ETV Bharat / city

Lung Rehabilitation Center : कांदिवलीतील डॉ. आंबेडकर रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र सुरू

author img

By

Published : Feb 13, 2022, 9:37 PM IST

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात 22 डिसेंबर, 2021 रोजी मुंबईतील पहिले असे ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कांदिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ( Dr. Babasaheb Ambedkar Hospital ) फुप्फुस पुनर्वसन केंद्र Lung Rehabilitation Center )सुरू केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मुंबई - मुंबईतील क्षयरुग्णांना आणि श्वसनाशी संबंधित विकारांमधून सावरण्यासाठी तसेच रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ( BMC ) कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात ( Dr. Babasaheb Ambedkar Hospital ) ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात ( Lung Rehabilitation Center ) आले आहे. यापूर्वी शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात पहिले फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते.

फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित - महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थिती लावली. मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मंगला गोमारे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात 22 डिसेंबर, 2021 रोजी मुंबईतील पहिले असे ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कांदिवलीत केंद्र सुरू केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या फुप्फुस पुनर्वसन केंद्रासाठी सिप्ला फाऊंडेशन ( Cipla Foundation ) यांनी यंत्र पुरविण्यासाठी मदत दिली आहे तर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुंबईकर नागरिकांचे हित लक्षात घेता उपनगरीय रुग्णालयांमध्ये शक्य तिथे क्षयरुग्णांना उपचारांच्या सुविधा पुरविल्या जातील, असे डॉ. मंगला गोमारे यांनी नमूद केले.

फुप्फुस पुनर्वसनाशी संबंधित उपचार - कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ हे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार आहे. या केंद्राद्वारे श्वसनाशी संबंधित सर्व विकारांसाठी आवश्यक पुनर्वसन उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत. यामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसह क्षयरोगातून बरे झालेले रुग्ण, गंभीर स्वरुपाच्या फुप्फुस आजाराचे रुग्ण, दमा, सूक्ष्म श्वासनलिकेचे रुग्ण, फुप्फुसांना भेगा पडल्याने त्रस्त झालेले रुग्ण, कोविडमधून बरे झालेले रुग्ण, अशा विविध प्रकारच्या रुग्णांना फुप्फुस पुनर्वसनाशी संबंधित उपचार घेता येतील.

हेही वाचा - Zero Corona Death in Dharavi : कोरोनाची तिसरी लाट; धारावीत सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.