- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल झाले असून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच चिपळूण येथील हॉटेल अभिषेक येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकही घेतली.
MAHARASHTRA BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल, बाजारपेठेची केली पाहणी - रायगड,कोल्हापूर पाऊस
14:46 July 25
13:44 July 25
मुंख्यमंत्र्यांकडून चिपळूणमध्ये पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत.
13:40 July 25
एनडीआरएफच्या 34 तुक़ड्यांकडून बचावकार्य सुरू
मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने 100 पेक्षा जास्त जणांचे बळी केवळ दरड कोसळल्याच्या घटनेत गेले आहेत. पूरपरिस्थितीच्या ठिकाणी आमचे बचावकार्य सुरूच आहे. एकूण 34 टीमकडून सध्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासोबतच रायगड, सातारा जिल्ह्यातील दुर्घटनास्थळी बचावकार्य केले जात आहे. 7 पथके कर्नाटक आणि 8 पथके तेलंगणा मध्ये कार्यरत आहेत.अशी माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली
13:39 July 25
कृषीमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला भाजपकडून अडविण्याचा प्रयत्न..दाखवले काळे झेंडे
अमरावती- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आज विदर्भ दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची दादा भुसे पाहणी करत आहेत. दादा भुसे अमरावती दर्यापूर मार्गावरून जात असताना बोरखेडी नजीक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री यांचा काळे झेंडे दाखवून निषेध देखील केला. खरतर पावसाने अमरावती जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिमंत्री यांनी केवळ काही ठिकाणीच पाहणी दौरा केला. मात्र भातकुली तालुक्यात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असताना कृषिमंत्री दादा भुसे यांनी पाहणी करायला हवी होती. आमच्या समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या. मात्र दादा भुसे हे भर वेगात निघून गेलेत, असा आरोप भातकुली तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांनी केला आहे.
13:20 July 25
देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत कोकण पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते यांनी दिली तळये गावाला भेट
12:21 July 25
उद्योगपती राज कुंद्रा यांचे चार कर्मचारी देणार साक्ष
उद्योगपती राज कुंद्रा यांचे चार कर्मचारी साक्षीदार म्हणून पुढे आले आहेत. पॉर्न व्हिडिओ निर्मिती प्रकरणात ते साक्ष देणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली
12:01 July 25
वरळीत लिफ्ट कोसळून 5 ठार झाल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई - वरळीमध्ये एका निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी इमारतीचा कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने या पाच जणांच्या मृत्यूला त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
10:52 July 25
चिपळूण - गेल्या वेळी जो सांगलीत पूर आला होता, त्याच्या पेक्षा लवकर मदत कार्य चिपळूणमध्ये सुरू झाले आहे. तसेच मदत मिळते की नाही यावर स्वतः मुख्यमंत्र्यांचा लक्ष असल्याचेही संजय राऊत म्हणाले.
10:41 July 25
विरोधकांची नेमकी कोणाला भीती वाटते, पेगॅसिस प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा
राऊत ऑन पेगसस ;
मुंबई - राजकारणात हेरगिरी करणं हे काय नवीन नाही, पेगॅसिस सॉफ्टवेअर प्रकरणी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हिंदुस्तानात अशा घटना आता वारंवार होत आहेत. मात्र, हे कोण करत आहे, विरोधकांची नेमकी कोणाला भीती वाटते आहे याचा खोलवर तपास करणे गरजेचे आहे. साडेतीनशे कोटीच्या वर कोणीतरी वेगळे पैसे दिले आहेत. हे पैसे कोणी दिलं कोणाच्या खात्यातून गेले. यामागे कोण आहेत याचा शोध घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हेरगिरी प्रकरणी दिली.
09:46 July 25

शुक्रवारी कोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून 42 जणांचा मृत्यू झाला. पोलादपूरमध्येही दरड कोसळून 10 जणांचे बळी गेले. तसेच चिपळूण शहरला पूराने वेढा दिला. यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांच्यासोबत आज विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, दरेकर यांनी हेलिकॉप्टरने कोकणचा पाहणी दौरा सुरू केला आहे.
09:41 July 25
महाराष्ट्र मान्सूनचा पाऊस विश्रांती घेणार - हवामान विभाग
08:47 July 25
एनडीआरएफच्या आणखी 8 तुकड्या तैनात, 34 पथकांकडून बचावकार्य सुरू
राज्यात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागात पूरस्थिती निर्माण झाली. त्या दृष्टीने एनडीआरएफने आणखी 8 पथके पूरग्रस्त भागात तैनात केली आहेत. आतापर्यंत राज्यात एनडीआरएफच्या एकूण 34 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
08:42 July 25
सांगलीत पूरस्थिती कायम.., अर्धे शहर पाण्यात
सांगली - सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फुटांवर,अर्धी सांगली झाली जलमय,तर ताकारी येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 4 फुटांनी घटली आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने हळूहळू पाणी पातळी खालावली जाणार आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
07:47 July 25
चिपळूण पूर- भास्कर जाधव यांनी उघड केला प्रशासनाची बेजबाबदारपणाची पोलखोल.
रत्नागिरी- भास्कर जाधव यांनी उघड केला प्रशासनाची बेजबाबदारपणाची पोलखोल. शनिवारी पार पडलेल्या चिपळूणच्या आढावा बैठकीमध्ये भास्कर जाधव भडकले.
जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सगळ्या भयानक पूर परिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. चिपळूणमध्ये पूरपरिस्थितीच्या अगोदर सायरन का वाजत नाही. पूर परिस्थिती गंभीर असताना पोलीस कुठे होते अशा प्रश्नांची सरबत्ती करत आमदार भास्कर जाधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच ज्या ठिकाणी पूल खचल्याच्या घटना घडल्या आहेत.त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का नाही, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला
06:09 July 25
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाडमधील तळई दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.
चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मुख्य बाजारपेठ आणि नागरी वस्तीत सहा ते सात फूट पाणी शिरले होते.