलै रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Last Updated : Jul 8, 2021, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.