ETV Bharat / city

मनसेचं आता काय होणार? - MNS ELECTION NEWS

मनसेचं आता काय होणार?

राज ठाकरे
author img

By

Published : Oct 24, 2019, 10:18 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावरुन कोणत्याच पक्षाला स्वबळावर सत्तेचा सोपान जनतेने दिला नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. काहीच नाही म्हणता म्हणता अखेरच्या क्षणी मनसेच्या इंजिनाला एक चाक मिळाले आहे. कल्याण ग्रामीणमधून प्रदीप पाटील हे मनसेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे आता मनसेचं आता काय होणार हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

हेही वाचा - शहरी मतदारांनी 'सेना भाजप'ला तारले..?

2014 लोकसभेमध्ये मोदी यांना साथ देण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभेत हेच राज ठाकरे मोदींच्या विरोधात प्रचार करत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणालाही मत द्या पण भाजपला मत देऊ नका, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचार केला होता. मात्र, त्याचा परिणात काहीही झालेला नसल्याचे निकालांमधून समोर आले होते. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसे निवडणूक लढवणार की नाही हा प्रश्न सर्वसामान्यांप्रमाणेच मनसे कार्यकर्त्यांनाही पडला होता. मात्र, अखेरच्या काळात मनसेने 104 जागा लढवल्या आणि आम्हाला विरोधीपक्षाची सत्ता द्या, अशी विनंती जनतेले केली होती. त्यानंतर मनसेला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे आता मनसेचे काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात शरद पवारच ठरले ‘तेल लावलेले पैलवान’

  • 27 नोव्हेंबर 2005 : राज यांनी शिवसेना सोडली. 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना
  • मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार आले. आणखी 13 जागांवर क्रमांक दोनची मतं मिळाली. 29 जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
  • 2014 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत मनसेला सार्वत्रिक पिछेहाटीचा सामना करावा लागला. राज्यातल्या जनतेसाठी कळीचा बनलेला टोलचा मुद्दा राज यांनी उचलला खरा, पण त्यांनी तो मध्येच सोडल्याची त्यांच्यावर टीका
  • 2014 लोकसभेत मोदींना मतं देण्याचे राज ठाकरे यांनी केले होते आवाहन. मनसेने मात्र एकही जागा लढवली नव्हती.
  • 2014 विधानसभा निवडणुकीत 1 जागा मनसेच्या खात्यात. नंतर त्यांनीही मनसेला ठोकला रामराम
  • 2019 मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही पण मोदी-शाह या जोडीच्या विरोधात त्यांनी दंड थोपटलं. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी भाजपविरोधात प्रचार केला होता.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी 104 उमेदवारांची यादी जाहीर. लागलेल्या निकालात मनसेच्या वाट्याला 1 जागा

आता काय?

  1. राज ठाकरे ग्राऊंडवर जाऊन पक्षाला उभारी देणार का?
  2. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचा आरोप मोडत कार्यकर्त्यांना वेळ देणार का?
  3. पक्षबांधणीसाठी स्वत:हा राज ठाकरे लक्ष देणार का?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.