ETV Bharat / city

Maharashtra Breaking news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल - एकनाथ शिंदे दौरा न्यूज

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jul 29, 2022, 6:49 AM IST

Updated : Jul 29, 2022, 2:23 PM IST

14:22 July 29

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री दालनात सत्यनारायणाची पुजा घातल्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल

महाराष्ट्र राज्य धर्मनिरपेक्ष राज्य असून संविधानिक ठिकाणी अश्या प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे याचिकाकर्ते धनाजी सुरोसे यांचे म्हणणे

तर 1ऑगस्ट रोजी याचिकेवर ठाणे न्यायालयात सुनावणी

13:57 July 29

ठाण्यातून एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र

उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाला सर्वांकडून प्रतिज्ञा पत्र भेट म्हणून मागवले होते, त्याला अनेक शिवसैनिकांनी प्रतिसाद देखील दिला होता

तर त्याला टक्कर देत ठाण्यात देखील शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र आज भरून देत आहेत,

आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत,

ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञा पत्र महत्त्वाचे मानले जात आहे

13:28 July 29

बैगनवाडी परिसरात एका घरात चार जणांचे आढळले मृतदेह

मुंबईतील शिवाजी नगर येथील बैगनवाडी परिसरात एका घरात दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

13:23 July 29

आरे मेट्रो कारशेडवरून आंदोलन करणाऱ्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी आरे मेट्रो कारशेडशी संबंधित 2 गुन्हे दाखल केले आहेत. पहिला एफआयआर अतिक्रमण करणाऱ्या 3 लोकांविरुद्ध आहे. त्यांनी कारशेड परिसरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर दुसरा एफआयआर रात्री निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध आहे. अद्याप अटक नाही, 19 जणांवर गुन्हा दाखल्याचे झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

13:11 July 29

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळील 48 इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळील 48 इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या आदेशाचे पालन करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 उंच इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत.

12:33 July 29

विंग कमांडर एम राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितिया बल या दोन पायलटचा मृत्यू

  • Wing Commander M Rana and Flight Lieutenant Advitiya Bal are the two pilots who lost their lives in MiG-21 fighter aircraft crash in Barmer, Rajasthan last evening. pic.twitter.com/khvm0QKRR9

    — ANI (@ANI) July 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विंग कमांडर एम राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितिया बल या दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी राजस्थानमधील बारमेर येथे मिग-21 लढाऊ विमान अपघातात त्यांनी जीव गमावला.

12:27 July 29

ईडीने आमदार कृष्णा कल्याणी यांना बजाविली नोटीस

ईडीने पश्चिम बंगालस्थित कल्याणी सॉल्व्हेक्स प्रायव्हेट लिमिटेडला प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा 2002 च्या तरतुदींनुसार चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. टीएमसी रायगंजचे आमदार कृष्णा कल्याणी या कंपनीचे अध्यक्ष आहेत.

12:25 July 29

नागपूर मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीला सुरवात

नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित सोडत काढली जात आहे. आरक्षणाची सोडत काढल्यानंतर शनिवार ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट या कालावधीत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे. अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

12:24 July 29

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाजविला ढोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या हॅपीनेस उत्सवाच्या समारोप सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ढोल वाजविला.

12:23 July 29

दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना बजावले समन्स

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना समन्स बजावले.

11:24 July 29

१०० फूट खोल बोगद्यातून केबल काढताना पाच मजुरांचा मृत्यू

नागरकुर्नूल जिल्ह्यातील एका लिफ्ट सिंचन प्रकल्पावर ते काम करत असलेल्या १०० फूट खोल बोगद्यातून केबल काढताना पाच मजुरांचा मृत्यू झाल्याचे तेलंगाणा पोलिसांनी सांगितले.

11:19 July 29

उमरेड सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

उमरेड शहरात ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. एका खून प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाल्याचे नागपूर ग्रामीण पोलीसचे एसडीपीओ पूजा गायकवाड यांनी सांगितले.

11:07 July 29

लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

दिवसभराचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृहात गदारोळ झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

10:43 July 29

विषयांवर चर्चा होऊ नये म्हणून भाजपकडून मुद्दाम घोषणाबाजी-मल्लिकार्जुन खरगे

अधीररंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यानंतरही भाजप सोनिया गांधींविरोधात घोषणाबाजी करत माफी मागावी अशी मागणी करत आहे. महागाई, दरवाढ यांसारख्या विषयांवर चर्चा होऊ नये म्हणून ते हे मुद्दाम करत आहेत, असा आरोप काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

10:42 July 29

अण्णा मलाई विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

चेन्नईतील अण्णा मलाई विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते.

10:21 July 29

येवल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला

येवला ( नाशिक ):-येवला शहरातील विंचूर चौफुली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचा बॅनर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पाडला असून एकनाथ शिंदे हे उद्या 30 जुलै रोजी मालेगाव वरून वैजापूरकडे येवला मार्गे जाणारा असून याकरता येवल्यातील शिंदे समर्थकांनी बॅनर लावला होता मात्र अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास साधारण पाडला आहे.

10:06 July 29

हिमाचलमध्ये पुरात लिंक रोड वाहून गेला

हिमाचल प्रदेशमधील काल काझा येथे आलेल्या पुरात लिंक रोड वाहून गेला. अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. डीईओसीने या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

10:05 July 29

आसाम पोलिसांनी ११ दहशतवाद्यांना केली अटक

आसाम पोलिसांनी मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी आणि गोलपारा जिल्ह्यातून 11 जणांना ताब्यात घेतले. ते इस्लामिक कट्टरतावादाशी जोडलेले आहेत आणि जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम (ABT) यांच्याशी संबंध आहेत.

09:26 July 29

अंत्यसंस्काराची चिता पेटविताना आगीचा भडका उडून दोघांचा मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी (सरण) चिता पेटवताना आगीची भडका झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजले

त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे.

दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी मृतकांची नावे आहेत.

09:22 July 29

इंडिगोच्या विमानाच्या अपघाताची होणार चौकशी

इंडिगोचे कोलकात्याला जाणारे फ्लाइट जोरहाटमध्ये टेक-ऑफसाठी टॅक्स करताना घसरले. या घटनेत कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी एक पथक नेमण्यात आले आहे. विमानाच्या प्राथमिक तपासणीदरम्यान कोणतीही असामान्यता आढळली नाही, असे इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे.

09:20 July 29

100 कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अट्टल गुन्हेगाराला अटक

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने राजस्थानमध्ये 100 कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. 59 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते.

09:20 July 29

कोईम्बतूरमध्ये सावकाराकडून 1.26 कोटी रुपये रोख जप्त

कोईम्बतूर ग्रामीण पोलिसांनी काल 'ऑपरेशन कंथुवट्टी 2.0' अंतर्गत 1.26 कोटी रुपये रोख, 379 जमिनीची कागदपत्रे, 127 धनादेशाची पाने, 54 हून अधिक स्वाक्षरी केलेले कोरे कागद इत्यादी जप्त केले. अटकेनंतर मुख्य आरोपींपैकी एक सावकाराची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

08:22 July 29

संसदेत बेशिस्त वर्तन केल्याने २७ खासदार निलंबित, खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात 23 राज्यसभेचे खासदार आणि 4 लोकसभा खासदारांसह एकूण 27 खासदारांना "बेशिस्त वर्तन" केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने ५० तासांहून अधिक वेळ सुरू ठेवली आहे.

08:21 July 29

दिलीप छाब्रिया यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, गुरुवारी टाकले होते ईडीने छापे

अंमलबजावणी संचालनालयाने डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या CIU युनिट आणि EOW यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात, एजन्सीने काल मुंबई आणि पुण्यातील सहा ठिकाणी छापे टाकले आहेत.

07:16 July 29

हैदराबादमधील मूसरामबाग पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू

2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमधील मूसरामबाग पूल उस्मान आणि हिमायत सागरच्या प्रवाहामुळे ओव्हरफ्लो झाला होता. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर, अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी त्यामुळे निर्माण झालेला ढिगारा साफ करत आहोत, अशी माहिती हैदराबाद महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

07:13 July 29

पासपोर्टशिवाय भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाची भारताकडून सुटका, 16 वर्षे होता तुरुंगात

एक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा बॉर्डर, अमृतसर मार्गे पाकिस्तानात परतला. पासपोर्टशिवाय भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. लखनऊ कँट पीएसमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. 16 वर्षांच्या तुरुंगवासानंतर, त्याची सुटका झाल्याची माहिती प्रोटोकॉल ऑफिसर अरुणपाल सिंग यांनी दिली.

07:06 July 29

आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली- आसाममध्ये अल-कायदाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे

06:56 July 29

कोरोनाची लस देताना एक सिरिंज अनेक मुलांना वापरली, चौकशीचे आदेश

कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान, एका केंद्रातील कर्मचाऱ्याने एकापेक्षा जास्त मुलांना लस देण्यासाठी एक सिरिंज वापरली. तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली. सागर जिल्ह्यातील या कर्मचाऱ्याला निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

06:54 July 29

कर्नाटक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना एकूण ५० लाखांची मदत

मी कर्नाटक सरकारच्या वतीने 25 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. आमच्या पक्षाच्या वतीने देखील आम्ही 25 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हत्या झालेल्या भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर यांनी दिली. ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.

06:52 July 29

ऑलिम्पियाडच्या जाहिरातींमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो प्रकाशित करा, मद्रास उच्च न्यायालयाचे तामिळनाडू सरकारला आदेश

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या जाहिरातींमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.

06:51 July 29

22 हून अधिक महिलांचे अश्‍लील व्हिडिओ बनविणाऱ्या गुजरातच्या तरुणाला अटक

मुंबईतील 22 हून अधिक महिलांचे अश्‍लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणार्‍या गुजरातमधील एका 19 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील छायाचित्रांचा वापर करून अश्लील क्लिप बनवल्या आणि त्या हटवण्यासाठी त्याने पैसे उकळले. आरोपीला न्यायालयाने २९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

06:47 July 29

खड्ड्यातील खोल पाण्यात बुडाल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीप्टी सिग्नल येथील वैरागड वाडी येथे एका खड्ड्यातील खोल पाण्यात बुडाल्याने १२ वर्षीय एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पृथ्वी धनिराम मारखंडे असे या मुलाचे नाव आहे,तो मित्रांसोबत खड्याजवळ गेला असता त्याचा पाय घसरल्याने तो खोल खड्ड्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटेनच्या बाबत नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या माहिती देण्यात आली होती,त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना रात्री उशिरा मुलाचा मृतदेह मिळाला आहे.

06:26 July 29

Maharashtra Breaking news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल

मुंबई- अनेक महत्त्वाची कामं करायची होती. तेव्हा त्यांना एकनाथ शिंदे हवे होते. मात्र, जबाबदारी देण्यावेळी एकनाथ शिंदे आठवले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा किती विश्वास होता असा चिमटा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काढला आहे. ( हे लाईव्ह पेज दिवसभरात अपडेट होत आहे. )

Last Updated : Jul 29, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.