ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा - ईटीव्ही भारत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Aug 1, 2022, 7:02 AM IST

Updated : Aug 1, 2022, 2:04 PM IST

13:58 August 01

नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मृतक नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या आरोपी मुलासोबत प्रेम संबंध होते. याची कुणकुण नारायण यांना लागली, त्यामुळे त्यांनी घर बदलले या रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे.

13:34 August 01

शाळेत धार्मिक पठणावरून कानपूरमध्ये वाद, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पठण बंद

एका शाळेत विद्यार्थ्यांना इस्लाम धर्मातील काही ओळी वाचायला लावल्याची बाब समोर आली. आम्ही शाळेच्या प्रशासकाशी बोललो, त्यांनी सांगितले की त्यांनी सर्व धर्मांच्या प्रार्थनांचे पठण केले. आक्षेप घेण्यात आल्याने त्यांनी ते करणे बंद केल्याचे कानपूर एसीपी निशंक शर्मा यांनी सांगितले.

13:14 August 01

शिंदे सरकारने मागील सरकारचे निर्णय केल्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णय शिंदे सरकारने रद्द केल्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

राज्याच्या मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले शेकडो निर्णय रद्द करणे किंवा स्थगिती देण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

या याचिकेवर 3 आगस्ट रोजी प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता

नवीन शिंदे आणि फडणवीस सरकारने मागील सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत किंवा स्थगिती दिली आहे

12:24 August 01

आंदोलनाच्या तयारीत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राजभवनावर जाण्याचा प्रयत्न होता. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे ताब्यात घेतले आहे.

12:12 August 01

भारतीय खेळाडूंची कामगिरी देशातील तरुणांना प्रेरणा देईल- ओम बिर्ला

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण पदके, दोन रौप्य पदके आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी देशातील तरुणांना प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

12:11 August 01

सुकमा जिल्ह्यातत चकमकीत एक नक्षलवादी ठार

सुकमा जिल्ह्यातील भंडारपदर जंगल परिसरात डीआरजी आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला आहे.

12:10 August 01

जुलै 2022 मध्ये एकत्रित GST महसूल 1,48,995 कोटी रुपये जमा

जुलै 2022 मध्ये एकत्रित GST महसूल 1,48,995 कोटी रुपये जमा झाला आहे. हा आत्तापर्यंतचा दुसरा उच्चांक आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 28% जास्त आहे, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

12:09 August 01

लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आंदोलनानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले

11:24 August 01

16 आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढावे, एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

16 आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढावे

एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती

चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोग ठरवेल

16 आमदार अपात्रतेच्या मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्ष ठरवतील

विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असल्याने कोर्टानं याचिका डिस्पोजल करावी

शिंदे गटाकडून शनिवारी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता

11:15 August 01

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सत्र न्यायालयात आणणार

संजय राऊत यांच्या रिमांड अर्जावर होणार सुनावणी

सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडीचे वकील दाखल

सत्र न्यायालयाला चारही दिशेने पोलिसांच्या छावणीचे स्वरूप

कायदा व सुव्यवस्थेच्या करिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त

11:06 August 01

'विरोधक-मुक्त' संसद, म्हणूनच संजय राऊतांवर कारवाई

विरोधक-मुक्त' संसद, म्हणूनच संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे. महागाईचे मुद्दे आम्ही संसदेत मांडू, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

11:03 August 01

हिमाचल प्रदेशात पुरामुळे अडकलेल्या १०५ प्रवाशांची पोलिसांनी केली सुटका

हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पिती जिल्ह्यातील छत्रू भागात अचानक आलेल्या पुराच्या दरम्यान ब्लॉक केलेल्या महामार्गामुळे १०५ प्रवासी अडकून पडले होते. पोलीस आणि नागरी प्रशासनाच्या संयुक्त बचाव मोहिमेत चत्रू येथून या प्रवाशांची सुटका करण्यात आल्याचे लाहौल-स्पितीचे एसपी मानव वर्मा यांनी सांगितले.

10:58 August 01

कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांचे संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

मनरेगा योजनेंतर्गत कामाच्या वाटपाबाबत कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले.

10:40 August 01

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यासाठी राजभवनावर धडक मोर्चा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यासाठी राजभवनावर धडक मोर्चा निघणार आहे

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा निघणार आहे

ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते

बसेस भरून मुंबईच्या दिशेने जाणार आहे

पोलिसांचा मोठा फौज फाटा ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे

नितीन कंपनी जंक्शन येथून मोठ्या प्रमाणात बसेस मुंबई कडे कूच करणार आहे

आनंदनगर जकात नाका येथे हा मोर्चा अडवला जाणार असल्याची शक्यता.

राज्य राखीव पोलिस दल, रॅपिड एकशन फोर्स,ठाणे शहर पोलिस स्टँर्किंग फोर्स , आशा प्रकारे पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे

09:47 August 01

संजय राऊत यांची साडेअकरा वाजता होणार वैद्यकीय तपासणी

अटकेतील शिवसेना नेते संजय राऊत यांना मनपाच्या जे जे रुग्णालयात ईडीकडून साडेअकरा वाजता नेण्यात येणार आहे. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

09:46 August 01

मार्ड निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

मार्ड निवासी डॉक्टरांचा संप स्थगित --

वैद्यकीय शिक्षण संचलकांनी केंद्रीय पद्धतीने नियुक्ती करू बाबत मागणी मान्य केली

मार्डने निर्णयाचे केल स्वागत - मात्र बाकी मागण्या देखील पूर्ण कराव्यात याबाबत आग्रही

09:34 August 01

शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या खासगी कॅब चालकांचा दिल्लीत एकदिवसीय संप

शाळकरी मुलांना घेऊन जाणारे खासगी कॅब चालक त्यांच्या कॅबला व्यावसायिक वाहनांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी एक दिवसीय संपावर जात आहेत. आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. एका कॅब ड्रायव्हरने सांगितले की, आम्ही आधीच साथीच्या आजारात अडचणींचा सामना केला हे.

09:09 August 01

अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे बंदूक ठेवण्याची परवानगी मागितली होती. सलमान आता त्याच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकतो. यासंदर्भात सलमानने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती.

08:18 August 01

घरगुती वापरासाठी नसलेला एलपीजी सिलिंडर ३६ रुपयांनी आजपासून स्वस्त

घरगुती वापरासाठी नसलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आजपासून ३६ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2012.50 रुपयांऐवजी 1,976 रुपये होईल.

07:25 August 01

पंचतारांकित हॉटेलच्या 9व्या मजल्यावरून पडल्याने ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आत्महत्येची शक्यता व्यक्त

मुंबई - लोअर परळ परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या 9व्या मजल्यावरून उडी मारल्याने एका 59 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

07:05 August 01

एका तासात 4,60,496 प्राप्तिकर परतावे करदात्यांनी भरले!

प्राप्तीकर परतावे भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत 63,47,054 प्राप्तीकर परतावे ( आयटी रिटर्न) करदात्यांकडून भरण्यात आले. तर शेवटच्या एका तासात 4,60,496 प्राप्तिकर परतावे भरण्यात आले.

07:02 August 01

कॉमनवेल्थमध्ये वेटलिफ्टिर अचिंता शेउलीने मिळवून दिले देशाला तिसरे सुवर्णपदक

कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी सुरुच ठेवली आहे. अचिंता शेउलीने पुरुषांच्या 73 किलो गटात नवीन विक्रमासह देशाचे तिसरे सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि जेरेमी लालरिनुंगा यांनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदक मिळवून दिले होते.

06:48 August 01

Maharashtra Breaking News : नारायण द्विवेदी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई- संजय राऊत यांना 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आल्याचं ईडी सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित आहे. काही वेळापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं. ईडी कार्यालयातून बाहेर येताना ते काही कागदपत्रे आपल्यासोबत घेऊन बाहेर आले. जे राऊत यांना अटक करण्यात आल्याचं मेमो असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांचे हस्ताक्षर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अटकेतील संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Last Updated : Aug 1, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.