ETV Bharat / city

लॉकडाऊनचा सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम - मुंबई न्यूज अपडेट

राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन राज्य सरकारने घोषित केला आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. या मार्गावर नेहमी वर्दळ असते, मात्र आज सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनचा सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

author img

By

Published : Apr 10, 2021, 6:23 PM IST

मुंबई - राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन राज्य सरकारने घोषित केला आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. या मार्गावर नेहमी वर्दळ असते, मात्र आज सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

सायन-पनवेल महामार्ग हा गजबजलेला महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग पुढे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला गेला आहे, त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र लॉकडाऊन लागल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अगदी तुरळक वाहतूक या रस्त्यावर आज पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून फक्त अत्यावश्यक सेवेमधील गाड्या जाताना दिसत आहेत.

लॉकडाऊनचा सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन

दरम्यान राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आज आणि उद्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद असणार आहेत. यादरम्यान नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र दुकाने बंद ठेवावे लागत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - लक्षणे नसलेल्या रुग्णांनी रुग्णालयातील खाटा अडवून ठेवू नये - महापौर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.