ETV Bharat / city

पर्यावरणाची हानी न करता दीर्घकालीन टिकणारा विकास हवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Long lasting development says Uddhav Thackeray

विकास मुळावर येणारा नको. तर, तो शाश्वत हवा, शाश्वत म्हणजेच पर्यावरणाची हानी न करता दीर्घकालीन टिकणारा विकास हवा. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी काम करायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केले.

Mumbai Environment Action Plan cm Uddhav Thackeray
मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल लोकार्पण
author img

By

Published : Mar 13, 2022, 10:34 PM IST

मुंबई - आपले जगणे सुसह्य करण्यासाठी ज्या सुविधा उभारतो त्या उभारताना त्या पर्यावरणस्नेही आहेत का? याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. निरोगी जगण्यासाठी चांगले वातावरण आवश्यक आहे. विकास मुळावर येणारा नको. तर, तो शाश्वत हवा, शाश्वत म्हणजेच पर्यावरणाची हानी न करता दीर्घकालीन टिकणारा विकास हवा. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी काम करायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केले.

हेही वाचा - अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर उद्या विशेष पीएमएलए न्यायालय देणार निर्णय

पर्यावरण जगण्यासाठी आवश्यक -

महापालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृह येथे झाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, पर्यावरण हा विषय आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. अनेकदा यावर चर्चा होते, परिसंवाद होतात, पण आपण काही करत नाही. कुणालाही सांगून खरे वाटणार नाही की, आजच्या आणि गेल्या महिन्यात याच दिवसाच्या तापमानात किती मोठा फरक झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महापालिकेने पहिले पाऊल टाकले -

वातावरणीय बदल म्हणजे नेमके काय? हे थोपवता येत नाही का? मग हे कुणी करायचे? हाच धागा पकडत मुंबई महापालिकेने पहिले पाऊल टाकले. देशातील हे पहिले महानगर आहे ज्याने पर्यावरणीय बदल व त्याचे दुष्परिणाम थोपवण्यासाठी पहिले पाऊल टाकले, कृती केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, असे म्हणतो. पण, या शहराच्या सुविधांवर ताण येत आहे. कधीही न धावणाऱ्या मुंबईला रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. मुंबईला या सुविधा देण्यासाठी पालिका कसोशीने काम करत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पिंजाळ प्रकल्पाचे काम आपण करत आहोत. सुविधा उभारताना आपण काय गमावणार याचा विचार करणेही गरजेचे आहे. समुद्राच्या पाण्याचा यासाठी का नाही उपयोग करायचा. इतरत्र जर समुद्राच्या पाण्याचा वापर होत असेल, तर मुंबईने का नाही, याचा विचार करून यावर आपण काम सुरू केले आहे. लवकरच आपण मुंबईच्या समुद्राचे पाणी पिण्यालायक करू. विकास मुळावर येणारा नको, तो शाश्वत हवा, शाश्वत म्हणजे काय तर, पर्यावरणाची हानी न करता दीर्घकालीन टिकणारा विकास हवा. तापमानात होणाऱ्या वाढीत आपण योगदान देणार नाही, याची काळजी घेणे महत्वाचे. आरेचे जंगल वाचवून मी उपकार नाही केले, कर्तव्य केले, राज्य हिताचे. ते मी मुख्यमंत्री म्हणून करणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जीव वाचवण्यासाठी काम करायला हवे -

पहिल्या पावसात मातीचा सुगंध दरवळायचा, आता मातीचा सुंगध येतोच कुठे. कारण संपूर्ण काँक्रिटीकरण झाले आहे. पूर्वी पाणी झिरपत होते ते आता लोकांच्या घरात शिरते, मग याला विकास म्हणायचा का. आपल्याला अतिवृष्टीचा इशारा मिळतो, पण ढगफुटीचे प्रमाण कुणी सांगू शकत नाही, मग कल्पनेपलिकडे पाऊस पडतो. मग याचे कारण शोधताना वातावरण बदलात मिळते. पाऊस पडतो, डोंगर खचतात, दरडी कोसळतात, माणसे मरतात, मग आपण मदत करतो, ते कर्तव्यही आहे. पण, मला वाटते जीव वाचवण्यासाठी काम करायला हवे, मुंबईतही डोंगर उतारावर वस्त्या आहेत, त्यावरही काम करायचे आहे, त्यासाठी हा कृती आराखडा उपयोगी पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुढच्या पिढीसाठी सुखकर आयुष्य -

महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. त्या महाराष्ट्राची मुंबईही राजधानी आहे. हे आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात मुंबईने केलेले काम देशाने स्वीकारले पाहिजे. त्यातून एक चळवळ निर्माण होईल. इतर राज्य आणि शहरांनी मुंबईप्रमाणे काम करायचे ठरवले तर मुंबई त्यांना सहकार्य करायला तयार आहे. कारण आपल्याला जशी मुंबई बदलायची आहे तसाच देश बदलायचा आहे. पर्यावरणीय बदल लक्षात घेऊन शाश्वत विकास करणे, पुढच्या पिढीसाठी सुखकर आयुष्य उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात काम व्हावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - मुंबई वातावरण कृती आराखड्याचे लोकार्पण, सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.