- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संपत्ती ५ वर्षांत १४० टक्क्यांनी वाढली
नागपूर - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची संपत्तीत गेल्या पाच वर्षांत १४० टक्क्यांची वाढल्याचे समोर आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले, त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. एवढेच नाही तर, नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या संपत्तीतदेखील लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. वाचा सविस्तर
- मनोहर जोशी, खोतकरांना डावलून मंत्र्याचा पीए सेनेचा स्टार प्रचारक, बसपातून गरुड गायब
मुंबई - साधरणतः निवडणुकांच्या आधी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी सादर करण्यात येते. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपली यादी सादर केली आहे. शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना वगळून एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक राहुल लोंढे यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. वाचा सविस्तर
-
'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्यांचा 'राफेल' घोटाळा - शरद पवार
परभणी - 'खाऊंगा ना खाने दुंगा' असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ३५० कोटी रुपयांचे राफेल विमान १ हजार ६७० कोटी रुपयांना खरेदी केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज परभणीत केला. शिवाय पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करणारे अभिनंदन यांना जागतिक दबावापोटी सोडण्यात आले. मात्र, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ५६ इंच छातीवाले मोदी करत असल्याचेही पवार म्हणाले. वाचा सविस्तर
- ...ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव; दानवेंची सारवासारव
लातूर - मी तसे वक्तव्य केलेचं नाही. ते वक्तव्य म्हणजे वाक्यांची जुळवाजुळव होती, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी भारतामधील ४० अतिरेक्यांना(जवानांना) मारल्याचे विधान केले होते. मात्र, तसे विधान केलेच नसल्याचेल स्पष्टीकरण दानवेंनी दिले. वाचा सविस्तर
- लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी आणि विरोधकांच्या दुखऱ्या बाबींवर बोट ठेवत त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजप- शिवसेनेवर हल्लाबोल करण्यासाठी ४० स्टार प्रचारक नेमले आहेत. वाचा सविस्तर
- दलवाईंच्या मध्यस्थीने ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिलजमाई
ठाणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे काँग्रेस नेते खासदार हुसैन दलवाई यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात आयोजित दोन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाण्यातील आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आघाडीतर्फे हुसैन दलवाईंना समन्वयक म्हणून ठाण्यात पाठविण्यात आले. दोन्ही पक्ष आघाडीचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर
- माढ्यातील पराभव दिसत असल्यानेच पवारांची माघार, मुख्यमंत्र्यांचा टोला
मुंबई- रणजितसिंह मोहिते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दोघेही भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे आता माढ्याचा विजय निश्चित आहे. हे आधीच ओळखून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. अपघात होण्यापेक्षा यू-टर्न चांगला असतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. ते रणजितसिंह नाईक यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलत होते. वाचा सविस्तर