ETV Bharat / city

Breaking News Live : ड्रग्स पुरवणाऱ्यांचं नेटवर्क उध्वस्त करा- मुख्यमंत्री प्रमोद सावंत - 2 सप्टेंबर लेटेस्ट न्यूज

breaking
फाईल फोटो
author img

By

Published : Sep 2, 2022, 6:43 AM IST

Updated : Sep 3, 2022, 2:03 PM IST

22:50 September 02

ड्रग्स पुरवणाऱ्यांचं नेटवर्क उध्वस्त करा- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राज्य प्रशासन आणि पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील अंमली पदार्थ विरोधी सेल अधिक बळकट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राज्य प्रशासन आणि पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील अंमली पदार्थ विरोधी सेल अधिक बळकट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सहज उपलब्ध होणारे ड्रग्स बनली गोव्याची डोकेदुखी - राज्यात मागच्या काही वर्षापासून सहजरित्या उपलब्ध होणारे ड्रग्स ही सरकारची डोकेदुखी बनली असून या रक्षा सेवनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्याचे परिणाम गोवा सरकारला भोगावे लागत आहेत. राज्यात द्राक्ष उपलब्धतेमुळे अनेक देशी-विदेशी पर्यटक सहजरित्या गोवा देऊन ड्रग्स सेवन करतात त्यामुळे अनेक हत्याकांड किंवा गुन्हेगारी संबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच घडलेल्या सोनाली फोगाट हत्याकांडामुळे गोव्याचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम व्हायला सुरुवात झाले आहे.

22:48 September 02

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी दिली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन गणपती दर्शन घेतले.

22:40 September 02

गेल्या 34 वर्षांमध्ये या पुण्याला एक वेगळी ओळख या पुणे फेस्टिवलने दिली- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुणे फेस्टिव्हलमध्ये म्हणाले की मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने गेल्या 34 वर्षांमध्ये या पुण्याला एक वेगळी ओळख या पुणे फेस्टिवलने दिली आहे. आपण इतिहासामध्ये वाचलं होतं की परकीय आक्रमण झालं आणि गाढवाचा नांगर याच्यावर फिरवला आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्याला पुन्हा एक नवीन ओळख दिली तो छत्रपती शिवरायांचा जो सोन्याचा नांगर होता तो इतका पावरफुल होता की तेव्हापासून येथे नर रत्नांची खाण सुरू झाली आहे. आणि या पुण्यामध्ये आपल्याला एका पेक्षा एक असे समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थाने लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रातील लोक पाहायला मिळतात.

21:28 September 02

इक्बाल कासकर ओपन हार्ट सर्जरीसाठी मुंबईत रुग्णालयात दाखल

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर ओपन हार्ट सर्जरीसाठी मुंबईत रुग्णालयात दाखल झाला.

19:04 September 02

मनसे कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आलेल्या महिलेची शिवसेनेच्या महिला नेत्यांनी घेतली भेट

शिवसेनेच्या महिला शिष्टमंडळाने मनसे कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आलेल्या पीडित महिलेची तीच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.

18:13 September 02

4 दिवसांत 1293 प्रकरणे निकाली, सरन्यायाधीशांची माहिती

गेल्या 4 दिवसांत, आम्ही अशा प्रकरणांची यादी केली आहे ज्यांची संख्या जास्त होती. न्यायालयाने 4 दिवसांत निकाली काढलेल्या विविध प्रकरणांची एकूण संख्या 1293 होती. निकाली काढलेल्या नियमित प्रकरणांची संख्या यापूर्वी 106 होती.. तुम्ही जेवढे आणू शकता तेवढे निकाली काढण्याचा SC प्रयत्न करेल, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

17:15 September 02

अफगाणिस्तानातील हेरातमधील मशिदीत स्फोट; मौलवीसह 18 ठार

काबूल - उत्तर अफगाणिस्तानातील हेरात शहरातील एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात एका प्रमुख मौलवीसह किमान 18 जण ठार तर 21 जण जखमी झाले. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हेरात शहरातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी सामान्यतः जास्त गर्दी असते.

16:58 September 02

विराट कोहली सुरु करणार किशोर कुमारांच्या मुंबईतील बंगल्यात रेस्टॉरंट

क्रिकेटपटू विराट कोहली दिग्गज गायक दिवंगत किशोर कुमार यांच्या मुंबईतील बंगल्यात रेस्टॉरंट सुरू करणार आहे. यासंदर्भातील माहिती किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी दिली आहे.

16:42 September 02

10 आणि 11 सप्टेंबरला राष्ट्रवादीचे दोन दिवशीय अधिवेशन होणार; शरद पवार करणार मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील राजकीय रणनीती ठरवण्याच्या अनुशंगाने 10 आणि 11 सप्टेंबरला अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. या दोन दिवशीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. आगीमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे.

16:08 September 02

Gujarat Riots Case 2002 : सर्वोच्च न्यायालयाकडून तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड Supreme Court grants interim bail to activist Teesta Setalvad यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. २००२ च्या गुजरात दंगलीत Gujarat Riots Case 2002 निष्पाप लोकांना फसवण्यासाठी कागदपत्रे बनवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. शिवाय न्यायालयाने त्यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे.

15:48 September 02

'त्या' महिलेला मारहाण करणाऱ्याला तत्काळ अटक करा; महिला आयोगाचे महाराष्ट्र डीजीपींना पत्र

मुंबई - मुंबईतील कामाठीपुरा 28 सप्टेंबरला पुरुषाने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आता प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्र डीजीपींना पत्र लिहिले आहे. संबंधित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केली आहे. शिवाय या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणीही केली आहे. सोबतच केलेल्या कारवाईची पाच दिवसांत माहिती द्यावी, असेही आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

14:59 September 02

मुंबईतून 4 कोटी किमतीचा गांजा जप्त; एनसीबी पथकाची कारवाई

मुंबई - एनसीबी मुंबई पथकाने 4 कोटी रुपये किमतीचा 210 किलो गांजा जप्त केला आहे. काल गुरुवारी ही कारवाई झाल्याची माहिती आहे. हा गांजा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात नेला जात होता. यात एका व्यक्तीला वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनासह अटक केली असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

13:54 September 02

धक्कादायक ! भांडुपमध्ये 9 वर्षीय चिमूकलीवर बलात्कार; दोन वर्षांपासून करत होते अत्याचार

भांडुपमध्ये ९ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गेली दोन वर्षांपासून चिमूकलीवर सातत्याने आरोपी बलात्कार करत असल्याचे पुढे आले आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ६२ आणि ६५ वयोगटातील २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

13:19 September 02

मंत्रिमंडळात 23 नव्या मंत्र्यांची भर पडणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

शिंदे भाजपा सरकारमध्ये नव्या 23 मंत्र्यांचा लवकरच समावेश होणार असल्याची माहिती भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मंत्री मंडळात आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

12:53 September 02

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये भेट!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15 ते 20 मिनिटे झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण नाराज असल्याने भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे पुन्हा भेटीच्या चर्चांना उधाण आले आहे.

11:54 September 02

चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन तीन दिवसात जमीनदोस्त होणार - नितीन गडकरी

पुण्यातील चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडकले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात जावून या पुलाची पाहणी देखील केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील याची दखल घेतली आहे. आज पुणे दौऱ्यावर असलेल्या मंत्री गडकरींनी चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार असल्याचे म्हटले आहे.

10:52 September 02

बेस्टच्या खासगी बसवरील कामगारांचा संप

मुंबई - बेस्टच्या शिवाजी नगर आगारातील टि एम एल टाटा मोटर्स लिमिटेडच्या बस चालकांचा संप सुरू. संपामुळे बस आगारातून एक ही बस आगारातून बाहेर पडली नाही. सकाळपासून 80 बस आगरातच. बेस्ट उपक्रमाने कंत्राटी बस चालकांकडून कालपासून प्रवासात बस तिकीट आकारणी सुरू केल्यामुळे आंदोलन सुरू. इतर बस आगारातही हीच परिस्तिथी असल्याची माहिती.

09:50 September 02

15 हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित सूर्यनमस्कार करून गणपती बाप्पाला केले वंदन

पुणे - सूर्यनमस्कार हे सर्व सक्षम ताकदीचे द्योतक आहे. यातून एक सज्ञान आणि सुसंस्कृत मनुष्य निर्मिती व्हावी यासाठी पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कार करत आज गणपती बाप्पाला वंदन केले.

लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि इंस्टिट्यूट ऑफ योगा पुणे या तीन संस्थांच्या माध्यमातून आज सकाळी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला वंदन केले. पुण्यातील 7 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

09:33 September 02

पंतप्रधान आज INS विक्रांत लाँच करणार

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) शुक्रवारी भारताच्या सागरी इतिहासातील सर्वात मोठी स्वदेशी विमानवाहू 'INS विक्रांत' लाँच करणार आहेत. ( Pm Modi To Launch INS Vikrant Today ) पंतप्रधान मोदी कोचीन शिपयार्ड येथे 20,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या स्वदेशी अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणांसह INS विक्रांत या विमानवाहू जहाजाचे काम करतील.या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एक "नवीन नौदल ध्वज (symbol) अनावरण करतील,

08:39 September 02

महिनाभरात एफटीआयआयमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

पुणे - मागील एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. 5 ऑगस्ट रोजी एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केली होती. अश्विन शुक्ला असे ( रा गोवा) या मुलाचे नाव आहे. तो शेवटच्या वर्षांत शिकत होता. तर काल 1 सप्टेंबर रोजी नैनिताल येथील विद्यार्थीने एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली आहे. एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

07:34 September 02

हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच!; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर प्रहार

मुंबई - आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकावर टीका करण्यात आली आहे. सरकारच्या हिंदुत्वाच्या विचारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. “हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच!”, असं म्हणत सरकावर टीका करण्यात आली आहे.

07:12 September 02

संततधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली

नाशिक - संततधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

06:57 September 02

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा काठमांडूच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचा देखावा

मुंबईतील वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा काठमांडूच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाची धून पाहायला मिळत आहे.

06:26 September 02

Maharashtra Breaking News ड्रग्स पुरवणाऱ्यांचं नेटवर्क उध्वस्त करा- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुंबई - मुंबईत गुरुवारी दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आहे. रात्री १२ वाजेपर्यंत ५५,६३२ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी २२,६८७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

Last Updated : Sep 3, 2022, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.