ETV Bharat / city

BREAKING : महाराष्ट्राच सुपारी किलर्सचे सरकार, मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून मला गोळ्या घालण्याची धमकी - किरीट सोमैय्या - maharashtra flood situation

Breaking News
Breaking News
author img

By

Published : Sep 8, 2021, 6:45 AM IST

Updated : Sep 8, 2021, 9:56 PM IST

21:55 September 08

आमघाट जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाच्या बछड्याचा मृतदेह

नागपूर - आमघाट जंगल परिसरात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे. आमघाट येथील गुराखीने जंगलामध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला दिली आहे. वाघाच्या बछड्याचे सर्व अवयव शाबूत असून मानेची हड्डी तुटलेली आहे. त्यामुळे सदर वाघाच्या बछड्याचे 8-10 दिवसापूर्वी इतर वन्यप्राण्याच्या भांडणात मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  10 ते 12 महिन्याचा हा बछडा असून कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने नर की मादा हे कळू शकले नाही..

21:55 September 08

नव्या एसओपी वरून गोव्याच्या मुख्यमंत्रांचा घुमजाव

पणजी - ऐन चतुर्थीच्या तोंडावर सरकारने नवी कोविड एसओपी जाहीर केल्यामुळे जनतेमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता, मात्र जनतेच्या रोषामुळे मुख्यमंत्र्यांना अल्पावधीतच आपला निर्णय मागे घ्यावा लागला. गणेशोत्सव पूजनासाठी भटजींना जाण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश सरकारने जारी केला होता. गणेशोत्सव साजरा करताना जनतेने ऑनलाईन, युट्युब चा आधार घेऊन गणरायाची पूजा करावी असे निर्देश सरकारने आपल्या आदेशात दिले होते. मात्र सरकारचा आदेश येताच सोशल मीडियावर जनतेने आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे अवघ्या काही तासांतच सरकारला आपला निर्णय घ्यावा लागला.

21:06 September 08

अमरावती : अंजनगांव - परतवाडा महामार्गावर ट्रक-कारचा अपघात, दोन ठार

अमरावती- जिल्ह्यातील अंजनगांव - परतवाडा महामार्गावर बुधवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान झालेल्या ट्रक व चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीची प्राणज्योत उपचारासाठी अमरावती येथे नेत असताना रुग्णवाहिकेतच मालवली. डॉ. प्रमोद निपाणे आणि ललिता चव्हाण अशी मृतकांची नावे असून हे दोघेही अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत.

17:20 September 08

मुंबईत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करणार-आदित्य ठाकरे

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केंब्रिज बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिलीय.  जगात सर्वोत्तम जे आहे ते मुंबईत देण्याचा प्रयत्न करतोय. केंब्रिज बोर्डच्या शाळाही आता मुंबई महापालिका सुरू करत आहे. महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

16:15 September 08

मुख्यमंत्र्यांचे गुंड मला गोळ्या घालण्याची धमकी देत आहेत, किरीट सोमैय्यांची गंभीर आरोप

ठाणे - तुम्ही कितीही मोठे गुंड आणलात, अगदी दाऊद इब्राहिमला जरी आणलात तरीही आपण घोटाळ्याबाबत खुलासे करत राहणारच, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी थेट ठाकरे सरकारलाच खुले आव्हान दिले आहे.'मुख्यमंत्र्यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमक्या देत आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत', असा गंभीर आरोह त्यांनी केला. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

15:30 September 08

धक्कादायक.. अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंगानी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच

मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड करण्यासाठी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

14:54 September 08

'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ

पुणे - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा असल्याचा दावा चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला रडत असल्याचे दिसत असून रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागत आहे.

14:11 September 08

मनसुख हिरेन यांच्या घरच्यांची किरीट सोमय्या यांनी घेतली भेट..

चार्जशीट दाखल केल्याने मनसुख हिरेन यांच्या घरच्यांना शांतता वाटतेय. मनसुख हिरेन यांना कस फसवण्यात आलं हे स्पष्ट झालं आहे.

मोदी सरकारमुळे nia ने चौकशी हातात घेतली, त्यामुळे न्याय मिळाला अन्यथा ठाकरे सरकार पोलिसांच्या माध्यमाने सुपारी देऊन हत्या करत होती.

उद्धव ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांच्या नेमणुकीसाठी किती पैसे घेतले हे बाहेर आले नाही..

सरकार पोलीस बदल्यांमध्ये करोडो रुपये जे एकत्रित झाले ते सर्व महाराष्ट्र सहन करत आहे.

मनसुखच्या कुटुंबीयांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. अजूनही आरोपी बाहेर आहेत, त्यांना अटक करण्याची इच्छा व्यक्त केली..

13:23 September 08

शरद पवार हे भावना गवळीला वाचवत आहेत, उद्या याबाबत मोठा खुलासा करणार -सोमय्या

माझ्यावर हल्ला करण्यासाठी भावना गवळी यांनी गुंड पाठवले..शरद पवार हे भावना गवळीला वाचवत आहेत उद्या याबाबत मोठा खुलासा करणार

तुम्ही कितीही मोठे गुंड पाठवा. दाऊद इब्राहिमला जरी पाठवलं तरी मी घोटाळ्याबाबत खुलासा करत राहणार..किरीट सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे घोटाळेबाज असून त्यांनी 19 बंगल्याचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप

शिवसेनेचे लोक मला गोळ्या झाडण्याचा धमक्या देतात, यावर मात्र मुंबई पोलीस काही करत नाहीत.

प्रताप सरनाईक यांची संपूर्ण प्रॉपर्टी विकून ठाणे महानगरपालिकेची थकबाकी असलेली वसूल 21 कोटी जमा करण्याची मागणी

12:15 September 08

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव, आणि गजेंद्र सिंह शेखावत यांची गोवा,मणीपूर आणि पंजाब राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी(2022) प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12:10 September 08

किरीट सोमय्या ठाणे महापालिकेत दाखल

भाजप कार्यालयात पहिले दाखल, त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेणार

सेना आमदार प्रताप सरनाईक  यांच्या बेकायदेशीर बांधकाम बाबत इमारतीवर कारवाई आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार...

12:08 September 08

किरीट सोमय्या यांची वाढवली सुरक्षा, आता 40 सुरक्षा रक्षकांचा गराडा

ठाणे - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर वाशिम मधे शिवसैनिकांनी हल्ला सुद्धा केला होता, तर त्यांना धमकीचे फोनही येत असतात यावर केंद्र सरकार कडून किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा आजपासून देण्यात आली आहे. सीआयएसएफ या केंदीय सुरक्षा बलाचे 40 जवान सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत. ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत असल्यामुळे आणि माझ्यावर हल्ले होत असल्याने मी न मागता केंद्राने मला ही सुरक्षा दिली असे सोमय्यां यांनी सांगितले.

11:21 September 08

दरड कोसळून घाट बंद , दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू

- दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू..

-  नंदुरबार मधल्या चांदसैली घाटातील घटना.

- कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता झाला आहे बंद.

10:26 September 08

तळेगाव दिघे येथील अजय जगताप याची शिर्डीत निर्घृण हत्या

शिर्डी (अहमदनगर) - तळेगाव दिघे येथील अजय जगताप याची शिर्डीत निर्घृण हत्या....

रात्री मित्रांना बरोबर पार्टी करत असताना मित्रांनी केला निर्घृणपणे हत्या 

शिर्डीतील रिंगरोड लागत असलेल्या श्री साई सभा व मिलिंद थोरात संकुलातील घटना....

10:25 September 08

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, महाजनांनी केला पाहणी दौरा

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात काल (7 सप्टेंबर) चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळीच्या बागांसह कापसाचे पीक नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. -नुकसानग्रस्त भागात भाजपनेते माजीमंत्री गिरीश महाजन हे आज सकाळपासून पाहणी करत आहेत.

10:05 September 08

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचे निधन

अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक झाला आहे. त्याची आई अरुणा भाटिया यांचे आज निधन झाले. याबाबत अक्षय कुमार याने स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. 'माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.

06:23 September 08

औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद सह मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील सखल भागात मोेठ्या प्रमाणात पाणी साठले आहे.

Last Updated : Sep 8, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.