संपूर्ण भारतामध्ये समान नागरी कायद्याची मागणी करणारी याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Breaking News Live : समान नागरी कायद्याची याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - आजच्या ताज्या बातम्या
20:41 September 01
समान नागरी कायद्याची याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
18:56 September 01
लवकरच मंत्रीमंडळात नव्या मंत्र्यांची पडणार भर; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, त्यात 23 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती राज्याचे वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. येत्या काही दिवसांत गणोशोत्सवानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.
17:18 September 01
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतीर्थावर बाप्पाचं घेतलं दर्शन
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी गणरायाचं दर्शन आणि राजसाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी ही भेट झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
17:02 September 01
भिवंडीपासून ते विरारपर्यंत जवळपास 1500 गावांचा वीजपुरवठा खंडित; दुरुस्तीचे काम सुरु
ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघ्यापासून ते पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंतच्या जवळपास 1500 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून आज सकाळी 10 वाजल्यापासून युध्द पातळीवर तांत्रिक बिघाड झालेल्या पडघा सब स्टेशनच्या ठिकाणी दुरुस्ती काम सुरू असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
16:55 September 01
गोदावरीच्या पुरात चारजण अडकले, पुरामुळे घडली दुर्घटना
यंदा मान्सूनची कृपादृष्टी ही उत्तर भारतावर जरा अधिकचीच पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पिकांचे नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. चारजण झोपेतच असताना घडलेल्या या घटनेची शहरभर चर्चा सुरु आहे.
16:15 September 01
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंबानींच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी जावून बाप्पाचे दर्शन घेतले.
16:04 September 01
पृथ्वीराज चव्हाणांवर पक्षातूनच कारवाईची मागणी; राहुल गांधींविरोधात केली होती टिप्पणी
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भारतीय काँग्रेसचे देशाबाहेरील कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसमध्ये व्यापक बदल व्हावे अशी आग्रही मागणी करणाऱ्या जी-23 समूहाचा भाग आहेत. चव्हाण हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात बोलले असल्याचा आरोप वशिष्ठ यांनी केला आहे.
13:52 September 01
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेणार असल्याच्या बोलल्या जात आहे. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंनी सागर बंगल्या जावून भेट घेतली होती, अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळेंनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
13:04 September 01
मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेश मूर्तीचे विसर्जन
मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 64 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी घरगुती 16 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे
12:54 September 01
लालबाग राजाला पहिल्या दिवशी दान केलेल्या रक्क्मेची मोजणी सुरू
लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची आणि नीधीची आजपासून मोजदात सुरू करण्यात आलीय. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळांने बॅंक ॲाफ महाराष्ट्र आणि महानगर बॅंकचे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही मोजदात सुरू केली आहे. लाखोंच्या संख्येने गणेशभक्तं लालबागच्या राजाला दान अर्पण करतात. त्या सर्वांची आता मोजदात सुरू करण्यात आलीय. गणेश भक्तांनी दान केलेल्या या ऐवजामध्ये रोख रकमे सोबतच सोन चांदीच्या वस्तूंचा देखील समावेश असतो. या सर्वांची मोजतात आता सुरू झाली आहे.
12:44 September 01
गोरेगावमध्ये 88 लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त; दोघांना केली अटक
मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगावमधून 88 लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि एक ट्रक जप्त केला आहे. यात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. आरोपी कर्नाटकमधून आले असून ते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तंबाखूचा पुरवठा करणार होते.
12:05 September 01
गर्भाशयाच्या कर्करोगावर स्वदेशी लस; सीरम इन्स्टिट्यूट आज करणार लाँच
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. या भयानक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही स्वदेशी लस विकसित केली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत.
11:49 September 01
अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे.
09:52 September 01
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला मिळणार 25 लाखांचे बक्षीस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला पंचवीस लाखाचं बक्षीस
छोटा शकीलची माहिती देणाऱयाला वीस लाखाचं बक्षीस
अनिस इब्राहिम शेख, जावेद चिकना, टायगर मेनन यांच्यासाठी प्रत्येकी 15 लाखाचे बक्षीस
दाऊद इब्राहिमवर अनेक गंभीर गुन्हे दाखल
08:21 September 01
नागपूर-उमरेड रस्त्यावरील टोल काँग्रेस आमदार राजू पारवेनी यांनी पाडला बंद
नागपूर - जिल्ह्यातील उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार राजू पारवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागपूर-उमरेड रस्त्यावरील टोल नाक्यावर आंदोलन करत बळजबरीने टोल वसुली बंद पाडली. आमदार पारवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता की चांपा गावाजवळ टोल नाका (बूथ )चालवणारी खासगी कंपनी परप्रांतीय तरुणांना रोजगार देत असून स्थानिक तरुणांना नोकरीची संधी देत नाही.
07:48 September 01
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीची मुदत पाच सप्टेंबरपर्यंत वाढवली
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक फेरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ५०३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ पूर्ण भरलेला नाही. तर १३७८ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झालेली नाही.अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग १ पूर्ण भरून लॉक करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. तर अर्जाची पडताळणी करण्यासाठी १ सप्टेंबर आणि भाग २ भरून लॉक करण्यासाठी २ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तसेच सध्या २ सप्टेंबरला सुरू होणारी विशेष फेरी आता ५ सप्टेंबरपासून राबवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ईटीव्ही भारतला दिली.
06:47 September 01
maharashtra breaking news
औरंगाबाद - टीईटी घोटाळ्याबाबत अपात्र शिक्षक उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. टीईटी घोटाळा उ्घड झाल्यानंतर राज्यात अनेक विद्यार्थी, शिक्षकांना अपात्र करण्यात आले होते.