मुंबई - राज्यातील 288 मतदारसंघातील एकूण 3237 उमेदवारांचे भवितव्य आज (सोमवारी) मतपेटीत बंद होणार आहे. राज्यातील 8 कोटी 98 लाख मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करत, मतदान करणार आहेत. एकूण 96 हजार 961 मतदानकेंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक आघाडीवर आहेत ते, राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि उमेदवार. वाचा राज्यात कोणी कोठे मतदान केले आहे ते...
हेही वाचा... मतदान कार्ड नसले तरी चिंता नको...'या' 11 ओळखपत्रांचा करू शकता वापर
राज्यात मतदानाचा उत्साह.. सर्वांनी मतदान करण्याचे आव्हान...
- शिवसेनेचे उमेदवार अनिलराव बाबर यांनी सांगलीतील गार्डी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विटा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
- खेड आळंदी विधानसभा मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपातून बाहेर पडून अपक्ष उभे असलेले अतुल देशमुख यांच्यात मुख्य लढत होत आहे. येथील तीनही उमेदवारांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे.
- लातूरमध्ये १०४ वयोवर्ष शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनीही केले मतदान. मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच जिल्हयात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मतदानासाठी रांगा वाढल्या. शिवाय १०४ वर्षीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
- बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्वेसर्वा तथा सहकार नेते राधेश्याम चांडक उपाख्य भायजी यांनी बुलडाणा येथील पालिका शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
- पनवेल मधील शेकापचे उमेदवार हरेश केणी यांनी सोमवारी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. पनवेलमध्ये महायुतीचे प्रशांत ठाकूर यांच्यासमोर शेकापचे हरेश केणी यांची लढत आहे.
- पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क. प्रशांत ठाकूर यांनी सहपरिवार केले मतदान
हेही वाचा... 'आम्ही आहोत मदतीला सर्वांनी मतदान करा', वांद्र्यातील बाल मतदार मित्रांचे आवाहन
- मुंबईचे दक्षिण-मध्य खासदार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. शेवाळे यांनी मानखुर्द येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनीही मतदान केले.
- नवापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नाईक यांनी आपल्या नवगाव या गावी आपला मतदानाचा हक्क बजावला.
- धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात जास्तीत जास्त सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
- जळगाव जामोद येथे कामगार मंत्री संजय कुटे यांनी बजावला मतदानाचा हक्क.
- करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय विठ्ठलराव शिंदे यांनी पत्नी सुनीता संजय शिंदे व बहीण कांचन सुरेश नागणे यांच्यासह निमगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे मतदान केले.
- नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले मतदान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तालया मार्फत शहरातून 1300 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं आहे, मात्र असे असलं तरी मतदान करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याने तडीपार गुन्हेगारांना देखील मतदानासाठी 2 तास शहरात दाखल होण्याची मुभा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा... EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?
- शिवसेनेचे कणकवलीत उमेदवार सतीश सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क. शिवसेनेचे सतीश सावंत यांनी कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावी कुटुंबासह मतदान केले.
- आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी यवतमाळमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
- वंचितच उमेदवार राजेंद्र पगारे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. नांदगांव विधानसभा निवडणुकीत प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा उभा असलेला उमेदवारीत एकही उमेदवार स्थानिक नाही. यात फक्त वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र पगारे हे स्थानिक असून त्यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
- खासदार जलील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज सकाळी सिडको भागातील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये मुलगा, पत्नीसह मतदान केले या वेळी त्यांनी सर्वसाधारण नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहुन मतदान केले.
- काँग्रेसचे माजी खासदार राजू सातव यांनी त्यांच्या मूळ गावी मासोड येथे सपत्निक मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा अधिकार बजावला आहे.
हेही वाचा... रंजक इतिहास! मतदान करताना बोट नसेल तर खांद्याला लावली जात होती शाई
- मदन येरावार यांनी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. संविधानाने आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो अधिकार मतदारांनी बजावला पाहिजे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी केले
- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभेचे उमेदवार परिणय फुके आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. परिणय फुके मूळचे नागपूरचे आहेत आणि सध्या साकोली विधानसभा क्षेत्रातून उमेदवार आहेत मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी त्यांचे मतदान भंडारा येथे होते. म्हणून त्यांनी भंडारा येथील भगीरथ शाळेत येऊन मतदान केले. तर खासदार सुनील मेंढे यांनी त्यांचा मतदानाचा हक्क नूतन कन्या शाळेत बजावला.
- नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हिना विजयकुमार गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शहरातील डी आर हायस्कूल मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी लोकशाहीच्या उत्सव मध्ये सहभागी होण्याचे आहवन खासदार गावित यांनी केले.
- विश्वजित कदम यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. राज्यात काँग्रेस आघाडीला पोषक वातावरण असून आघाडीचे आमदार अधिक संख्येने निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. कडेगावच्या सोनसळ येथे विश्वजीत कदम यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बाजवला.
- धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोटे यांनी शहरातील न्यू सिटी हायस्कूल याठिकाणी सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा... महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट
- करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी बजावला मतदानाचा हक्क. मांगी येथील जिल्हा परिषद शाळा येथे केले मतदान.
- उदय सामंत, राजन साळवी यांनीही बजावला मतदानाचा हक्क. शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार उदय सामंत यांनी सोमवारी सकाळी लवकर मतदान केले. रत्नागिरी तालुक्यातील पाली मतदान केंद्रावर सामंत यांनी मतदान केले.
- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी मुंबईतील रॅाकहील भागातील बालकल्याणी स्कूल या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान केले.
- ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
- भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी केले सहकुटुंब मतदान. वर्ध्याचे विद्यमान आमदार तथा भाजप उमेदवार डॉक्टर पंकज भोयर यांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्यातील वसंत प्राथमिक शाळेत भोयर यांनी रांगेत लागून सकाळी कुटुंबियांसह मतदान केले.
हेही वाचा... 'महा' विधानसभा निवडणूक 2019 : प्रचाराची धुळवड अन् राजकारण
- डहाणू विधानसभा महायुती भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांनी कुटुंबासह केले मतदान. तलासरी येथील सुतारपाडा शाळेच्या मतदान केंद्रात त्यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपचे भास्कर धनारे विरुद्ध माकप महाआघाडीचे विनोद निकले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
- अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पळसो बढे येथे केंद्रीयमंत्री संजय धोत्रे यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे भाजपचे उमेदवार यांची सावरकर हेही मतदान करण्यासाठी सहपरिवार आले होते.
- मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका उषा देशमुख यांनी वयाच्या 84 व्या वर्षी नवजीवन विद्यामंदिर वांद्रे पूर्व येथे पहिला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
- राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्नी सुभद्रा कुमारी रावल यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील बुथवर त्यांनी मतदान केले.
- रविंद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. नागरिकांनी सुध्या मतदानाचा हक्क बजवावा असे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर'
- राज्यमंत्री चव्हाण यांनी पत्नीसह केले मतदान ठाणे. डोंबिवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्नीसह डोंबिवलीतील जोशी विद्यालयात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
- उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी बजावला मतदानाचा अधिकार. बोरिवलीतील नागरिक हे जागरूक आहेत. येथील नागरिक आताही मोठ्या प्रमाणात मतदान करतील असा विश्वास उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.