ETV Bharat / city

महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांतून सोमवारी रेकॉर्ड ब्रेक वीज उत्पादन

महाजेनकोने विक्रमी उत्पादन घेतल्याचा दावा केला आहे. १० हजार ३४ मेगावॅट वीज उत्पादन केल्याची माहिती महाजेनकोच्या वतीने देण्यात आली.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 21, 2019, 1:53 PM IST

मुंबई - सोमवारी दुपारी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकॉर्ड ब्रेक १० हजार ३४ मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा महाजेनकोने केला आहे.

औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7577 मेगावॅट, यात नाशिक 561 मेगावॅट, कोराडी 1500 मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, पारस 450 मेगावॅट, चंद्रपूर 2550 मेगावॅट, भुसावळ 967 मेगावॅट तर उरण वायू विद्युत केंद्र 270 मेगावॅट, सौर ऊर्जा 119 मेगावॅट व जलविद्युत केंद्रांपासून 2100 मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले.

राज्यात सर्वदूर कडक उन्हाळा असून विजेची एकूण मागणी 22300 मेगावॅट इतकी पोहोचली आहे. राज्याचे वीज उत्पादन 17337 मेगावॅट (खासगी वीज उत्पादनासह) इतके आहे. सुमारे 5357 मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेण्यात येत आहे.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी संचालक व महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर व जलविद्युत केंद्रातील मुख्य अभियंते, अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्या प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी सगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.

Intro:Body:
MH_Mum_Magagenco_720468

महानिर्मितीचे १००३४ मेगावॅट रेकोर्ड वीज उत्पादन

महानिर्मितीच्या इतिहासात प्रथमच १०००० मेगावाट पार वीज उत्पादन

औष्णिक वीज उत्पादन - ७५७७ मेगावॅट

वायू वीज उत्पादन – २७० मेगावॅट

जल विद्युत उत्पादन – २१०० मेगावॅट

सौर वीज उत्पादन ११९ मेगावॅट

मुंबई: सोमवारी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकोर्ड १००३४ मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा महाजनकोने केला आहे.

यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन ७५७७ मेगावॅट, ज्यात नाशिक ५६१ मेगावॅट, कोराडी १५०० मेगावॅट, खापरखेडा ९५१ मेगावॅट, पारस ४५० मेगावॅट, चंद्रपूर २५५० मेगावॅट, भुसावळ ९६७ मेगावॅट तर उरण वायू विद्युत केंद्र २७० मेगावॅट, सौर ऊर्जा ११९ मेगावॅट व जल विद्युत केंद्रांपासून २१०० मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले.

राज्यात सर्वदूर कडक उन्हाळा असून विजेची एकूण मागणी २२३०० मेगावॅट पोहोचली असून राज्याचे वीज उत्पादन १७३३७ मेगावॅट (खाजगी वीज उत्पादनासह) इतके आहे. सुमारे ५३५७ मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेण्यात येत आहे.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक(संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे यांचे कुशल नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी संचालक व महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर व जल विद्युत केंद्रातील सर्व संबंधित मुख्य अभियंते व त्या अंतर्गत कार्यरत अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांची हि फलश्रुती असल्याचे संचालक(संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले.
१००३४ मेगावॅट ऐतिहासिक रेकोर्ड वीज उत्पादनाबद्दल सर्व संबंधित कुशल मनुष्यबळाचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी अभिनंदन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.