ETV Bharat / city

Maharashtra Breaking news आरोपांची तडताळणी करण्यासाठी मंगळवारी गोवा पोलिसांचा एक पथक हरियाणात जाणार - क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Aug 29, 2022, 7:06 AM IST

Updated : Aug 29, 2022, 7:41 PM IST

19:40 August 29

आरोपांची तडताळणी करण्यासाठी मंगळवारी गोवा पोलिसांचा एक पथक हरियाणात जाणार

गोावा - सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनालीच्या कुटुंबियांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर काही आरोपांची आणि संशयाची पडताळणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा एक पथक उद्या मंगळवारी हरियाणातील हिसार येथे जाणार आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

18:32 August 29

इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच ढकलण्यात आले पुढे

नवी दिल्ली - स्पेस लॉन्च सिस्टम SLS रॉकेटवरील RS 25 इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नासाचे आर्टेमिस 1 चे आज होणारे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. इंजिनला प्रक्षेपण करण्यापूर्वी द्रव हायड्रोजन आणि ऑक्सिजनची समस्या आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. Artemis Launch postponed due to malfunctioning engine यावेळी शास्त्रज्ञांना इंधन गळती आणि क्रॅक दिसले आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठे रॉकेट फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथे लॉन्च पॅड 39B वर तैनात करण्यात आले होते.

18:25 August 29

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विद्या चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत मोहित कंबोज असतील किंवा तुमचा तो किरीट सोमय्या असेल यांना गुजरातमध्ये पाठवून द्या. त्यांचे महाराष्ट्रात काही काम नाही अस चव्हाण म्हणाल्या आहेत.

16:47 August 29

वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ची उद्या ट्रायल होणार

विविध मुद्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ची उद्या ट्रायल होणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे समजते.

15:35 August 29

लोकांना फोडून सरकार स्थापन करण्याचे सध्या काम चाललयं, शरद पवारांचा भाजपावर निशाणा

ठाणे - भाजपाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. भाजपाने 2014 साली दिलेली आश्वान पाळली नाहीत. लोकांना घरं देवू म्हणत अजूनही नागरिकांना पक्क घरं मिळाले नाही. अच्छे दिन म्हणत भाजपाने आणि केंद्र सरकारने लोकांना एकही गोष्ट पूर्ण केली नाही. अच्छे दिन पाहायलाच मिळाले नाही, लोकांना फोडून सरकार स्थापन करण्याचे काम भाजपाने केले, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केली आहे.

13:27 August 29

परळमध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला आग, पाईपलाईन गळतीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

मुंबई- परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागल्याची माहिती आहे. महानगर पालिकाकेच्या पाईपलाईन गळतीमुळे ही लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्याची माहिती आहे.

12:30 August 29

राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, दोघांमध्ये एक तास चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

10:30 August 29

शेअर बाजारात मोठी पडझड, निर्देशांक 991.51 अंकांनी घसरला

शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. निर्देशांक 991.51 अंकांनी घसरला.

09:03 August 29

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांचे विनम्र अभिवादन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मेजर ध्यानचंद जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आहे. अलीकडची वर्षे क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम आहेत. हा ट्रेंड कायम राहू दे. संपूर्ण भारतात खेळांची लोकप्रियता होत राहो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

09:03 August 29

मेक इन इंडियाच्या माध्यमातून सैन्याचे आधुनिकीकरण

मेक इन इंडियाच्या माध्यमातून सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने प्रयत्न करताना, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लेह, लडाख येथे सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये प्रगत प्रणाली आणि उपकरणांचे मूल्यांकन केले.

08:16 August 29

पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी

DRDO विकसित वर्धित श्रेणी पिनाका रॉकेटच्या वापरकर्त्यांच्या चाचण्या बालासोर आणि पोखरण येथे गेल्या काही आठवड्यांत घेण्यात आल्या. संरक्षणातील मेक इन इंडियाच्या यशात, मुनिशन इंडिया लि. आणि इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लि.सह उत्पादकांनी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

08:01 August 29

दिल्ली विधानसभेत आज मांडण्यात येणार विश्वासदर्शक ठराव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

07:20 August 29

सैन्यदलाकडून भोपाळ नागपूर महामार्गावर पुलाचे काम सुरू

भोपाळ नागपूर महामार्गावरील सुमारे 150 वर्ष जुन्या बेली पुलाच्या पुनर्बांधणीला सैन्यदलाने सुरुवात केली आहे. मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे पूल कोसळला होता. NHAI ने त्यासाठी साहित्य पुरवले आहे. सुमारे 70 ते 80 सैनिक कामात सहभागी आहेत. हे काम दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

07:17 August 29

गुलाम नबी आझाद १४ दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता

गुलाम नबी आझाद १४ दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करतील, असा दावा काँग्रेसचे माजी नेते ताज मोहिउद्दीन यांनी केला.

07:16 August 29

पाकिस्तान सरकार अपशकुनी

आशिया चषक स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पीटीआयचे नेते फवाद चांगलेच नाराज झाले आहेत. म्हणाले, सरकार हे अपशकुनी असल्याचे म्हटले आहे.

07:16 August 29

विसर्जनाच्या वेळी ५ जणांचा बुडून मृत्यू

श्रीकृष्ण मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी DND उड्डाणपुलाखाली यमुना नदीत बुडून ५ तरुणांचा मृत्यू झाला आहे. विसर्जनानंतर मूर्ती नदीच्या मध्यभागी अडकली. त्यानंतर, 6 मुले नदीत शिरली, त्यापैकी फक्त एकच परत येऊ शकला आणि 5 मुले बुडाली असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

07:16 August 29

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीला पेटविले, लोकांचे आंदोलन

दुमका येथे एका व्यक्तीने प्रपोजल नाकारल्याने इयत्ता 12 वीच्या मुलीला पेटवून दिले. तिचा जळून मृत्यू झाल्यामुळे लोकांनी आंदोलन केले.

07:16 August 29

ह्यूस्टनमध्ये ४ जण ठार

ह्यूस्टनमध्ये शूटरने इमारतीला आग लावल्याने 4 ठार झाले आहेत. तर 2 जखमी झाले आहेत.

07:16 August 29

पक्ष आणि जयललिता यांच्याशी एकनिष्ठ, ओ पनीरसेल्वम यांनी दिला विश्वास

मी पक्ष आणि जयललिता यांच्याशी एकनिष्ठ आहे. AIADMK चे खरे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. पक्ष काही लोकांकडून बळकावला जात आहे. ते थांबवले पाहिजे. ज्यांनी सुरुवातीपासून पक्षासाठी काम केले त्या सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे, ओ पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे.

07:16 August 29

नुनेस कर्लीज रेस्टॉरंटचा मालक नाही

सोनाली फोगट खून प्रकरणातील नुनेस कर्लीज रेस्टॉरंटचा मालक नाही. त्याच्याकडे रेस्टॉरंटचे मालकी हक्क असल्याचे स्थापित करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. आम्ही एनडीपीएस कोर्टात जामीन अर्ज दाखल करू, असे त्याच्या वकिलांनी सांगितले.

07:15 August 29

अमित शाह यांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले कौतुक

आशिया चषक 2022 अमित शाह यांनी पाकिस्तानवर भारताच्या विजयाचे कौतुक केले, हा सामना अचंबित करणारा होता, असे गृहमंत्र्यांनी म्हटले.

07:15 August 29

चेन्नईमध्ये भारतीय तटरक्षक दलाचा सराव

भारतीय तटरक्षक दलाने काल चेन्नईमध्ये 10वा राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सराव SAREX 2022 आयोजित केला. या सरावाला 16 परदेशातील 24 निरीक्षकांनी भाग घेतला.

07:15 August 29

20, 847 रुपयांना शूलेससारखे कानातले लाँच

बॅलेन्सियागाने 20, 847 रुपयांना शूलेससारखे दिसणारे कानातले लाँच केले. यावरून नेटिझन्स कंपनीला ट्रोल करत आहेत.

06:57 August 29

Maharashtra Breaking news शेअर बाजारात मोठी पडझड, निर्देशांक 991.51 अंकांनी घसरला

मुंबई दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप मध्ये भारतीय क्रिकेट संघाने नैसर्गिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली. त्यानंतर उपराजधानी नागपूरातील नागरिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. शहरातील लक्ष्मी भुवन चौकात हजारो तरुणाई आणि नागरिकांची गर्दी झाली होती. सर्वांनी मिळून विजयाचा Kolhapur cricket fans celebrate जल्लोष केला. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सर्वांनाच नेहमी आतुरता लागलेली असते. भारताच्या विजयानंतर आनंदोत्सव सुद्धा जोरदार असतो. यामध्ये सर्वात आघाडीवर कोणत्या जिल्ह्याचे नाव लागत असेल तर ते म्हणजे कोल्हापूर म्हणावे लागेल. Cricket fans celebration in Nagpur पाकिस्तान विरोधात प्रत्येक सामन्यात जेव्हा भारताचा विजय होतो तेंव्हा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इचलकरंजी येथील जनता चौक येथे जल्लोष हा ठरलेलाच असतो. त्याप्रमाणे जल्लोष दिसून आला आहे.

हे ब्रेकिंग पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. आजच्या घडामोडींसह वाचत राहा ईटीव्ही भारत.

Etv Bharat Marathi news, Etv Bharat Maharashtra Breaking news, Maharashtra live update, Maharashtra todays news

Last Updated : Aug 29, 2022, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.