ETV Bharat / city

'एनसीबी'ने मुंबईत दोन ड्रग पेडलरांना केली अटक - अनिल देशमुख यांना क्लीन चीट

breaking-news-and-live-updates
breaking-news-and-live-updates
author img

By

Published : Aug 30, 2021, 7:02 AM IST

Updated : Aug 30, 2021, 10:40 PM IST

20:51 August 30

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढण्यावर सेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांचे एकमत

जळगाव - आज झालेल्या पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे 8 सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ऍड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. आता पुढच्या बैठकांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीनंतर दिली.

19:45 August 30

'त्या' वैमानिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

नागपूर - मस्कतहून ढाकासाठी निघालेल्या बांगला देशाचा बिमान एअरलाईन्सच्या वैमानिकाला तीव्र हृदयविकाराचा त्रास झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) नागपूरच्या किंग्सवे रुग्णलायत उपचारा दरम्यान अखेर त्या वैमानिकाचा मृत्यू झाला.

19:25 August 30

ईडीची 8 तास होऊन अद्यापही तपास सुरूच

मुंबई - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रिसोड येथील विविध संस्थांवर आज (दि. 30 ऑगस्ट) ईडीचे छापेमारी सुरू आहे. सकाळी 10 वाजतापासून भावना गवळी यांच्या आयुर्वेद महाविद्यालयात ईडीचे पथक दाखल झाले. मात्र, 8 तास होऊन अद्याप ही या पथकाचा तपास सुरूच आहे. या तपासत नेमके काय निष्पन्न होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

18:59 August 30

मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मुंबई - शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. दुसरीकडे परब यांच्या संबंधितीत नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. वादग्रस्त अधिकारी असलेले बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या निकटवर्तीय समजले जातात. बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी आहे. मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

17:19 August 30

'एनसीबी'ने मुंबईत दोन ड्रग पेडलरांना केली अटक

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) जुहू परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन ड्रग पेडलरला अटक केली आहे. अभिनेता अरमान कोहलीच्या अटकेनंतर हे छापा टाकण्यात आला असून त्यांना एमडी ड्रगसह अटक करण्यात आली.

17:17 August 30

कल्याण तहसीलदारासह शिपायाला 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

ठाणे - कल्याण येथे तहसीलदारासह शिपायाला 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

16:09 August 30

मनसे नेते अविनाश जाधव यांनी जामिनावर सुटका

ठाणे - मनसे नेते अविनाश जाधव यांची नौपाडा पोलीस ठाण्यातून सुटका झाली आहे. कलम 188 नुसार कारवाई झाल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्याबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.

16:06 August 30

ठाण्यात भाजपचे शंखनाद आंदोलन

ठाणे - मंदिरे उघडावीत यासाठी ठाण्यात भाजपच्या आध्यात्मिक सेलकडून राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यातही हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी आरतीही करण्यात आली. 

भाजपचे आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आले.

15:56 August 30

आगामी निवडणुकीत स्वबळावर - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी विधान केले.

15:29 August 30

भारतीय वाद्यांचे सूर हॉर्नमध्ये वापरण्याचे आदेश, लवकरच अध्यादेश काढणार - केंद्रीय मंत्री गडकरी

नागपूर - येणाऱ्या काळात वाहनांतून तबला, पेटी, तानपुरा, बासरीचा आवाज असणारा हॉर्न ऐकू येणार आहे. लवकरच याबाबत अध्यादेश काढणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात दिली.

15:19 August 30

सचिन वाझेची कोठडी मागणारा एनआयएचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई - सचिन वाझेची कोठडी मागणारा एनआयएचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अँटालिया स्फोटक प्रकरणी पुढील चौकशीसाठी एनआयएला सचिन वाझे आणि सुनील माने यांची कोठडी हवी आहे, असा अर्ज एनआयएने केला होता.

माझा स्टॅन स्वामी होऊ नये, अशी इच्छा, सचिन वाझेने एनआयए न्यायालयात वक्त केली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने  त्रस्त सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.

14:54 August 30

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून छापेमारी

मुंबई - अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीकडून अनिल देशमुख यांच्याशी निगडित तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. त्यापैकी एक छापा मुंबई तर इतर दोन छापे मुंबईबाहेर टाकण्यात आले आहे. 
 
12:16 August 30

ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव बसले उपोषणाला, दहीहंडी साजरी करण्यासाठी ठाम

गोपाळकाल्या निमित्त दहीहंड करण्यासाठी सरकारने परवानागी नाकारली आहे. मात्र मनसेकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र मनसेने दहीहंडी साठी बांधलेला स्टेज काढण्यासाठी पोलीस भगवती मैदानात दाखल आहेत. यावरून मनसे नेते  अविनाश जाधव उपोषणाला बसले आहेत. दहीहंडी साजरी करण्यासाठी मसने 100% प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार पोलिसांना पुढे करून हिंदू सण साजरे करण्यास बंदी घालत आहे.  सरकार नालायकासारखे हिंदू सणांवर बंदी घालत आहे. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करुन समोर यावं, असे आव्हान मनसेने सरकारला दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे पोलीस वाद होण्याची शक्यता, पोलीस आणि मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

11:15 August 30

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचे राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू

पंढऱपूर, कोल्हापूर, तुळजापूर, नाशिक या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे शंखनाद आंदोलन सुरू आहे. मंदिरे उघडण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र कोरोच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्य सरकारकडून मंदिर उघडण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. 

11:07 August 30

कायद्याचे उल्लंघन न करणार्‍यांवर कारवाई करायची नाही तर मग काय आरती करायची का?

केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झालेली कायदेशीर कारवाई होती ती देशात कोणावरही होऊ शकते. जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता ठामपणे बेजबाबदारपणे वागत असे त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

महाराष्ट्राचे एखाद्या मंत्र्याने अशी भाषा वापरली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते माझ्यावर ही कारवाई होऊ शकते. कायद्याचे उल्लंघन न करणार्‍यांवर कारवाई करायची नाही तर मग काय आरती करायची का?

जबाबदार पदावरील व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब असतं अशा लोकांनी जास्त जबाबदारीने वागायचं असते, असा टोलाही संजय राऊत यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना नाव न घेता लगावला आहे.

11:06 August 30

येऊ देना नोटिसा...ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत - राऊत

येऊ देना नोटिसा...ती आमच्यासाठी प्रेमपत्र आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी  परब यांना मिळालेल्या ईडी नोटीसीवर दिली आहे. राजकारणामध्ये अशी प्रेमपत्र काम करणार्‍या माणसांना येत असतात,  आम्ही त्यांना उत्तर देऊच. तसेच आमच्यावर कायदेशीर कारवाई होते त्यासाठी आम्ही प्रधानमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना काय धमक्या देणार नाही, आणि कायदेशीर कारवाईला पूर्णपणे सामोरं जाऊ यंत्रणेला सहकार्य करू असेही राऊत यावेळी म्हणाले. अनिल परब हे त्यांच्या उत्तर देतील ते समर्थ आहेत. अशा नोटिसा आमच्या घरी देखील बऱ्याच आहेत त्यात विषय देत नाहीत, चौकशीला या असं सांगतात

अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत अशाने शिवसेना सरकार कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेले डोमकावळे आहेत त्यांचा काही फायदा होईल... असं काही होणार नाही. असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत कायदेशीर की बेकायदेशीर सगळ्याच प्रकारचे. त्यामुळे तुम्ही आमची चिंता अजिबात करू नका अनिल परब यांची ही चिंता करू नका, असा खोचक टोला राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.

10:37 August 30

नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते - संजय राऊत

शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सरकार मधले अनिल परब हे महत्वाचे मंत्री आहेत. त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे महत्वाचे नेते, शिवसैनिक आहेत. त्यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचे टायमिंग पाहिले असता,  नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते.  ED ने त्यांचा एक डेस्क ऑफिसर भाजपच्या कार्यालयात ठेवलाय किंवा भारतीय जनता पक्षातील कोणीतरी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला असेल, असा आरोप राऊत यांनी भाजपावर केला आहे. 

आम्हाला काही माहित नसते पण यांना कसं कळलं की अनिल परब यांना नोटीस येणार आणि त्यांना त्या दिवशी चौकशीला बोलावलं जाणार? किरीट सोमय्या, चंद्रकांत दादा पाटील यांना माहीत आहे हे काय चालले आहे, असाही आरोप त्यांनी या भाजपाच्या नेत्यांवर केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे खूप लोक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळ एक नेता नसतो, अनेक नेते आहेत अनिल देशमुख देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, पवार साहेबांच्या जवळचे आहेत. नोटीस आम्हालाही आली होती इशाऱ्याची आम्ही पर्वा करत नाही. तुमच्या हातात चौकशीची शस्त्र आहे ती कमी वापरा असा सल्ला राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

शेतकऱ्यांवर झालेला हल्ला हरियाणाच्या सरकारचा सैतानी कारभार होता

मोदींच्या उपस्थितीत जलियांवाला बाग संदर्भात कार्यक्रम सुरू होता तेव्हाचा हल्ला झाला. या शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत सरकारला मोजावी लागेल, अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी हरियाणीतील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावर दिली.

*देशभरात मंदिर उघडलेत का ? पहा भाजपशासित राज्यात मंदिर उघडले का?  पहा केंद्र सरकारने नियम पाठवले आहे... त्याच्यामध्ये खूप जास्त काळजी महाराष्ट्राने घ्यायची आहे असं सांगितलं आहे... हिंदुत्ववादी सरकार केंद्रातील आहे असं मी मानतो... त्यांनाही देवळांची चिंता आहे पण त्यांनीच म्हंटले काळजी घ्या*

09:42 August 30

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 400 अंकांनी वधारला, बाजार 56,526 वर; तर निफ्टी 16,829 वर

09:29 August 30

नारायण राणेंना दिल्लीतून तत्काळ बोलावणे, महाड पोलीस ठाण्यात हजेरी न लावता दिल्लीला होणार रवाना

रायगड - नारायण राणे आज दुपारी 12 वाजता गोव्यावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. नारायण राणे यांना तात्काळ बोलवणे आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर अटक आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होते.  पण मात्र नारायण राणे यांचे मेडिकल सर्टिफिकेट महाडच्या गुन्हे शाखेमध्ये पाठवले जाणार आहेत. नारायण राणे त्या ठिकाणी हजेरीला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

08:23 August 30

डिस्क थ्रोमध्ये योगेश कथुनियाने केली रौप्य पदकाची कामगिरी

08:13 August 30

भारताच्या अवनी लेखाराला महिलांच्या 10 मीटर एआर स्टँडिंग एसएच 1 फायनलमध्ये सुवर्णपदक

टोकियो पॅरालिम्पिक: भारताच्या अवनी लेखारा हिने महिलांच्या 10 मीटर एआर स्टँडिंग एसएच 1 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले.

07:00 August 30

वाघ शिकार प्रकरणात आणखी दोन आरोपीना वन विभागकडून अटक

नागपूर - वाघ शिकार प्रकरणात आणखी दोन आरोपीना वन विभागकडून अटक कऱण्यात आली आहे. तर अन्य एका आरोपीने आत्मसमर्पण केले आहे. या आरोपींकडून वाघांची हाडे जप्त करण्यात आली आहेत, या पक्ररणावर वन विभाग नजर ठेवून असून आणखी काही लोक रडारवर  आहेत.

06:41 August 30

नारायण राणेंना दिल्लीतून तत्काळ बोलावणे, महाड पोलीस ठाण्यात हजेरी न लावता होणार रवाना

नागपूर-  सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपळा डाक बंगला या गावात एका महिला बौद्ध भिक्षुचा सहकारी भिक्षुने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतक महिला भिक्षुचे नाव श्रामनेरी बुद्धप्रिया उर्फ कुसुम मेश्राम असे आहे, तर आरोपीचे नाव भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम असे आहे. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.