मुंबई - वांद्रे पूर्व येथील नवजीवन विद्या मंदिर येथे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदान केंद्रावर महात्मा गांधी आणि नवजीवन विद्यामंदिर आदी शाळेतील काही चिमुकल्यांनी स्वतःहून या मतदान प्रक्रियेमध्ये आपलेही योगदान असावे यासाठी सकाळपासून ते मतदार मित्र म्हणून आपले योगदान देत आहेत.
हेही वाचा... मतदान कार्ड नसले तरी चिंता नको...'या' 11 ओळखपत्रांचा करू शकता वापर
सकाळी साडेनऊ पर्यंत केवळ 5.46 टक्के मतदान झाले होते.
आम्ही वयाने लहान असल्याने आता मतदान करू शकत नाही. परंतु जे मतदार आहेत त्यांनी मतदान करावे, यासाठी आम्ही त्यांच्या मदतीला उभे आहोत असे आवाहन वांद्रा येथे अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून येणार्या चिमुकल्या मतदार मित्रांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. हे मतदार येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच अपंग आधी आदींना ते स्वतःहून मदत करत आहेत.
हेही वाचा... विधानसभा निवडणूक : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
आम्ही मतदान करू शकत नाही पण तुम्ही मतदान करा
महात्मा गांधी विद्यालय येथील छात्र सेनेच्या विद्यार्थी असलेला हेमंत कदम म्हणाला की, या ठिकाणी येणारे जेष्ठ नागरिक आणि अपंगासाठी मदत मिळावी म्हणून आम्हाला शाळेकडून खास शिकवण देण्यात आली असून त्यासाठी आम्ही या मतदान केंद्रावर आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तर यश चव्हाण हा मतदार मित्र म्हणाला की, आपल्याला मतदानातून आपला उमेदवार निवडता येतो आणि तो निवडण्याचा अधिकार मतदारांना आहे. आम्ही मात्र लहान असल्याने आत्ता मतदान करू शकत नाही मात्र जे मतदार आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही ते मदतीसाठी आलो आहोत. तर आयुश ओरके हा मतदार मित्र म्हणाला की, मतदानातूनच सरकार बनते आणि देशाचा विकास होतो आणि त्यात आमचेही योगदान असावे म्हणून आम्ही या मतदान प्रक्रियेत आमचे योगदान देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले