ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट; खासगी कोचिंग क्लास संचालक आर्थिक संकटात, शैक्षणिक वर्ष रिकामे जाण्याची भीती

खासगी क्लाससेंना कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फार मोठा फटका बसला आहे. 2019-20 च्या परीक्षा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याने क्लास बंद आहेत. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्याने क्लासचे मागील वर्षाचे शुल्क पूर्णपणे थांबले आहे.

mumbai
रिकामे असलेल्या खासगी क्लासच्या खुर्च्या
author img

By

Published : Jul 1, 2020, 5:01 PM IST

Updated : Jul 1, 2020, 10:54 PM IST

मुंबई - लॉकडॉऊन काळामध्ये खासगी क्लास संचालकांना फार मोठा फटका बसला आहे. 2019-20 च्या परीक्षा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याने क्लास बंद आहेत. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्याने क्लासचे मागील वर्षाचे शुल्क पूर्णपणे थांबले आहे. तसेच नवीन प्रवेशाचा कालावधीही हाच असल्यामुळे पन्नास टक्केही प्रवेश यावर्षी झालेले नाहीत. त्यामुळे कोचिंग क्लासचालकांचा समावेश लघु उद्योगामध्ये करावा, अशी मागणी केली जात आहे.

कोरोना इफेक्ट; खासगी कोचिंग क्लास संचालक आर्थिक संकटात, शैक्षणिक वर्ष रिकामे जाण्याची भीती

ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे चालू केले आहे. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. एकीकडे महाविद्यालयांनी आणि दुसरीकडे क्लासवाल्यांनीही ऑनलाईन लेक्चर चालू केल्याने विद्यार्थ्यांना मोबाईल डेटा अपुरा पडत आहे. शिक्षकांचा पगार कसा काढायचा हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हजारो छोटे खासगी क्लास चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 2019-2020 या शैक्षणिक वर्षाचे अनेक विद्यार्थ्यांचे काही महिन्यांचे पैसे बाकी आहेत. ते पैसे मिळतील की नाही याबाबत साशंकता आहे. कोरोनाचे संकट अजूनही न टळल्यामुळे खासगी क्लास सुरू होणार की नाही यामुळे कोणीही आगाऊ प्रवेश घेतलेला नाही.

क्लास उद्योगांना लघु उद्योगाचा दर्जा मिळाल्यास दिल्या जाणाऱ्या पॅकेजचा फायदा आम्हाला मिळेल. सध्या कोणतीही बँक क्लासना कर्ज उपलब्ध करुन देत नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. पूर्वी आम्ही जो 5 टक्के कर भरायचा तो कालांतराने आता जीएसटीच्या मार्फत 18 टक्के झालेला आहे. यावर्षी 18 टक्के जीएसटी भरणे फारच अवघड जाणार आहे. सरकारने आमच्यासाठी काही वेगळे पॅकेज उभे करावे. लाईट बिल आणि क्लासच्या जागेबद्दल सबसिडी मिळाल्यास क्लास पुन्हा उभे राहू शकतो. अनेक क्लास संचालक आज क्लास बंद करण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या माहितीतले अनेक क्लास आज बंद होताना दिसत आहेत. महाराष्ट्र क्लास असोसिएशनच्या माध्यमातून आज आम्ही सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्लोबल क्लास अकॅडमीचे प्रवीण घाडगे यांनी दिली.

कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली. यामुळे आम्हा क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 2019- 2020 या शैक्षणिक काळातील फी दिली नाही. नवीन वर्षाला प्रवेश नाही. यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी क्लासचालक वसिम शेख यांनी केली आहे.

Last Updated : Jul 1, 2020, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.