ETV Bharat / city

LIVE UPDATE : राज्यातील कोरोनासंदर्भातील ताज्या घडामोडी - कोरोना रुग्णवाढीचा आलेख वाढता

LIVE UPDATE : राज्यातील कोरोनासंदर्भातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

author img

By

Published : Apr 6, 2021, 7:02 AM IST

Updated : Apr 6, 2021, 7:46 PM IST

19:44 April 06

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी मिळणार पार्सल

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेन'च्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

19:16 April 06

कराडमधील व्यापार्‍यांचा मिनी लॉकडाऊनला विरोध, सवलतीची मागणी

सातारा - जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाने कराडच्या व्यापारी वर्गात नाराजी असून मिनी लॉकडाऊनला व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. व्यापार्‍यांना काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून केली. 

19:14 April 06

नगरपरिषद कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू

बारामती - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडील आदेशास अनुसरून मा.जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे सर्व शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांना येण्यास निर्बंध आहे. त्यानुसार बारामती नगरपरिषद आवारात व कार्यालयामध्ये नागरिकांना येण्यास निर्बंध घातलेले आहेत. नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021पर्यंत खालील प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

19:14 April 06

कोरोनाचे नियम पायदळी; जमावबंदीचेही सर्वत्र होत आहे उल्लंघन

कोल्हापूर - संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे आणि म्हणूनच राज्यात 'ब्रेक द चेन'अंतर्गत नवीन कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. सकाळपासून नेमकी कोणती दुकान उघडी ठेवायची आणि कोणती नाही, याबाबत सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने उघडून नियमित पद्धतीनेच आपले व्यवसाय सुरू ठेवल्याचे पाहायला मिळाले.

19:13 April 06

अंबाजोगाईत एकाच चित्तेवर केला आठ जणांचा अंत्यसंस्कार

बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात स्वाराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या पुढे पॉझिटिव्हचा आकडा वाढत आहे. परिणामी मृत्यू घरामध्येदेखील वाढ होत असल्याने अंबाजोगाई येथील नगरपालिकेच्या स्मशानभूमीत एकाच चितेवर आठ जणांचे अंत्यविधी करण्याची वाईट वेळ पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यावर आली आहे. असा प्रकार सहा महिन्यापूर्वीच अंबाजोगाई येथेच घडला होता. पुन्हा दुसऱ्यांदा मंगळवारी अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच वेळी, एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आले आहेत.

18:05 April 06

मुंबईत ३० एप्रिलपर्यंत चौपाट्या, मैदाने, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद

मुंबई - महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार ३० एप्रिलपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ७ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत चौपाट्या, मैदाने, मंदिरे, मॉल, जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, आदी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

18:03 April 06

कडक नियमावलीनंतरही दुकाने उघडी, पोलिसांनी केली बंद

मुंबई - कोरोना संक्रमणाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य शासनाकडून नवीन कडक निर्बंध सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून लागू करण्यात आलेले आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेतील गोष्टींना परवानगी देण्यात आलेली असून यात मेडिकल, फळ-भाज्या व किराणा मालाच्या दुकानांसह बेकरीसारखी दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

17:06 April 06

बिगर भाजपा सरकारमध्येच केंद्राचे पथक कसे? काँग्रेसचा सवाल

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना या स्थितीत मदत करण्या ऐवजी केंद्राकडून याचे राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने केवळ बिगर भाजपाशासित राज्यांचीच निवड का, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. 

17:04 April 06

कोरोना लसीकरण पुरवठ्यासंबधी नवी मुंबईवर अन्याय - गणेश नाईक

नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपाला लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के कमी लसी दिल्याचा आरोप भाजपा नेते गणेश नाईक यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका व नवी मुंबई महापालिका यांच्यात राज्य सरकारने दुजाभाव केल्याचे ते म्हणाले.

17:03 April 06

मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीनंतरच प्रवेश

सांगली - जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका प्रशासनाने आता महापालिका क्षेत्रात बाहेरून विशेषतः मुंबई, पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे, तपासणी करूनच आता शहरात प्रवेश मिळणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी याबाबत पालिका प्रशासनाला तपासणी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 

15:32 April 06

उत्तर महाराष्ट्रात रेमडिसिवीरच्या तुटवड्यामुळे नागरिकांच्या रांगा

नाशिक - जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख फार्माबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या असून कोरोनाने भीषण रूप धारण केल आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडिसिवीर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

15:30 April 06

मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद

मुंबई - राज्यासह मुंबईतसुद्धा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचसोबत नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर गार्डन, समुद्र किनारे, मंदिरे यांनाही राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

14:09 April 06

लॉकडाऊन लागल्यास उपासमारीची वेळ येईल - व्यापारी संघटना

मुंबई : राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी व्यापारी संघटना पुढे येत आहेत. मुंबईतील व्यापारी संघटनांनी सरकारला लॉकडाऊन न करण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी संघटनानी एक पत्रक काढून लॉकडाऊन करू नये असे आवाहन केले आहे.

14:07 April 06

'कोल्हापुर चेंबर ऑफ कॉमर्स'चा नवीन नियमावलींना विरोध

कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने नवीन निर्बंधांना तीव्र विरोध केलाय. आम्ही विकेंड लॉकडाऊनला सहकार्य करायला तयार होतो. मात्र आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचे व्यवसाय बंद करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमच्यावर सक्ती केल्यास आम्ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सेवाही बंद करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

14:07 April 06

नागपुरात व्यापाऱ्यांचा निर्बंधांना विरोध

नागपूर : नागपुरात व्यापाऱ्यांनी नव्या निर्बंधांना विरोध दर्शविला आहे. दुकानांसमोर उभे राहून या निर्बंधांचा विरोध करत दुकाने खुली करण्याची परवानगी व्यापाऱ्यांनी मागितली आहे.
 
14:06 April 06

बारामतीत टाळेबंदीवर व्यापाऱ्यांची नाराजी

बारामती : जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच आस्थापना ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी रात्री जारी केले आहेत. त्यानुसार आज बारामतीत प्रशासनाच्या वतीने सर्वच दुकाने बंद करण्यास सांगितले. अनपेक्षितपणे दुकाने बंद करण्यास सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

14:02 April 06

अशा निर्बंधांमुळे जगायचे की मरायचे, सोलापुरातील रिक्षा चालकांचा सवाल

सोलापूर : रिक्षामध्ये फक्त दोनच प्रवाशांना परवानगी देण्यात आल्यावर सोलापुरातील रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. आणि दुसरीकडे रिक्षावाल्यांना फक्त दोनच प्रवाशांना नेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमावलीत मरायचे की जगायचे असा प्रश्न रिक्षावाले विचारत आहेत.

13:03 April 06

आरोग्यमंत्र्यांनी मालेगावच्या रुग्णालयाची केली पाहणी

नाशिक : धुळे दौऱ्यावर असलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मंगळवारी अचानक मालेगावला भेट देत सामान्य रुग्णलयासह महापालिकेच्या रुग्णलयांची पाहणी केली. 

13:02 April 06

कोल्हापुरात 5 दिवसांत 572 नवे रुग्ण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. काल दिवसभरात 111 नवे रुग्ण आढळले आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 एप्रिल ते 5 एप्रिल या 5 दिवसांत तब्बल 572 रुग्ण वाढले आहेत तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

13:00 April 06

मनमाडमध्ये मद्य खरेदीसाठी झुंबड

मनमाड : सोमवारी रात्री 8 वाजेपासून बंद होणाऱ्या वाईनशॉपवर मद्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. मद्य खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

12:59 April 06

कळसाचे दर्शन घेऊन साईभक्त परतीच्या प्रवासाला

शिर्डी : साई मंदिर बंद असल्याने भाविक साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परत जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सरकारच्या निर्देशांनुसार सोमवारी रात्री आठनंतर साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीत आज रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र बघायला मिळाले.

12:57 April 06

भंडाऱ्यात मजुर कामाच्या शोधात रस्त्यावर

भंडारा : शासनाच्या आदेशानुसार मंगळवारपासून भंडारा जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहेत. जमावबंदीचे आदेश असल्याने रस्त्यावरची वर्दळ कमी होती. मात्र कामाच्या शोधातील मजूर मात्र शहरातील रस्त्यावर बघायला मिळाले.

12:54 April 06

नाशिकमध्ये 25 दिवसांच्या मिनी लॉकडाऊनला सुरवात, बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक : नाशिक जिल्ह्यात 25 दिवसांच्या मिनी लॉकडाऊनला सुरवात झाली असून शासन निर्णयानंतर सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे इतर उद्योग धंदे, सार्वजनिक वाहतुक सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के वर्दळ दिसून येत आहे.

10:43 April 06

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस
पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. नागरीकांनी न घाबरता लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

10:38 April 06

दादर मार्केटमध्ये पुन्हा तुडुंब गर्दी

दादर मार्केटमध्ये तुडुंब गर्दी
दादर मार्केटमध्ये तुडुंब गर्दी

राज्यात नवे निर्बंध लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही दादर मार्केटमध्ये तोबा गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मंगळवारीही दादर मार्केटमध्ये चांगलीच गर्दी झाली. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे चित्र दादरमध्ये बघायला मिळाले.

08:57 April 06

पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाची विशेष सभा ऑनलाईन आयोजित केलेली असतानाही सभागृहात दाखल झालेल्या 15 नगरसेवकांवर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यात शेकाप आणि महाविकास आघाडीच्या 14 तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

08:36 April 06

कोरोनाची लागण झालेली असतानाही बाहेर फिरणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : सक्तीच्या गृह विलगीकरणात असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या 4 कोरोनाग्रस्तांवर नवी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. यात नेरूळमधील एका दाम्पत्यासह जुईनगरमधील दोन महिलांचा समावेश आहे.

08:34 April 06

शेजारील राज्यातूनही रुग्ण येत असल्याने नागपुरात बेड मिळण्यास अडचणी

नागपूर : नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयावरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात जिल्ह्यासह परराज्यातूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. यामुळे रुग्णालयात एकाच बेडवर दोन रूग्णांवर उपचार करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा वाढता ताण पाहता नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

07:51 April 06

कायद्याच्या चौकटीत राहून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा - मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दर दिवशी वाढ होत असताना यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करताना कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या आहेत.

07:13 April 06

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्याबाबत रात्री उशिरा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ६ एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत या सर्व परीक्षा पार पडणार होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिवाजी विद्यापीठाने या परीक्षा रद्द करत असल्याचे पत्रक जारी केले आहे.

06:44 April 06

LIVE UPDATE : राज्यात सोमवारी 47 हजार 288 कोरोनाबाधितांची वाढ; 155 मृत्यू

राज्यात कोरोनाचा वाढता आलेख
राज्यात कोरोनाचा वाढता आलेख

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ कोरोनाबाधित वाढले असून, १५५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४,५१,३७५ सक्रीय रुग्ण आहेत.

दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती.

राज्यात 26 हजार 252 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत

राज्यात आतापर्यंत 25 लाख 49 हजार 075 रुग्णांनी कोरोनावर मात केली

राज्यात नव्या 47,288 रुग्णांची नोंद झाली आहे

राज्यात 155 रुग्णांचा मृत्यू  झाला झाला असून मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे

राज्यात एकूण 30 लाख 57 हजार 885 रुग्णांची नोंद झाली

राज्यात एकूण सक्रीय रुग्ण 4 लाख 51 हजार 375

हेही वाचा - शरद पवारांचे स्वीय सहाय्यक ते कॅबिनेट मंत्री, अशी आहे वळसे-पाटलांची कारकिर्द

कोणत्या भागात किती रुग्ण

मुंबई महानगरपालिका- 9879
ठाणे- 839
ठाणे मनपा- 1,623
नवी मुंबई-1,196
कल्याण डोंबिवली- 1,426
उल्हासनगर-147
मीराभाईंदर-498
पालघर-138
वसई विरार मनपा-544
रायगड-285
पनवेल मनपा-507
नाशिक-1,429
नाशिक मनपा-2,647
अहमदनगर-1,117
अहमदनगर मनपा-659
धुळे- 252
जळगाव-461
जळगाव मनपा-117
नंदुरबार-405
पुणे- 1,820
पुणे मनपा- 4,250
पिंपरी चिंचवड- 2141
सोलापूर- 471
सोलापूर मनपा-214
सातारा - 747
सांगली- 179
औरंगाबाद मनपा 777
औरंगाबाद-275
जालना-1055
हिंगोली-111
परभणी -164
परभणी मनपा-165
लातूर मनपा-315
लातूर 471
उस्मानाबाद-241
बीड -589
नांदेड मनपा-444
नांदेड-448
अकोला मनपा-326
अमरावती मनपा-115
यवतमाळ-277
बुलडाणा-1,253
वाशिम - 209
नागपूर- 1,072
नागपूर मनपा-2,556
वर्धा-320
भंडारा-651
गोंदिया-246
चंद्रपुर-202
चंद्रपूर मनपा-120

Last Updated : Apr 6, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.