ETV Bharat / city

Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra and India Rain live : देशातील विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. आज देशातील काही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस
देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jul 14, 2022, 12:18 PM IST

Updated : Jul 14, 2022, 12:27 PM IST

नांदेड - संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून प्रवाहित ( Panganga River Is Overflowing ) झाली. त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा ( Sahastrakund Waterfall ) रुद्रावतार पहायला मिळत आहे. या पूर सदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, त्याच बरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ पर्यंत सातत्याने बरसतोय. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावे लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आहे त्याच पांदण रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून,पैनगंगा नदीला पूर येण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची ( Nanded rains update ) नोंद झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Nanded District Administration ) केले आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

नागपूर - नागपूरच्या इंदोरा परिसरातील हॉटेल "अरेबियन ताज"च्या ( Arabian Taj ) स्वयंपाक गृहात काम करत असतांना अचानक छताचा आणि भिंतीचा काही भाग कोसळला ( Roof And Wall Part Collapsed ). अचानक ही घटना घडली त्यामुळे कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. लागलीच त्या ठिकाणाहून बाहेर धाव ( Employee Run Out Side ) घेतली. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी घडल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे. पावसामुळे भिंतीत पाणी मुरून भिंतीचा भाग कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक भिंतीचा भाग कोसळला असला तरी सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. किरकोळ स्वरूपाची जखम एका कर्मचाऱ्याला झाली आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

नागपूर जिल्ह्यामध्ये ( Nagpur District ) सततधार पावसाने ( Rain ) सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे. 18 धरणातून ( dam ) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Appeal of district administration ) केले आहे. मागील 2 दिवसात 10 जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनीही परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी आर. विमला यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द! - गुरुवारी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा अतिवृष्टीचा इशारा ( Heavy Rain Warning ) देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाने आपल्या आजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. 11 ते 14 जुलैपर्यंत तीनही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात ( Orange alert was given to three districts ) आला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 48 तासांत संततधार पाऊस ( Continuous rain in Chandrapur district ) सुरू आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले असून अनेक गावांचा ( Many villages were cut off due to rains ) संपर्क तुटला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, जिवती या तीन तालुक्यात ( Excessive rainfall in three Tahsil ) अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सरासरी 48 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, इरई धरणाची तीन दारवाजे उघडण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक शेतकरी नाल्यात वाहून गेला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील काही मध्यम तसेच लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, इरई धऱणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेनेही शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सावधिगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

पुणे - हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

नवी मुंबई - मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हा आदेश काढला आहे. नवी मुंबई परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 14 जुलै रोजी शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने गुजरात मधील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अमरेली, गीर सोमनाथ, नवसारी, डांग, वलसाड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे जुनागढ, भावनगर, सूरत, तापी या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पाऊस सुरुच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते.

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी - मध्य प्रदेश मधील धार, देवास, सीहोर, रायसेन, होशंगाबाद या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच शेजारच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, बालोद, कांकेर, नारायणपूर, विजापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसामुळं पुरस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

Last Updated : Jul 14, 2022, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.