ETV Bharat / city

काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ वापर करून घेतला - सुधाकर भालेराव - महाराष्ट्र भाजप अनुसूचित जाती मोर्चा

मोदी मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी 59, 000 कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली. तब्बल 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती

Maharashtra BJP Scheduled Caste Morcha
महाराष्ट्र भाजप अनुसूचित जाती मोर्चा
author img

By

Published : Jan 2, 2021, 4:48 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने नुकतंच अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या अनेक विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे , असं आज महाराष्ट्र भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी सांगत काँग्रेसने अनेक वर्षे अनुसूचित जातींचा फायदा घेतला, अशी टीका केली.

थेट विद्यार्थ्यांना मदत -

भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, नरेंद्र मोदी सरकारने गेल्याच महिन्यात अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांसाठी 59, 000 कोटी रुपयांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला मंजुरी दिली. तब्बल 4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या शिष्यवृत्तीत 60 टक्के वाटा केंद्राचा तर 40 टक्के वाटा राज्य सरकारांचा असणार आहे. देशात पूर्वी काँग्रेसच्या काळात 16 हजार कोटी रुपये अनुसूचित जाती जमातीच्या शिष्यवृत्ती योजनेला मिळत होते. त्यात मोदी सरकारने पाच पटीने वाढ करून यात भ्रष्टाचार यात होणार नाही, याची काळजी घेतली आहे. अनुसुचित जमातीतील विद्यार्थ्यांना थेट मदत मिळणार आहे.

राज्य व केंद्रातील समन्वय स्पष्ट होणार -

या योजनेचा 1 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. त्यात अनेक अडचणी येत होत्या. केंद्र आणि राज्यामध्येही समन्वय नव्हता. केंद्र सरकार दरवर्षी एक हजार कोटींच्या आसपास यावर निधी देत होता. आता दरवर्षी त्याच्या 5 पट जास्त म्हणजे 5 हजार कोटींपर्यंत यासाठी निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात समन्वयाच्या त्रुटी होत्या. त्या आता स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांना थेट मदत मिळणार आहे, अशी माहिती भालेराव यांनी दिली.

यावर्षी सर्व राज्यांना पाच हजार कोटी रुपये -

दरवर्षी या निधीमध्ये वाढ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावर्षी सर्व राज्यांना 5 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पैसे थेट त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. राज्यांनी त्यांच्या वाट्याचे पैसे जमा केल्यानंतर केंद्र सरकारही लगेच पैसे जमा करणार आहे. राज्यांकडून विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात येणार असल्याची माहितीही भालेराव यांनी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.