ETV Bharat / city

अर्थसंकल्पीय अधिवेशन LIVE Updates : 'अन्वय नाईक प्रकरणी माझी चौकशी करा'; फडणवीसांचं गृहमंत्र्यांना खुलं आव्हान! - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Maharashtra Assembly Budget Session LIVE Updates
LIVE Updates : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
author img

By

Published : Mar 9, 2021, 12:44 PM IST

Updated : Mar 9, 2021, 4:13 PM IST

16:08 March 09

मनसुख प्रकरणी फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल..

विधानभवनातून बाहेर आल्यानंतरही फडणवीस यांनी मनसुख प्रकरणी सरकारवर हल्ला केला आहे. मनसुख यांच्या पत्नीच्या जवाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख यांची गाडी चार महिन्यांपासून वझे वापरत होते. असं असतानाही मनसुख यांच्या हत्येचा तपास वझेंकडे देण्यात आला. पोलिसांकडे भक्कम पुरावे असतानाही वझेंविरोधात कारवाई का होत नाही? या प्रकरणात वझेंच्या पाठिमागे कोणा कोणाचा हात? या प्रकरणात कोणाची नावे समोर येण्याची भाती सरकारला आहे? असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.

16:04 March 09

सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब..

विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. पुढील कामकाज बुधवारी सकाळी ११ वाजता पूर्ववत होईल. 

15:08 March 09

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ; कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब..

कामकाजास सुरुवात झाल्यानंतर नाना पटोलेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली होती. मात्र, यावरुन विरोधकांनी पुन्हा गोंधळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.

15:07 March 09

सभागृहाच्या कामकाजास सुरुवात..

विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. दहा मिनिटांनंतर कामकाजास सुरुवात झाली आहे. 

14:55 March 09

'अन्वय नाईक प्रकरणी माझी चौकशी करा'; फडणवीसांचं गृहमंत्र्यांना खुलं आव्हान!

"अन्वय नाईक प्रकरणी सरकारने माझी चौकशी करावी, माझं गृहमंत्र्यांना खुलं आव्हान आहे" असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असून, ज्याला कर नाही त्याला डर कशाला असेही ते ते म्हणाले. तर, भाजपाची केंद्रात सत्ता असल्यामुळेच विरोधकांना एवढा आत्मविश्वास आला आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

14:53 March 09

फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले - गृहमंत्री

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

14:50 March 09

अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी होऊ नये म्हणून सचिन वझेंना लक्ष्य केलं जातंय - भास्कर जाधव

अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी सचिन वझे करत होते. ती चौकशी झाली तर फडणवीस अडचणीत येतील. त्यामुळे ते वझेंना लक्ष्य करत आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. यावर प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी नाईकांना 'आम्हाला धमकी देऊ नका' असे सुनावले. अन्वय नाईक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे, हे भास्कर जाधवांना माहिती नाही असेही ते म्हणाले. 

14:50 March 09

सरकारवर कोणाचा दबाव? - फडणवीस

सचिन वझेंना वाचवण्यासाठी सरकारवर कोणाचा दबाव आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला.

14:47 March 09

विरोधकांच्या गदारोळात पुन्हा कामकाजास सुरुवात..

विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच सभागृहाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. काही विधेयकांच्या संमतीनंतर आता अर्थसंकल्पावर चर्चा सुरू करण्यासाठी अध्यक्षांनी सभागृहाला निर्देश दिले आहेत. तीन तास ही चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी आजचाच दिवस वेळ असणार आहे.

14:43 March 09

कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करा - नाना पटोले

सचिन वझे प्रकरणावरुन विरोधकांनी सभागृहातच आंदोलन सुरू केले आहे. सर्व विरोधक आपल्या जागेवरुन उठून खाली आले आहेत, आणि 'ये सरकार खूनी है' अशी घोषणाबाजी सभागृहात सुरू आहे. कोरोनामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे, कोरोनाचे नियम लागू केले आहेत असे असताना विरोधक एकत्र येत गदारोळ करत आहेत. त्यामुळे सर्वात आधी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

14:39 March 09

महाराष्ट्र हे 'आत्महत्या डेस्टिनेशन' आहे का?

बाहेरुन आलेले लोक महाराष्ट्र्रात आत्महत्या करतात, याबाबत सरकारला राज्याचा अभिमान वाटतो का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र आता आत्महत्येसाठी ओळखले जाणार आहे का? असेही ते म्हणाले.

14:36 March 09

गृहमंत्री सचिन वझेंना का पाठिशी घालत आहेत?

गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वझेंना का पाठिशी घालत आहेत? या प्रकरणात नेमकी कुणा कुणाची नावे समोर येणार आहेत? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. विरोधकांचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. 

14:27 March 09

14:23 March 09

विरोधकांच्या गदारोळात कामकाजास सुरुवात..

विरोधकांच्या गदारोळातच सभागृहाच्या अर्थसंकल्पीय कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे.

14:21 March 09

अर्थसंकल्पाची चर्चा टाळण्यासाठी विरोधकांचा रडीचा डाव - भास्कर जाधव

हिरेन प्रकरणावरुन विरोधकांचा गोंधळ सुरुच आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पापेक्षा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प चांगला असल्यामुळे विरोधक नैराश्यात आहेत. यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नाहीत, त्यामुळे आता वेगळ्या प्रकरणांवरुन गदारोळ करण्याचा रडीचा डाव विरोधक खेळत आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

14:18 March 09

मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा सीडीआर मिळवल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यावर फडणवीसांनी 'हो मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा' असे प्रत्युत्तर दिले. मात्र त्यासोबतच, ज्यांनी तो सीडीआर ज्याने लिहिला त्याचीदेखील चौकशी करा, असेही ते म्हणाले.

14:17 March 09

एटीएसच्या तपास पथकात वझेंचे नाव नाही - देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रत्युत्तर देताना असे स्पष्ट केले, की हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे आणि त्यात वझेंचा समावेश नाही.

14:15 March 09

गृहमंत्री एका अपराध्याला पाठिशी घालत आहेत..

सचिन वझेंवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही यामागे गृहमंत्र्यांचेच काही कारण असावे, असे म्हणत फडणवीसांनी थेट अनिल देशमुख यांच्यावरच शंका व्यक्त केली. यानंतर विरोधकांनी वझेंच्या निलंबनाची मागणी करत गदारोळ सुरू केला.

14:13 March 09

वझेंना तातडीने निलंबित करा; फडणवीसांची मागणी

राज्य सरकार सचिन वझेंना पाठिशी घालत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वझे यांना गृहमंत्र्यांनी तातडीने बडतर्फ किंवा निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली.

14:09 March 09

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी..

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. हिरेन आणि वाझे प्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना देशमुखांनी ही घोषणा केली. हिरेन आणि वाझे प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. याप्रकरणी जर विरोधकांकडे अधिक कागदपत्रे असतील, तर ती त्यांनी एटीएसकडे किंवा माझ्याकडे जमा करावीत असेही अनिल देशमुख म्हणाले. एटीएस या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

13:00 March 09

कामकाज सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरुच; १५ मिनिटांसाठी पुन्हा तहकूब..

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, गृहमंत्र्यांच्या निवेदनापूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू न करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केल्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.

12:42 March 09

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक सुरू..

मनसुख हिरेन प्रकरणावरुन झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले असून, आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

12:16 March 09

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन..

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होताच मनसुख हिरेन प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ झाला. मनसुख हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन कलम २०१ अंतर्गत वझे यांना अटक का झाली नाही? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. मनसुख हिरेन यांची गाडीमध्ये हत्या झाली असून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.

यावर अनिल परब यांनी मोहन डेलकर प्रकरणाचा मुद्दा समोर आणला. हिरेन यांना न्याय मिळालाच पाहिजे मात्र, मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती, त्यांनी लिहिलेल्या पत्रात भाजपा नेत्यांची नावे आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत असे परब म्हणाले.

Last Updated : Mar 9, 2021, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.