मुंबई - राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी विविध संघटना मुंबईच्या वेशीवर धडकल्या आहेत. शासकीय सेवेत 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद (Old Pension Scheme) करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. यासाठी पेन्शनर संघटनेच्या वतीने विधानपरिषदेवर मोर्चा (Protest for Old Pension Scheme) काढण्यात आलेला आहे. मात्र या मोर्चाला मुलुंड जकात नाका येथे अडवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहेत. मात्र कर्मचारी आक्रमक पवित्र्यात आहेत.
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करा, विधिमंडळाच्या दिशेने कर्मचाऱ्यांचा लॉंगमार्च
शासकीय सेवेत (Government Servent) 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Government Employees Pension) निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून संबधित कर्मचारी आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.