ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Meeting Today : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक.. नव्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मागील पंधरा दिवसांत एकही मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. पावसाळी अधिवेशनानंतर गणेशोत्सव आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde गणेश दर्शन करण्यात व्यस्त राहिल्याने मंत्रिमंडळ बैठक घेण्यास मुहूर्त मिळाला नव्हता. आता गणेशोत्सव संपल्याने मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी १० वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन Maharashtra Cabinet Meeting Today केले आहे.

Maharashtra Cabinet meeting today
Maharashtra Cabinet meeting today
author img

By

Published : Sep 12, 2022, 8:35 AM IST

मुंबई - राज्यातील काही भागात होत असलेली अतिवृष्टी Heavy rains in Maharashtra परिणामी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल Farmers are scared due to flood झाला आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात Monsoon session जाहीर केलेली मदत तब्बल तीन आठवड्याने देण्याचा अद्यादेश काढला. अतिवृष्टी सुरूच असून शेतकऱ्यांच्या समस्येत यामुळे भर पडत आहे. त्यात मागील पंधरा दिवसांत एकही मंत्रिमंडळ बैठक झाली नाही. पावसाळी अधिवेशनानंतर गणेशोत्सव आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde गणेश दर्शन करण्यात व्यस्त राहिल्याने मंत्रिमंडळ बैठक घेण्यास मुहूर्त मिळाला नव्हता. आता गणेशोत्सव संपल्याने मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी १० वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन Maharashtra Cabinet Meeting Today केले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांसाठी मुख्यमंत्री आजच्या बैठकीत कोणते निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

गेल्या पंधरवड्यात शिंदेंनी एकही मंत्रिमंडळ बैठक घेतली नाही- राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे घोषणा केली. मुख्यमंत्री होताच शेतकरी आत्महत्या मुक्त करू, असा निर्धार व्यक्त केला. राज्यातील काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सरकारने या शेतीचे पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषांहून मदत देण्याची घोषणा केली. पावसाळी अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे निर्देश प्रशासनाला दिले. मात्र, मदतीचा अद्यादेश काढण्यासाठी सुमारे तीन आठवड्याचा कालावधी लागला. लिखापटी कारभार न करता एका फोनवर कामे करण्याचा छातीठोकपणे दावा केला. अल्पावधीतच मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दावा फोल ठरला आहे. शेतकरी चिंताग्रस्त असताना गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी एकही मंत्रिमंडळ बैठक घेतली नाही. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गाऱ्हाणे घालण्यास पालकमंत्री नाहीत. मुख्यमंत्रीही गणेश दर्शनांत तर उपमुख्यमंत्री आगामी निवडणुकांच्या तयारीत व्यस्त राहिल्याने ऐन गणेशोत्सव काळात शेतकरी मदतीविना शेतकरी उपेक्षित राहिला.

बळीराजा चेतना, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन बासनात - शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाने बळीराजा चेतना अभियान,Baliraja Chetna Abhiyan by Maharashtra Govt वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन Vasantrao Naik Agriculture Self Reliance Mission केले होते. सध्या हे दोन्ही उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा हा आकडा मोठा आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजना सुरू होणार का.? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आढावा आणि निर्देश - दडी मारलेल्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीची माहिती घेऊन पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांनी एकही मंत्रिमंडळ बैठक बोलावली नाही. विरोधकांनी यावर निशाणा साधताना गणेशोत्सव संपला असून आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.