ETV Bharat / city

Maharashtra Breaking news 4 June 2022; साखर परिषदेत आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे होते - राजू शेट्टींचा मुख्यमंत्री, शरद पवारांना टोला

Maharashtra Breaking news 4 June 2022
Maharashtra Breaking news 4 June 2022
author img

By

Published : Jun 4, 2022, 2:10 PM IST

Updated : Jun 4, 2022, 6:31 PM IST

18:26 June 04

साखर परिषदेत आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे होते - राजू शेट्टींचा मुख्यमंत्री, शरद पवारांना टोला

वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे साखर परिषद 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या साखर परिषदे बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टोला लगावत. खऱ्या अर्थाने साखर परिषदेत आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे होते. असे म्हणले आहे. या साखर परिषदेचा मूळ कणा असलेला शेतकरी कुठे दिसतो का? यंदाच्या हंगामात जून पर्यंत साखर कारखाने सुरू ठेवायची वेळ का आली याबाबत साखर परिषदेतील नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे राजू शेट्टी यांनी म्हणले आहे.

15:00 June 04

महाराष्ट्रात कोरोनाचे 4,032 सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात आज कोरोनाच्या नव्या 1,081 रुग्णांची नोंद झाली आहे; मुंबईतील 2,970 प्रकरणांसह 4,032 सक्रिय रुग्ण आहेत

14:13 June 04

बीड - दोन मावस बहिणांचा गोदावरी नदीत बुडुन मृत्यू

बीड - गेवराई आणि परतूर तालुक्यातील दोन मावस बहिणांचा माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीत बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

14:11 June 04

नांदेड - पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

नांदेड - मानसिक तणावातून पतीने केली आत्महत्या. विषारी औषध घेत आत्महत्या करण्याआधी पत्नीला भोसकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील कासारपेठ येते घडली. पती पत्नी मध्ये वाद झाला आणि वाद टोकाला गेला. त्यात पतीने मानसिक ताणवातून पत्नीची हत्या करत आत्महत्या केली.

14:03 June 04

Maharashtra Breaking news 4 June 2022

पुणे - मास्क सक्तीबाबत परिस्थिती पाहून 15 ते 20 दिवसात निर्णय घेतला जाईल. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल झाले होते. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की राज्यात मास्कची सक्ती नाही. मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आल आहे.अस यावेळी टोपे म्हणाले.

Last Updated : Jun 4, 2022, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.