ETV Bharat / city

Budget Session LIVE Update : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस

author img

By

Published : Mar 8, 2022, 10:04 AM IST

Updated : Mar 8, 2022, 6:40 PM IST

विधानसभा सत्र
विधानसभा सत्र

18:39 March 08

मलिक यांचा राजिनामा का नाही, फडणवीस यांचा सवाल

नवाब मलिक यांचा राजीनामा झाल्यास जनतेचा विजय. देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात राजीनाम्याची मागणी. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, देशमुख यांचा राजीनामा घेतला, मग मलिकांचा का नाही असा फडणवीस यांचा सवाल.

17:59 March 08

अलीकडच्या काळात पोलिस दडपणाखाली काम करतायेत - फणवीस

राज्यातील पोलिस यंत्रणा चांगले काम करतेय, पण अलीकडच्या काळात पोलिस दडपणाखाली काम करतायेत - फणवीस

विरोधकांना संपवण्याचे काम हे सरकार करत आहे. मी सुद्धा गृहमंत्री राहिलो आहे. राज्यात नेमके काय चालले आहे तेच कळत नाही. मी येथे पेन ड्राईव्ह देत आहे. सरकार कसे षड्यंत्र करतेय हे यात आहे. गिरीश महाजन यांना कसे फसवले आहे हे त्यात बघा. बनवाट केस तयार केली आहे. फडणवीस यांनी सभागृहातच हे आरोप केले.

17:55 March 08

कुपोषणावर फडणवीस कडाडले

कुपोषणावर फडणवीस कडाडले

शहापूर तालुक्यात कुपोषित मुलंची संख्या वाढत आहे

राज्यातील कुपोषित आकडा वाढत आहे, त्यावर राज्य सरकारने तत्काळ उपाय योजना करावी

पालघर, शाहपुर तालुक्यात मागील काही दिवसापासून कुपोषणाच्या आकडा वाढतोय

कुपोषणावर राज्य सरकार काय करणार ते सांगावे

कायदा आणि सुव्यवस्था याचे राज्यात तीन तेरा वजले आहेत

कायदा व सुव्यवस्था वरील जनतेचा विश्वास उडत आहे

17:19 March 08

मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलं स्टेअरिंग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी हजेरी लावली. मुख्यमंत्री ठाकरे स्वत:गाडी चालवत विधिमंडळ परिसरातून बाहेर पडले आहे.

15:39 March 08

विलगीकरणावर चर्चा

एसटी विलगिकरणावर परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेच्या सभापतींनी सूचना दिल्या नंतर समिती गठित करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आश्वासन

13:27 March 08

एसटी संपाबाबत समिती नेणार

विधानपरिषदेच्या सभापतींनी सूचना दिल्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कमिटी नेमली जाणार आहे. मंत्री, विरोधीपक्ष नेते आणि सभागृहातील सदस्यांना घेऊन कमिटी तयार करावी. येत्या आठवड्यात समिती नेमण्याबाबत विचार करू अशी परिवहन मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे.

12:35 March 08

नागपुरातील पाचपावलीत उड्डाणपूल बांधणार

नागपूर येथील उत्तर आणि पूर्व नागपूर ला जोडणाऱ्या पाच पावली उड्डाण पुलाची दुरवस्था झाली असून संस्कृती कला कमाल चौक गोळीबार चौक असलेल्या पुलाच्या गडची जोडणी उखडल्याचे निदर्शनास आले असून अत्यंत गंभीर असल्याची बाब आमदार नाना पटोले यांनी सभागृहात मांडली. याबाबत सरकारने दुर्लक्ष न करता नवीन पूल बांधण्याची मागणी होत आहेत याकडे लक्ष द्यावे असेही पटोले यांनी म्हटले. यासंदर्भात उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बाब काही अंशी खरी असून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारने या संदर्भात नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बारा मीटर रुंदीचा नवा पूल या ठिकाणी उभारण्यात येणार असून येत्या दोन वर्षांत 650 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.

11:52 March 08

प्रश्नोत्तरांचा तास

जितेंद्र आव्हाड

- वायकर साहेब बर झाल तुम्ही हा प्रश्न विचारला

- तुम्ही विभागाचे राज्य मंत्री होता

- तुम्हांला या बद्द्ल माहिती असेल

- आणि ही फाईल बघायला माजी मुख्यमंत्री यांनी तुम्हाला अडवल नसेल

रविंद्र वायकर

- सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देणं हे. मंत्र्यांच काम आहे

आमदार दिलीप लांडे

- कोहिनूर सिटी मधील लोकांची गैरसोय आहे

- अनेकांची घर वाहून गेली आहेत

- माजी मुख्यमंत्री यांनी चाव्या वाटल्या पण घर कुठे आहेत

- सरकाराला हे दिसत नाही का

- मंत्र्यांनी अशी उडवा उडवीची उत्तर देउन चालणार नाही

11:19 March 08

सरकारविरोधी घोषणाबाजी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजपने विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्‍या ठाकरे सरकारचा निषेध केला. राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, अशीआग्रही भूमिका यावेळी मांडली. शेतकऱ्यांना वीज बील माफी, कर्जमाफीची मागणी यावेळी करण्यात आली. ठाकरे सरकार चोर आहे, वसुलीबाज सरकार, उद्धवठाकरे हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या या घोषणेबाजीमुळे विधिमंडळ परिसर दणाणून गेला.

10:51 March 08

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे आंदोलन

  • Mumbai | Bharatiya Janata Party MLAs stage protest outside Maharashtra Assembly demanding state minister Nawab Malik's resignation

    Malik was arrested by ED in connection with Dawood Ibrahim money laundering case. pic.twitter.com/fm77r6MUeM

    — ANI (@ANI) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना अटक झाली आहे. मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधीत लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांना ईडीने अटक केली असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनी केली आहे.

09:17 March 08

अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशात पुरवणी मागण्या, लक्षवेधी, चर्चा, ठराव मांडण्यात येत आहे. तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरत आहे.

Last Updated : Mar 8, 2022, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.