मुंबई गणरायाच्या आगमनाने अख्खा महाराष्ट्र गजबजला आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Maharashtra CM Eknath Shinde गणेशोत्सव 2022 पार्श्वभूमीवर बाप्पाची स्थापना केली. सर्व भक्तजण मनोभावे गणेश पुजा करून, गणरायाला आपापल्या घरी विराजमान करत आहे. अगदी मुख्यमंत्र्यांही गणेश पुजा उत्साहात केली.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर आज सकाळीच बाप्पाची स्थापना केली. तसेच सहकुटुंब मनोभावे बाप्पा आरती केली. गणरायाच्या आगमनाने अख्खा महाराष्ट्र गजबजला आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच इतक्या उत्सहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वभक्त जणांमध्ये उत्साह, आनंद दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा Dhol Pathak Ganeshotsav 2022 चारही दिशांना घुमणार ढोल-ताशांचा आवाज, गणेशोत्सवासाठी ढोल पथक सज्ज