मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (१६ सप्टेंबर) किंचित घट होऊन ३५८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
राज्यात शुक्रवारी ४४१० रुग्णांना डिस्चार्ज, ३५८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण
20:53 September 17

17:52 September 17
एफआरपीच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
कोल्हापूर - तीन टप्प्यात एफआरपीची मागणी साखर संघाची आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ठेवला आहे. निती आयोगाने त्यात फक्त पर्याय सुचवला आहे. या एफआरपीचे तीन तुकडे केंद्र सरकार करणार अशा फक्त अफवा आहेत. काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी आव आणत आहेत. हा जाब त्यांनी आघाडी सरकारला विचारावा. तसेच हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावं, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
15:20 September 17
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी पद्मनाभन यांचे निधन
पुणे - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक टी. पद्मनाभन यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. 2007 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रामधील त्यांच्या योगदानासाठी जगभरात त्यांची विशेष ओळख होती.
15:08 September 17
अनिल देशमुख यांचे ईडीच्या आरोपपत्रात नाव नाही
मुंबई - शंभर कोटी रुपये खंडणी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून सादर केलेल्या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत पाचवेळा अनिल देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले होते. मात्र, देशमुख चौकशीसाठी गैरहजर राहिले आहेत. या उलट समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
14:09 September 17
भाजपाचा तणाव दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसे वक्तव्य केले असेल- नाना पटोले
13:41 September 17
देशात शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्यात आले.
13:15 September 17
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा
आयकर विभागाचे अधिकारी सुखदा इमारतीत पोहोचले
सव्वा अकरा वाजता सीबीआयची टीम देशमुखांच्या घरी पोहोचल्याची माहिती
13:11 September 17
सिंहगड किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकासाला प्राध्यान, स्थानिकांना रोजगार देणार - अजित पवार
13:03 September 17
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर आयकर विभागाची धाड
12:49 September 17
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही - छगन भुजबळ
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. उलट भाजप सरकारनेच अनेक वेळा शिवसेनेची अवहेलना केली आहे असे ते म्हणाले. राजकारणात सगळेच मित्र असतात, विरोधी पक्षात दुश्मन नसतात असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री त्रस्त आहेत असं वाटत नाही असे भुजबळ म्हणाले.
निवडणुका डोक्यावर आलेल्या आहेत. त्यानुसार आमचा प्रयत्न आहे की, ओबीसीला राजकीय आरक्षण मिळावे. आम्ही यासाठी न्यायालयात सुद्धा गेलो आहेत तसेच येत्या 23 तारखेला न्यायालायत सुनावणी आहे असे भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे. याची जाणीव सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना करून दिलेली आहे असे भुजबळ म्हणाले.
12:38 September 17
मुख्यमंत्र्यांनी मनातील भावना बोलून दाखवली, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनातील भावना बोलून दाखवली. ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यांच्या शुभेच्छा चांगल्या आहेत असे फडणवीस म्हणाले. डिझेल-पेट्रोल बाबत काँग्रेसची-राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी असल्याचेही फडणवीस म्हणाले.
12:35 September 17
आयकर विभागाची सोनू सुदविरोधातील कारवाई सुरूच
सोनू सूदच्या मुंबईतील निवासस्थानासह नागपूर आणि जयपूर तसेच इतर काही ठिकाणी आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे.
12:32 September 17
साहिल खानविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अभिनेता साहिल खानविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिल खान आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साहिल खान, राजा फौंजदार, जुनेद कालिवाला, रुबल दंडकर यांच्यावर ipc कायदा 306, 511, 500, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटीलवर सध्या उपचार सुरू आहेत.
10:24 September 17
आप जिओ हजारो साल.. हर साल के दिन हो पचास हजार..; संजय राऊतांनी दिल्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
10:16 September 17
तर मुंबई पासून नागपूरपर्यंत समृद्धी महार्गावरूनच धावेल बुलेट ट्रेन - रावसाहेब दानवे
09:27 September 17
मुक्तीसंग्रामाची लढाई आपण जिंकली आता कोरोनाला हरवायचे आहे - मुख्यमंत्री
08:23 September 17
मला यूट्यूब महिन्याला 4 लाख रुपये देते - नितीन गडकरी
कोरोना काळात मी दोन कामे केली, एक म्हणजे मी घरात स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आणि दुसरे म्हणजे व्हिडिओ कॉन्फ्रेंसच्या माध्यामातून व्याख्यान देणे सुरू केले. मी अनेक व्याख्याने ऑनलाइन दिली आहेत. आणि ती YouTube पर अपलोड केली. आता त्याचे दर्शक वाढल्याने YouTube आता महिन्याला 4 लाख रुपये देते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
07:50 September 17
मुंबईत निर्माणाधीन पूल कोसळून 14 मजूर जखमी
मुंबईतील एमटीएनएल जंक्शन, ट्रेड सेंटर, बीकेसी, वांद्रे पूर्व येथील एक निर्माणाधीन पूल कोसळून 14 कामगार जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 4.41 च्या सुमारास घडली. कोसळलेला पूल MMRDA चा निर्माणाधीन पूल आहे.
जखमी व्यक्तींची नावे
1) अनिल सिंग
2) अरविंद सिंग
3) अझर अली
4) मुस्तफ अली
5) रियाझुद्दीन
6) मोटलब अली
7) रियाझू अली
8) श्रावण
9) अतिश अली
10) रलिस अली
11) अजीज-उल-हक
12) परवेझ
13) अकबर अली
14) श्रीमंद
07:33 September 17
BREAKING : मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग, आग विझविण्याचे काम सुरु
मुंबई : शहरातील मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला मोठी आग लागली. ही आग आज पहाटे साडेचार वाजता लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. आग अद्याप धुमसत असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.