मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहेत. आज 521 रुग्णांची नोंद झाली असून ही गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज मृतांच्या आकडेवारीतही घट झाली आहे. आज 7 मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 720 दिवसांवर पोहचला आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 720 दिवसांवर -
मुंबईत आज 521 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 21 हजार 891 वर पोहचला आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 305 वर पोहचला आहे. आज 685 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 89 हजार 675 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 637 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 720 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 16 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 83 इमारतीत रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 286 तर आतापर्यंत एकूण 68 लाख 41 हजार 314 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ-उतार सुरूच -
1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733, 21 जून ला 521 नवे रुग्ण आढळून आले आहेत.