मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्श फाऊंडेशन रुग्णालयात आला होता. महत्वाचे म्हणजे सकाळपासून तब्बल ८ वेळा असा धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीस दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
Maharashtra Breaking News मुकेश अंबानींना धमकी देणारा दहिसरमधून ताब्यात - Maharashtra update news today
15:30 August 15
मुकेश अंबानींना धमकी देणारा दहिसरमधून ताब्यात
14:15 August 15
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीचा अमरावतीत गोळीबार
अकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग करीत अमरावतीत पोचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात घडली. या घटनेने अमरावती शहरात खकबळ उडाली आहे.
12:23 August 15
अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना धमकी
अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना धमकी
यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला
कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली
यानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
10:58 August 15
गेल्या आर्थिक वर्षात पाच वेळा वेगाने 50,726 प्रकल्प पूर्ण जम्मू काश्मीर नायब राज्यपाल
नवीन जम्मू आणि काश्मीरमध्ये, तरुणांची स्वप्ने आणि आशा साकार करण्यासाठी 21 व्या शतकातील मैदान तयार केले जात आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये म्हटले. तीन वर्षांपूर्वी, PM मोदींनी J&K मध्ये आधुनिक आर्थिक आणि सामाजिक विकासाचा दिवा लावला. J&K प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली. विविध आव्हाने असूनही, आम्ही गेल्या आर्थिक वर्षात पाच वेळा वेगाने 50,726 प्रकल्प पूर्ण केल्याचे नायब राज्यपालांनी म्हटले आहे.
10:53 August 15
स्वदेशी तोफेमधून दिल्लीतील लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी
-
#WATCH | Made in India ATAGS howitzer firing as part of the 21 gun salute on the #IndependenceDay this year, at the Red Fort in Delhi. #IndiaAt75
— ANI (@ANI) August 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: DRDO) pic.twitter.com/UmBMPPO6a7
">#WATCH | Made in India ATAGS howitzer firing as part of the 21 gun salute on the #IndependenceDay this year, at the Red Fort in Delhi. #IndiaAt75
— ANI (@ANI) August 15, 2022
(Source: DRDO) pic.twitter.com/UmBMPPO6a7#WATCH | Made in India ATAGS howitzer firing as part of the 21 gun salute on the #IndependenceDay this year, at the Red Fort in Delhi. #IndiaAt75
— ANI (@ANI) August 15, 2022
(Source: DRDO) pic.twitter.com/UmBMPPO6a7
स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर २१व्या तोफांच्या सलामीचा भाग म्हणून मेड इन इंडिया ATAGS हॉवित्झर तोफ डागण्यात आली आहे.
10:53 August 15
बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. आरोग्यसेवा, डिजिटल परिवर्तनातील भारताच्या विकासाला "प्रेरणादायी" म्हटले आहे.
10:53 August 15
अंबिका सोनी यांनी फडकविला राष्ट्रध्वज
काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी दिल्लीतील AICC मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला
10:53 August 15
सियाचीनमध्ये जवानांनी फडकविला राष्ट्रध्वज
सियाचीन ग्लेशियर येथे 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी राष्ट्रगीत पठण केले.
10:41 August 15
ऐन स्वातंत्र्यदिनालाच दोन महिलांचा दोन जिल्ह्यांत आत्मदहनाचा प्रयत्न
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच महिलेला रोखल्याने अनर्थ टळला आहे. घरकुल मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सातर्कतेने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
10:23 August 15
स्वकेंद्रित सरकार देशाच्या गौरवशाली कामगिरीला क्षुल्लक सिद्ध करण्यावर ठाम सोनिया गांधींची टीका
गेल्या 75 वर्षांत आपण खूप काही साध्य केले आहे. परंतु सध्याचे स्वकेंद्रित सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि देशाच्या गौरवशाली कामगिरीला क्षुल्लक सिद्ध करण्यावर ठाम आहे. हे मान्य केले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
09:58 August 15
युरोपमधील समुद्रात फडकला राष्ट्रध्वज
-
#WATCH Indian Navy personnel onboard INS Tarangini hoist the national flag at sea in Europe #IndiaAt75 pic.twitter.com/XLvQ3YT4R9
— ANI (@ANI) August 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Indian Navy personnel onboard INS Tarangini hoist the national flag at sea in Europe #IndiaAt75 pic.twitter.com/XLvQ3YT4R9
— ANI (@ANI) August 15, 2022#WATCH Indian Navy personnel onboard INS Tarangini hoist the national flag at sea in Europe #IndiaAt75 pic.twitter.com/XLvQ3YT4R9
— ANI (@ANI) August 15, 2022
आयएनएस तरंगिणी या जहाजावरील भारतीय नौदलाचे जवान युरोपमधील समुद्रात राष्ट्रध्वज फडकवत आहेत
09:29 August 15
विविध राज्यात मुख्यमंत्र्यांनी केले ध्वजारोहण
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वातंत्र्यदिनी लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर तिरंगा फडकवला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वातंत्र्यदिनी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर भाषण करताना महाराष्ट्र अग्रेसर राज्य करू, असे म्हटले आहे.
09:20 August 15
महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनवण्यासाठी प्रयत्न सुरू एकनाथ शिंदे
शेतकरी, शेतकरी वर्गाला प्राधान्य आहे. पूरस्थितीमध्ये वेगाने पंचनामे झाले आहेत. 28 जिल्ह्यांना फटका बसला आहे
नद्यांचे गाळ काढले आहे. धनगर समाज मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देऊ. ओबीसीना आरक्षण दिले आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्रासोबत चर्चा करत आहोत. केंद्राने ग्याही दिली आहे. येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्ग सुरू करू, पोलिसांच्या घरासाठी नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहे.
उद्योग क्षेत्रासाठी टाटाकडून सहकार्य घेणार आहोत स्थनिकांना रोजगार देऊ व आर्थिक मदतीचे पाठबळ देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
09:19 August 15
अमृतमहोत्सवी निमित्त संधी मिळाली हे भाग्य समजतो एकनाथ शिंदे
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो
अमृतमहोत्सवी निमित्त संधी मिळाली हे भाग्य समजतो
प्राणांची आहुती देणाऱ्यांना आदरांजली
अडीच वर्षात कोविड होते. हे संकट गेलं नाही
मात्र धार्मिक सण काळजी घेऊन साजरा करू या
देश तिरंग्याने न्हाहून निघाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
09:13 August 15
महिलांचा अनादर थांबवण्याची शपथ घेण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश
शिक्षण असो की विज्ञान, देशातील महिला अव्वल आहेत. क्रीडा असो वा रणांगण, भारतातील महिला नव्या क्षमतेने आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. येत्या 25 वर्षात महिलांचे मोठे योगदान मला दिसत आहे, 75 वर्षांच्या प्रवासात त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्याला सर्व शक्तीनिशी लढायचे आहे.
आज आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत - भ्रष्टाचार आणि 'परिवारवाद' किंवा घराणेशाही. देशाला दीमक सारखा पोकळ करणारा भ्रष्टाचार, त्याच्याशी लढायचे आहे. आपल्या संस्थांची ताकद ओळखण्यासाठी, गुणवत्तेच्या जोरावर देशाला पुढे नेण्यासाठी 'परिवार'विरोधात जनजागृती करायची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
76 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी 'हर घर तिरंगा'च्या सुरात तिरंगा थीम असलेली पगडी घातली आहे.
देशातील तरुणांना अंतराळापासून ते महासागराच्या खोलीपर्यंतच्या सर्व क्षेत्रात संशोधनासाठी सर्व सहकार्य मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही आमची स्पेस मिशन आणि डीप ओशन मिशनचा विस्तार करत आहोत. आपल्या भविष्याचे समाधान अंतराळ आणि महासागरात दडलेले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा अनादर थांबवण्याची शपथ घेण्याचा संदेश देशाला दिला आहे.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण संपवल्यानंतर लगेचच लाल किल्ल्यावरून तिरंगा फुगे सोडण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा समारोप जय हिंद’ने केला.
08:10 August 15
पंतप्रधान मोदींचा २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी जनतेला ५ संकल्प सांगितले आहेत.
08:09 August 15
विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक गुजरात राज्यातील दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती
शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा आयसर टेम्पो पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या आयसर टेम्पो व ट्रक मालकाचा शोध सुरू असून कासा भागात ट्रक मालक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. टेम्पोचा नंबर DN 09 P 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याची माहिती आहे. दरम्यान सदर आयसर टेम्पो हा रायगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
08:07 August 15
भारतातील लोकांना सकारात्मक बदल हवे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारत हा एक महत्वाकांक्षी समाज आहे, जिथे सामूहिक भावनेने बदल घडवले जातात. भारतातील लोकांना सकारात्मक बदल हवे आहेत आणि त्यासाठी योगदानही हवे आहे. प्रत्येक सरकारने या आकांक्षा समाजाला संबोधित केले पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आमच्या विकासाच्या मार्गावर शंका घेणारे अनेक संशयवादी होते. पण, या भूमीतील लोकांमध्ये काहीतरी वेगळे आहे हे त्यांना माहीत नव्हते. ही भूमी खास आहे हे त्यांना माहीत नव्हते. आपल्या देशातील जनतेने अनेक प्रयत्न केले, हार मानली नाही आणि आपले संकल्प संपू दिले नाहीत.
08:02 August 15
75 वर्षात देशाला पुढे नेण्यात योगदान देणाऱ्या देशातील सर्व नागरिकांच्या स्मरणाचा आजचा दिवस
जेव्हा आपण स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलतो तेव्हा आपण आदिवासी समाजाला विसरू शकत नाही. भगवान बिरसा मुंडा, सिद्धू-कान्हू, अल्लुरी सीताराम राजू, गोविंद गुरू - अशी असंख्य नावे आहेत जी स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनली आणि आदिवासी समाजाला मातृभूमीसाठी जगण्यासाठी प्रेरित केले आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारताने आपल्या 75 वर्षांच्या वाटचालीत अनेक आव्हानांना तोंड देत आपल्याजवळ मौल्यवान क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारे असोत किंवा राष्ट्राची उभारणी करणारे असोत - डॉ राजेंद्र प्रसाद, नेहरू जी, सरदार पटेल, एसपी मुखर्जी, एलबी शास्त्री, दीनदयाळ उपाध्याय, जेपी नारायण, आरएम लोहिया, विनोबा भावे, नानाजी देशमुख, सुब्रमण्यम भारती अशा महान व्यक्तींपुढे नतमस्तक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, चेन्नम्मा, बेगम हजरत महल यांचेही लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी स्मरण केले. 'आझादी महोत्सवा'मध्ये आम्हाला आमच्या अनेक राष्ट्रीय वीरांची आठवण झाली. १४ ऑगस्टला आम्हाला फाळणीची भीषणता आठवली. गेल्या 75 वर्षात देशाला पुढे नेण्यात योगदान देणाऱ्या देशातील सर्व नागरिकांच्या स्मरणाचा आजचा दिवस असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल आणि ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून सोडणाऱ्या आमच्या असंख्य क्रांतिकारकांचे हे राष्ट्र आभारी आहे. बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर ज्यांनी कर्तव्याच्या वाटेवर प्राण दिले. त्यांचे नागरिक कृतज्ञ आहेत.
07:57 August 15
भारत हा लोकशाहीचा जनक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्यांनी बलिदान दिले, पण त्यांना विसरले गेले आणि त्यांचे हक्क दिले गेले नाही, त्यांना देश आठवत आहे.
पंतप्रधान मोदींनी नारायण गुरू, स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांना राष्ट्राची चेतना जागृत करण्यासाठी आदरांजली वाहिली आहे.
स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रनिर्माते -- राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतरांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
राणी लक्ष्मीबाई आणि बेगम हजरत महल यांच्यासह भारताच्या महिला सेनानींना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली
जगाच्या कानाकोपऱ्यात भारतावर प्रेम करणारे भारतीय अभिमानाने तिरंगा फडकवत आहे, असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे..
तात्या टोपे, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
आम्ही आमचे सैनिक, पोलीस दल आणि मुख्य म्हणजे प्रत्येक नागरिकाला सलाम करतो ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. नवीन भारताच्या दृष्टीकोनासाठी काम केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
ज्यांनी बलिदान दिले, पण त्यांना विसरले गेले आणि त्यांचे हक्क दिले गेले नाही, त्यांना देश आठवत आहे.
07:35 August 15
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण सुरू
नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
07:23 August 15
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी ते ध्वजारोहण करणार आहेत.
07:23 August 15
गुगलनेही दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पतंगांसह Googleने डूडल दाखवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
07:23 August 15
सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा
लेखक सलमान रश्दी यांना व्हेंटिलेटरवरून हलविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
07:23 August 15
माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल
समीर वानखेडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
07:23 August 15
नौमिया येथे ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप
न्यू कॅलेडोनियाच्या नौमिया येथे ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
07:23 August 15
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
07:22 August 15
अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
महात्मा गांधींनी मार्गदर्शन केलेल्या लोकशाही प्रवासाचा अमेरिका सन्मान करते, अशा भारताच्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
07:22 August 15
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
07:22 August 15
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था
दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. लाल किल्ल्याभोवती 1,000 हून अधिक सीसीटीव्ही बसवले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आणि आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे
06:12 August 15
Maharashtra Breaking News स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीचा अमरावतीत गोळीबार
भारत ७६ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभरात देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहे. राजधानी दिल्लीत भव्य सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. ते सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवतील. देशाला संबोधित करणार आहेत. तर राज्यात सत्तेवर आलेले शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार आहेत.