मुंबई - फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे.
आज महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या हत्येला भाजप समर्थन करत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो. भाजपने बंदला विरोध केला. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा या बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते, असे नाना पटोले म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. तर, भाजपाकडून मात्र या बंदवरून महाविकासआघाडीवर जोरादार टीका केली जात आहे. हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले की, मागच्या वर्षी नैसर्गिक आपत्ती झाली त्याची पाहणी करायला केंद्राची टीम आता आली आहे. रस्त्यावर भाजप उतरले नाही म्हणून त्यांना बंद कळला नसेल. मराठवाडा, विदर्भ येथील अतिवृष्टी झालेल्या भागाला मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. ज्या कोणी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली त्याचे आम्ही समर्थन करत नाही. बंदसाठी जबरदस्ती झाली असेल त्याचे काँग्रेस समर्थन करत नाही हा सरकरचा बंद नव्हता हा पक्षीय बंद होता. विरोधक जो आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही.
वसुलीची जाणीव अमृता फडणवीस यांना अधिक असेल -
नाना पटोले म्हणाले की, अमृता फडणवीस मला माझ्या सुनेप्रमाणे आहेत. महाराष्ट्रात 19 संच बंद पडले आहेत. भारतीय जनता पक्ष च्या विरोधात असणारे राज्यांमध्ये विजेची टंचाई निर्माण केली जाते. महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थान या राज्यांना जाणून बुजून तुळजापूरला जात नाही. नैसर्गिक आपत्तीचा संकट असल्याकारणाने कोळसा दिला जाऊ शकत नाही, अशी कारणे महाराष्ट्राला दिली जात आहे. राज्याचे ऊर्जामंत्री सातत्याने केंद्रातील मंत्री तसेच अधिकाऱ्यांशी संपर्कात असूनही केवळ राजकीय हेतू पोटी कोळसा दिला जात नाही.