मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress on PM speech in Loksabha ) प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र ृसंदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्राने कधीही परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील मजुरांमध्ये दुजाभाव केला नाही, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र संदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी ( Controversial statement of PM in Loksabha ) आहेत. कोरोना काळात परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राने अतिशय चांगल्या पद्धतीने मदत ( MH helped labors in pandemic ) केली. त्यांना त्यांच्या गावापर्यंत जायला सुविधाही उपलब्ध करून दिली. मात्र असे असतानाही पंतप्रधानांनी महाराष्ट्र संदर्भात काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहेत. केवळ एका राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी दुसऱ्या राज्याची बदनामी करणे हे सर्वथा चूक आहे.
हेही वाचा-Priyanka Gandhi Goa Elections : बेरोजगारीत गोव्याचा दुसरा क्रमांक -प्रियंका गांधी
पंतप्रधानांना हे शोभत नाही
पंतप्रधानांना हे शोभत नाही. महाराष्ट्र नेहमीच राज्यातील मजुरांचे सोबतच परप्रांतीयांना ही मदत करत आला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-Mumbai Share Market Update :मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर 1,024 अंशांची पडझड
पंतप्रधान लोकसभेत काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत. पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली. मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरविला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले. कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.