ETV Bharat / city

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा - महाविकास आघा़डी सरकार

एमपीएसीचा निकाल जाही
एमपीएसीचा निकाल जाहीर
author img

By

Published : Aug 28, 2021, 9:47 AM IST

Updated : Aug 28, 2021, 10:43 PM IST

22:42 August 28

हरयाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी केला निषेध

करनाल (हरयाणा) - शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत असताना, आज (शनिवार) हरयाणा पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या लाठीचार्जच्या विरोधात सर्व स्तरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

22:22 August 28

कानाच्या खाली नाही मारणार, बाकी अवयव आहेत ना - नारायण राणे

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.

20:58 August 28

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यतेमुळे, राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

20:11 August 28

उद्घाटनावरून राष्ट्रवादी-सेनेत वाद; जुन्नरमधील भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले

पुणे - जुन्नर तालुक्यातील पारगावात नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला. याच वादातून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भर कार्यक्रमातून काढता पाय घेतला. "माझ्यामुळेच तुमची अडचण झाली, त्यामुळे मीच निघून जातो" असे म्हणून अब्दुल सत्तार भर कार्यक्रमातून निघून गेले.

17:47 August 28

ENG vs IND 3rd Test : भारताचा एका डावाने पराभव

लॉर्ड्स - सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडने या कसोटीत एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. काल दिवसअखेर शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा आणि अर्धशतकवीर विराट कोहली आज लवकर माघारी परतले.  

16:46 August 28

गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक नेते भाजपात - नवाब मलिक

मुंबई - ज्या राजकीय नेत्यांच्या नावावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे, असे नेते भाजपमध्ये आहेत, अशी बोचरी टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असणारे नेते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असा चिमटाही मलिक यांनी काढला आहे. राज्य सरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.  

15:07 August 28

उदय सामंत यांचा नारायण राणे यांना टोला

नागपूर - कोकणात गाजत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील प्रत्येक अॅक्शनला  शिवसेनेचे कार्यकर्ते रिअॅक्शन देणारच असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज नागपूर दौऱ्यावर आले असता विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणीही चुकीचे उद्गार काढल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.

13:56 August 28

म्हैसूरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक, सर्व आरोपी तामिळनाडूचे

म्हैसूरमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. हे सर्व आरोपी तामिळनाडूतील असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली

13:49 August 28

भाजपा नेत्यांनी ऐकले नाही तर, दया न दाखवता त्यांच्या मुसक्या आवळाव्यात - सचिन सावंत

जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत. शुक्रवारीच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत, असा निर्देश दिला आहे. सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये, असे मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे. 

तसेच केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार? असा बोचरा सवालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

13:37 August 28

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या विरोधात आंदोलन

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या विरोधात आंदोलन, छत्रपती शिवरायांचा चुकीच्या इतिहास सांगितल्याने केला निषेध. केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

13:13 August 28

अमरावतीत रसायन कारखान्यात भीषण आग, 14 बंब घटनास्थळी दाखल

अमरावती - एमआयडीसी परिसरात असलेल्या नॅशनल पेट्रीसाईड अँड केमिकल या रासायनिक कारखान्याला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अमरावती महापालिकेच्या बम्बांसह जिल्ह्यातील सर्व 14 नगर परिषदेतील बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पौणित कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून ही आग अद्याप आटोक्यात आली नाही.

13:10 August 28

सोलापुरातील काँग्रेस भवनवर हल्ला; शाई आणि दगडफेक करून हल्लेखोर फरार

13:08 August 28

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दिले पाचशे कोटी, उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती- राज्यसरकार यापुढे डिझेलवर चालणाऱ्या एसटी बस घेणार नाही. सध्या इंधनटंचाईचे मोठे संकट आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या व इलेक्ट्रीक बस टप्प्याटप्प्याने राज्य सरकार घेणार आहे. एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैसे नव्हते. ही बाब विचारात घेऊन काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळाला ५०० कोटी रूपये दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

12:37 August 28

शिवसेनेचे नगरसेवक दिपक दातीर आणि बाळा दराडे पोलिसांच्या ताब्यात

भाजपा कार्यालय तोडफोड प्रकरणी फरार असलेले शिवसेनेचे नगरसेवक दिपक दातीर आणि बाळा दराडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

12:05 August 28

बारामती येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन...

बारामती -  राज्याच्या तिजोरीमध्ये दरवर्षी साडेचार लाख कोटीं रूपये जमा होत असतात. मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तुट आली आहे. परिणामी विकासकामांसाठी निधीची मोठ्याप्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. मात्र तरिही महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ््या प्रकल्पांसाठी योजना राबवून निधी देत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.

10:58 August 28

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने वांझोटी - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर -  मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठका घ्याव्यात, पण ओबीसी आयोगाने मागितलेल्या मन्युष्यबळचा ही पुरवठा करणे गरजेचे आहे. त्याबद्दल शुक्रवारच्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने वांझोटी बैठक असल्याची टीका भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

वारंवार मागणी करूनही बैठकीत मुख्य सचिवांनी आयोगाच्या मागणीला मंजूरी दिली नाही, तसेच डिसेंबरपर्यंत राजकीय आरक्षण मिळू शकणार नाही असेही बावनकुळे यावेळी म्हणाले. बैठकावर बैठका घेऊन पुढे ढकलत आहेत. पण प्रस्तावाला मजुरी देत नाहीत, अशी टीका करत ओबीसी आरक्षणाबाबत बैठक घेऊन त्या प्रश्नाचा फुटबॉल करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप बावनकुळ यांनी केला.

10:34 August 28

जशी ॲक्शन असेल तशीच रिॲक्शन येणार, सामंताचा भाजपाला इशारा

कोकणातील जनआशीर्वाद यात्रा गाजत आहे आणि का गाजत आहे हे सर्वांना माहीत आहे. आम्ही मंत्री असलो तरी शिवसैनिकही आहोत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोणी टीका करणार असेल तर उत्तर दिले जाईलच, जशी ॲक्शन असेल तशीच रिॲक्शन येणार असल्याचा सूचक इशारा मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला दिला आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भेटले  होते. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चर्चा झाली असेल, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली असेल. तर ही चांगली बाब आहे. हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहेत. कोणा सोबत युती करावी, कोणासोबत सरकार बनवावे, कोणासोबत सरकार बनवू नये, याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना आहेत. ते जे निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असेल असेही ते यावेळी मंत्री सावंत म्हणाले.

10:25 August 28

खासदार सुप्रिया सुळे आज नागपुरात; राष्ट्रवादीची आज नागपूरमध्ये संघटनात्मक बैठक

माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही मी कुठल्याही गोष्टीवर विचार पूर्वक प्रतिक्रिया देते, इस्टंट कॉफीवर माझा विश्वास नाही. तसेच माझ्यावर ज्या कै यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे प्रत्येक पक्षात चांगले संबंध होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करणे काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

महा विकास आघाडीचे सरकार 5 वर्ष नाही तर 25 वर्ष राज्यातील जनतेची सेवा करत राहील असेही त्या म्हणाल्या

ईडीचा राष्ट्रवादी काँग्रेस ला नेहमीच फायदा झाला असल्याचे उपरोधिक विधानही त्यांनी यावेळी केले.

09:52 August 28

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील.

09:33 August 28

Big Breaking

एमपीएसी अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात औरंगाबादची शामल बनकर मुलींमध्ये प्रथम

Last Updated : Aug 28, 2021, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.