भाजप नेते किरीट सोमैय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमैय्या आज कोल्हापूरला भेट देणार होते. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Maharashtra Breaking : भाजप नेते किरीट सोमैय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी घेतले ताब्यात - big breaking
05:46 September 20
भाजप नेते किरीट सोमैय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी घेतले ताब्यात
02:19 September 20
कोल्हापुरात कलम 144 लागू
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केले असून, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
22:15 September 19
किरीट सोमैयांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले
किरीट सोमैयांना विरोध करण्यासाठी कोल्हापूरातल्या रेल्वे स्टेशनबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमण्ययास सुरुवात, सोमय्या यांचे पायताण घेऊन स्वागत करण्याचा दिला इशारा..
20:31 September 19
भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना
मुंबई - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला असताना देखील ते कोल्हापूरला रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांना त्यांना अडवलं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
19:11 September 19
केरळ सोने दरोडा प्रकरण : साताऱ्यातील सराफाकडून साडेतीन किलो चांदी हस्तगत
सातारा - केरळ राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या साडेसात किलो सोन्यावरील दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात केरळ पोलिसांनी साताऱ्यातील सराफा व्यापारी राहूल घाडगेला अटक केली होती. आता सोने चोरी प्रकरणात केरळ पोलिसांनी घाडगेच्या दुकानातून साडेतीन किलो चांदी हस्तगत केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.
17:17 September 19
हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांकडून अटकेचे आदेश, किरीट सोमैयांचा सरकारवर आरोप
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमैया यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठीच माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
14:48 September 19
देशात गेल्या 24 तासात 30 हजार रुग्णांची भर; एकट्या केरळमध्ये 19,352 रुग्णांची नोंद
नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासात 30 हजार 773 नव्या रुग्णांची भर पडली असून 309 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये 38 हजार 945 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये सापडली आहे. केरळमध्ये शनिवारी 19 हजार 352 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 143 रुग्णांचा मृत्यू झाला.
13:29 September 19
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण
शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागन झाली आहे. आमदार काळे यांनी नुकताच साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. कोरोना संक्रमित झाल्यानंतर आमदार काळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
13:15 September 19
- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली असून त्याला आज एटीएस न्यायालयात हजर केले जाणार आहे.
11:08 September 19
- देशात परप्रांतीय नागरिकांच्या विषयावर कोण राजकारण करते आहे. ते चंद्रकांत पाटील यांनी तपासावे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी दिलेले ४८ तासाचे अल्टिमेटम संपले आहे. यावर त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
- ज्याप्रमाणे गुजरातमध्ये रूपाणी यांनी राजीनामा दिला. तो भाजपाचा अंतर्गत प्रश्न होता, तसाच पंजाबचा प्रश्न काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी अपमानित झाले असेल तर मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
11:01 September 19
मुंबई : अंधेरी येथील पोलीस कॅम्पच्या भिंतीला बसची धडक; सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई : अंधेरी येथील पोलीस कॅम्पच्या भिंतीवर एका बसने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. ही धडक इतकी जोरदार होती, की बसचा पुढील भाग पूर्णपणे मोडला आहे. तसेच भिंतीचेही नुकसान झाले असून एका दुचाकीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून पोलीस यासंपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
09:33 September 19
- पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज बैठक
- हरीश रावत आणि अजय माकन यांच्यासोबत काल झाली होती आमदारांची बैठक
- मुख्यमंत्र्यांसदर्भात सोनिया गांधीजींचा निर्णय अंतिम असेल असा ठराव मंजूर
08:39 September 19
पुणे - 'माजी मंत्री म्हणू नका' या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे वक्तव्य मी माझ्यासाठी नाही, तर स्थानिक नेत्यांसाठी केले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच कितीही नेते पळवण्याचा प्रयत्न केला, तरी नागरिकांचे मोदीवर प्रेम आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
06:58 September 19
Maharashtra Breaking Update
ठाणे - पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा खास मानल्या जाणाऱ्या तारिक अब्दुल करीम मर्चंटला कथीत खंडणी प्रकरणात अटक केली आहे. याच प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगही आरोपी आहेत. तारिकला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.