ETV Bharat / city

Breaking News Live : शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू - महाराष्ट्र लाईव्ह अपडेट न्यूज

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking news
author img

By

Published : Oct 14, 2022, 6:42 AM IST

Updated : Oct 14, 2022, 9:05 PM IST

21:04 October 14

शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू

ठाणे : शेतात काम करत असतानाच दोन तरुणी व एक महिलाच्या अंगावर वीज कोसळून या दुर्घटनेत २ तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्देवी घटना भिवंडी तालुक्यातील पिसा - चिराड पाडा गावाच्या हद्दीत आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शितल अंकुश वाघे (वय १७) योगिता दिनेश वाघे (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणीची नावे आहेत. तर सुगंधा अंकुश वाघे (वय ४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.

19:59 October 14

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

18:24 October 14

आज संध्याकाळी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पडणार मुसळधार पाऊस

पुढील काळात मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नाशिक, औरंगाबाद येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी/तास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे - IMD मुंबई

18:17 October 14

केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची जीएसटीची २२ हजार कोटींची थकबाकी

मुंबई - केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळत असला तरी जीएसटी करातील थकबाकी दिली जात नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची तब्बल २२ हजार २९३ कोटींची जीएसटीची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

16:16 October 14

अनिल देशमुख जसलोक रुग्णालयात दाखल

अनिल देशमुख जसलोक रुग्णालयात दाखल

2 दिवस त्यांच्या पूर्ण तपासण्या केल्या जातील

यानंतर होईल अँजिओग्राफी

जर अँजिओग्राफीत ब्लॉकेज निघाले तर पुढील निर्णय होऊ शकतो

आवश्यकतेनुसार अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा निर्णय घेऊ शकतात डॉक्टर्स

15:50 October 14

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर; 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबर मतमोजणी

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबर मतमोजणी होणार आहे.

14:07 October 14

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जसलोक रुग्णालयात दाखल होणार

अनिल देशमुख आज उपचाराकरिता जसलोक रुग्णालयात दाखल होणार

अनिल देशमुख यांची जसलोक रुग्णालयात होणार अँजिओग्राफी

अँजिओग्राफीत निघणाऱ्या निदानावर पुढील दिशा ठरवणार डॉक्टर्स

अनिल देशमुख आज दाखल होणार जसलोक रुग्णालयात

थोड्याच वेळात आर्थर रोड कारागृहातून जाणार जसलोकला

14:04 October 14

एनसीपीसीआर प्रमुख प्रियांक कानूनगो यांच्या ताफ्याला लोकांनी दाखविले काळे झेंडे

एनसीपीसीआर प्रमुख प्रियांक कानूनगो यांच्या ताफ्याला लोकांनी काळे झेंडे दाखवून अडवले. ते, तक्रारदार आणि भाजप नेत्या प्रियंका टिब्रेवाल यांच्यासह, हुगळी जिल्ह्यातील बैद्यबती येथे मृतावस्थेत सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते.

13:42 October 14

कॉलेजमधील होस्टेलमध्ये घुसरून तरुणाचा युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फार्मसी कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये घुसून हॉस्टेल अनोळखी तरुणाने कॉलेज युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हांडेवाडी रोडवर असलेल्या फार्मसी कॉलेज मधील तिसऱ्या मजल्यावर गर्ल टॉयलेट मध्ये एका अनोळखी इसम घुसून युवतीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.

12:56 October 14

अंधत्व मुक्त महाराष्ट्र अभियान-- डॉक्टर लहाने

कोरोनामुळे राज्यातील सतरा लाख मोतीबिंदूं शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत या शस्त्रक्रिया करून महाराष्ट्राला अंधत्व मुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर टीपी लहाने यांनी दिली. राज्य सरकारच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येणार असून पुढील दोन वर्षात सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

12:52 October 14

बेपत्ता पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें यांचं मृतदेह सापडला...

पुणे येथील पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी घरातून बेपत्ता होऊन शिरवळ जवळील नीरा नदीत उडी घेतली होती.अशी फिर्याद शिरवळ येथील पोलीस ठाण्यात त्यांच्या पुण्यातील नातेवाइकाने दिली होती.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू पथकाच्या मदतीने नदीपात्रात सायंकाळपर्यंत शोधकार्य केले. मात्र, अंधार पडल्याने हे काम थांबविण्यात आले होते. सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या माध्यमातून शोध सुरू होता आणि अखेर बेपत्ता पणनचे सह संचालक शशिकांत घोरपडें यांचा मृतदेह नीरा नदीत सापडला आहे.

12:30 October 14

महागाईचा वार्षिक दर 12.41 टक्के

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकवर (WPI) आधारित महागाईचा वार्षिक दर ऑगस्ट 2022 मध्ये 12.41% नोंदवल्या गेलेल्या सप्टेंबर 2022 साठी 10.7% पर्यंत कमी झाला.

12:12 October 14

रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांची ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळाली होती...

रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली असून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्य स्पोट केला आहे. ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्या दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं, त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

10:17 October 14

निवडणूक आयोग आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार

भारत निवडणूक आयोग आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

09:04 October 14

स्वदेशी बनावटीचे वाहने सैन्यदलात दाखल

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने लडाख सेक्टरमधील ऑपरेशन्ससाठी स्वदेशी उच्च गतिशीलता सैन्य वाहक, 4x4 क्विक रिअॅक्शन फोर्स वाहने समाविष्ट केली आहेत. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी ही वाहने भारतात बनवली आहेत, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

08:27 October 14

पाकिस्तानच्या बाजूने भारतात घुसलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले

पंजाबमधील गुरुदासपूर सेक्टरमध्ये पहाटे ४.३५ वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने भारतात घुसलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

07:08 October 14

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना अशोक गेहलोत यांचा पाठिंबा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना समर्थन दिले आहे. ते विरोधी म्हणून पक्ष मजबूत करतील, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

06:53 October 14

नॉर्थ कॅरोलिना राज्यात गोळीबारात पाच ठार

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात गोळीबारात पाच ठार झाले आहेत.

06:42 October 14

इथिओपियामधून आलेल्या नागरिकाकडून 8.40 कोटी रुपयांचे 16 किलो सोने जप्त

मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने आदिस अबाबा, इथिओपिया येथून मुंबईला आलेल्या एका भारतीय नागरिकाकडून 8.40 कोटी रुपयांचे 16 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या तस्कराला अटकदेखील करण्यात आली आहे.

06:11 October 14

Maharashtra Breaking news and update

भारताचे 5G तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 14, 2022, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.