ETV Bharat / city

Maha Vikas Aghadi in Action Mode Against BJP : ...अखेर भाजपविरोधात महाविकास आघाडी ऍक्शन मोडमध्ये - भाजपविरोधात महाविकास आघाडी ऍक्शन मोडमध्ये

भाजपविरोधात महाविकास आघाडी ठोस भूमिका घेत नाही, असे वातावरण राज्यात निर्माण झाले होते. अखेर भाजपविरोधात महाविकास आघाडी ऍक्शन मोडमध्ये आली ( Maha Vikas Aghadi in Action Mode Against BJP ) असून भाजपच्या नेत्यांविरोधात त्यांनी आपली पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामुळे येत्या काळात भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष यामुळे आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीतील दोन दिग्गज नेत्यांच्या विरोधात ईडीने लावलेल्या कलमांमुळे त्यांना जामीन मिळलेही अवघड झाले आहे. पण, भजाप नेत्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईवर भाजप नेते जामीन मिळवत आहेत. त्यामुळे भाजपच्या किती नेत्यांवर कारवाई होईल, हे सांगणे कठीण आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2022, 8:36 PM IST

Updated : Apr 14, 2022, 4:26 PM IST

मुंबई - भाजपविरोधात महाविकास आघाडी ठोस भूमिका घेत नाही, असे वातावरण राज्यात निर्माण झाले होते. अखेर महाविकास आघाडी ऍक्शन मोडमध्ये आली असून भाजपच्या नेत्यांविरोधात त्यांनी आपली पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामुळे येत्या काळात भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष यामुळे आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अखेर भाजपविरोधात राज्यसरकारने उडला मोर्चा - राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्रीय तपास वावर वाढला आहे. अनेक नेते आणि मंत्री केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असून महाविकास आघाडीचे दोन दिग्गज नेते माजी मंत्री अनिल देशमुख व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत. केंद्रामार्फत तपास यंत्रणेवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप सरकारमधील अनेक नेत्यांनी केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कारवाई टाळण्यासाठी भाजपशी जुळवून घ्या, अशी मागणी केली होती. संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) यांनी सरकार पडण्यासाठी कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा गौप्यस्फोट करणारे पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिले आहे. भाजप नेते किरीट सोमैया केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपूर्वीच नावे जाहीर करुन खळबळ उडवून देत आहेत. भाजपला रोखण्यासाठी राज्यातील यंत्रणांचा लोकशाही पद्धतीने वापर करा, अशी गृह विभागाकडे मागणी करत गृहमंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. गृहमंत्रीपद शिवसेनेकडे द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून भाजप नेत्यांच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीला सुरूवात केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचे धागेदोरे फडणवीसांपर्यंत..? - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( BJP Leader Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री असताना गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांनी टॉप सिक्रेट कागदपत्राचा दाखला देत अनेकांचे फोन टॅपिंग ( Phone Tapping ) केले होते. सत्ता स्थापनेच्या काळातच फडणवीस यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग केल्याचा आघाडी सरकारला संशय आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जबाब घेण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे फडणवीस यांच्याशी जोडले जात असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा - Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्लांकडून राऊत, खडसेंचा 127 वेळा फोन टॅप?

दरेकरांवर कारवाईची टांगती तलवार - मुंबई बँक ( Mumbai Bank Case ) घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( BJP Leader Pravin Darekar ) यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन केला. सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता. दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अनेक वर्षांपासून याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर जामीन दिला. मात्र, चौकशीचा ससेमिरा सुरू असल्याने दरेकरांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

हेही वाचा - Mumbai Bank Case : प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

सोमैयांवरील कारवाई अद्याप टळलेली नाही - भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांवर अनेक कथित घोटाळ्याचे आरोप केले आहेत. या सर्व प्रकरणाची केंद्रीय तपास चौकशी सुरू आहे. 2014 मध्ये सेव्ह आयएनएस विक्रांत ही मोहीम भाजपनेते किरीट सोमैया यांनी सुरू केली ( INS Vikrant Case ) होती. या मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमैयांनी कोट्यवधी रुपये जमा केले. ते पैसे राजभवनाला देणार असल्याचे सांगूनही ते 57 ते 58 कोटी रुपये राजभवनाला दिलेच नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हा मोठा देशद्रोह असून याची केंद्रीय तपास यंत्रणांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र सरकारने यावर कडक करावाई करावी, अशीही मागणी राऊत यांनी केली होती. याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात एका माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन सोमैया पिता-पुत्राविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अटक टाळण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी सत्र न्यायालयाने धाव घेतली. न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. यानंतर कारवाईची मागणी धरू लागली. त्यामुळे किरीट सोमैयांनी उच्च न्यायालयाने धाव घेऊन जामिनसाठी अर्ज केला. न्यायालयाने जुने प्रकरण असल्याचे निरीक्षण नोंदवत जामीन दिला. मात्र, पोलीस ठाण्यात चौकशीला सतत चार दिवस हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सोमैयांवर कारवाई अद्याप टळलेली नाही.

हेही वाचा - Interim Bail to Kirit Somaiya : मुंबई उच्च न्यायालयाचा किरीट सोमैया यांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

सदावर्तेंचा कर्ताधर्ता कोण.? - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक ( Silver Oak ) या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते प्रमुख आरोपी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी सदावर्ते यांनी केलेल्या भाषणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या आधारे सदावर्ते यांचा नागपूर कनेक्शन जोडला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा कर्ताधर्ता कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, एका भाषणावेळी आरएसएसचा उल्लेख करून सदावर्तेंनी कोंडी केली आहे. दरम्यान, साताऱ्यातील एका जुन्या गुन्ह्यात पोलिसांना ते हवे असल्याने सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte Custody : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीस घेणार

चित्रा वाघ यांच्यावर आरोप - शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh ) यांनी करायला लावल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्वतः त्या महिलेने याबाबत प्रसार माध्यमांसमोर बाजू मांडल्याने चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जबरदस्तीने आरोप करायला लावले. तसेच सुसाईड नोट वाघ यांच्या माणसांनी आणून दिल्याचाही आरोप त्या महिलेने केले आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्याने चित्रा वाघ यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप

राज्य सरकारने लावले चौकशीचे ससेमिरे - आजपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र, भाजपच्या लोकांवर कारवाई होत नाही, अशी खंत बोलून दाखवली होती. आता फोन टॅपिंग प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडला गेला आहे. प्रवीण दरेकर यांचे मुंबई बँक घोटाळा व बोगस मजूर प्रकरण, किरीट सोमैयांचे सेव्ह विक्रांत निधीतील अपहार, सदावर्तेंचे नागपूर कनेक्शन आणि चित्रा वाघ यांचे ब्लॅकमेलिंग प्रकरण समोर आले आहे. यामुळे या नेत्यांच्या मागे राज्य सरकारने चौकशीचे ससेमिरे लावले आहेत.

भाजप नेत्यांवर कारवाई होईल हे सांगणे कठीण - ज्या पद्धतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( NCP Leader Anil Deshmukh ) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) अटकेत आहेत. ईडीने लावलेल्या कलमात त्यांना जामीनही मिळत नाही. मात्र, पोलिसांच्या कलमात जामीन मिळवता येतो. त्यामुळे भाजपच्या किती नेत्यांवर कारवाई होईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भाजप नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचे पाहायला मिळत आहे, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा - Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणात मुंबई एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

Last Updated : Apr 14, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.